Skip to main content

समीक्षा

अनस्टॉपेबल - नक्की बघा!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 28/11/2010 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्रेक के बाद' ची ब्याद संपल्यावर आम्ही तडक अलकाला साडेनऊचा 'अनस्टॉपेबल'चा शो बघायला गेलो. साडेसहाचा 'ब्रेक के बाद' साधारण सव्वानऊपर्यंत संपून पंधरा मिनिटात अलकाला पोहोचून 'अनस्टॉपेबल' कसा गाठणार या विवंचनेत आम्ही 'ब्रेक के बाद' बघण्याआधी होतो; पण 'ब्रेक के बाद' चा जीव फारच छोटा निघाला. आठ वाजून वीस मिनिटांनी 'ब्रेक के बाद' सुदैवाने गतप्राण झाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. जेमतेम शंभर मिनिटांच्या 'ब्रेक के बाद'ने आमचा अक्षरशः अंत पाहिला होता. एका छोट्या डासाने मलेरिया गिफ्ट करावा तसा 'ब्रेक के बाद' आम्हाला कंटाळेरिया देऊन गेला होता. बराच वेळ हातात होता.

ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 27/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्‍या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो.

वर्तूळ - एक अनुभव

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/11/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.

एक राजकारणी संत : समर्थ रामदास

लेखक पारा यांनी गुरुवार, 28/10/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्याच काही आठवड्यांपूर्वी सज्जनगडावर गेलो होतो. तिथली एकूण शिस्त आणि व्यवस्था पाहून मी प्रभावित झालो. तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानांतून मी हे पुस्तक निवडलं. 'एक राजकारणी संत : समर्थ रामदास'. हे पुस्तक म्हणजे एक व्याख्यानमाला आहे, रा. शं. वाळिंबे ह्याच्या ओघवत्या शैलीत. एकूण सात दिवस ही व्याख्यानमाला चालली, त्यात त्यांनी रामदासांच्या आयुष्यामधल्या अनेक पैलूंचं व्यवस्थित विवरण करून सांगितलं. हे पुस्तक वाचून मला ही पटलं की समर्थ रामदास खरोखर समर्थ का आहेत ते. आणि ते इतर संतमंडळींपासून कसे पूर्णतया वेगळे ठरतात.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

जिस्म आणि इतर

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 26/10/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा सगळा रिव्यू फक्त 'जिस्म' या एकाच चित्रपटाचा नाही, 'जिस्म', 'रोग', 'क्रिमिनल' व इतर अनेक महेश भट किंवा विक्रम भट आणि इतर नेहमीचेच (अ)यशस्वी यांचे चित्रपट पाहिले आणि त्यात ज्या कायम दिसणार्‍या गोष्टी आहेत त्याबद्दल हे आहे. असे चित्रपट पाहताना सतत जो वैताग येत असतो त्याचे असंबद्ध वर्णन समजा:-) या सर्व चित्रपटांत सहसा ठोकळेबाज अभिनेते असतात, जॉन अब्राहम, अश्मित पटेल, डिनो मोरिया बरेचसे मुळचे मॉडेल्स. नायिकाही तशाच. यांना इतर कोणते रोल झेपणार नाहीत म्हणून शक्यतो कोरडा ठण्ण चेहरा करून वावरण्याचे रोल त्यांना देतात, म्हणजे फॅशन डिझाइनर, यशस्वी बॅचलर , बिझिनेसमन वगैरे.