Skip to main content

माध्यमवेध

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 27/09/2014 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

रायडींग ऑन अ सनबीम

लेखक श्रीरंग_जोशी यांनी बुधवार, 24/09/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 04/09/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.

रमा-माधव !

. .... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. मग ती इतिहासातली पात्रं असली तरी प्रेम हे प्रेमच असतं. एखाद्या निर्मात्या दिग्दर्शकाला अशा प्रकारचा ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट करावासा वाटणं त्यातही जिथे प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे अशा मराठीत करावासा वाटणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. (कृपया ध्यानात घ्या हे रमा-माधव या चित्रपटाचे परीक्षण नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 07/08/2014 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल. सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/08/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok* Shock भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले.

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.

संवादिका - ३

लेखक प्रास यांनी रविवार, 22/06/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक जीएस यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

लेखक ॐकार यांनी सोमवार, 19/05/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

काळू बाळू

लेखक विकास यांनी शनिवार, 26/04/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
Kaloo Baloo कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले...