Skip to main content

समीक्षा

समीक्षा — पुस्तक, चित्रपट आणि साहित्यकृतींच्या मराठी समीक्षा. रसग्रहण व चिकित्सक परीक्षण येथे वाचा.

प्रहार- द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम

लेखक आगाऊ म्हादया यांनी सोमवार, 26/10/2026 22:10 या दिवशी प्रकाशित केले.

हे नाव चित्रपटगृहात दिसलं आणि त्यानंतर फक्त उज्वल निकम दिसत राहिले. राजकुमार राव ने फार छान साकारली आहे ही भूमिका. आता मी इथे एक स्पष्ट करतो, अनेक लोक त्यांचं पर्सनल आयुष्य जास्त दाखवलं म्हणून बोंबा मारत आहेत, पण मला वाटतं आपण त्यांची कथा बघायला जातोय तर नीट बघावी. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पदर त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेच आहेत ही जाणीव असू द्यावी.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 21/02/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

1

युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.

वेड्या आईची वेडी माया

लेखक रानरेडा यांनी रविवार, 15/02/2026 23:35 या दिवशी प्रकाशित केले.

आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा.

खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता .
रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता

पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची. डॉक्टरांनी हे बरे होणार नाही, हे  वाढतच जाणार असे म्हटले

~ गंध धुंद ~

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 06/11/2025 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 29/10/2025 21:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 15/09/2025 15:54 या दिवशी प्रकाशित केले.

#पुरोगामी सुधारणावादी लेखन
#बहुजन हिताय बहुजन सुखाय

______

४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !!
______
'४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.

हिंदुत्ववादी आणि उजवे

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/09/2025 12:24 या दिवशी प्रकाशित केले.

बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात.

आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय?

१) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात.

२) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 23/08/2025 20:14 या दिवशी प्रकाशित केले.

फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?