सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!'
बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?'
अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु.
सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो.