Skip to main content

माध्यमवेध

थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 15/01/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,

थँक यू मिस्टर ड्रॅगन –2

1 या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही... ...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल? ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – १

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 13/01/2016 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल? ही लेखमाला वाचा. लेख माला संजीव ओकांनी राजमत टाईम्स मधे हे लिखाण केले आहे. मिपाकरांसाठी

थँक यू मिस्टर ड्रॅगन – १

ो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणीस्तानमधून परतत असताना, पाकमध्ये संपूर्ण जगाला थक्क करणारा, जो अनपेक्षित थांबा घेतला, त्याचे दृष्य परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.

बंगाली मातीचा साजरा बुरूज

लेखक माहितगार यांनी रविवार, 10/01/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही. विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे 'पिंगा' हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित 'मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक' यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही.

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 15/12/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी! नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८ महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे (टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!) कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास - संपर्क करा :- श्री. अक्षय वाटवे ९४२०२६०८०८

दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 27/11/2015 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड

पावडर कथेला विलंब

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 24/11/2015 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही नेटवरती घडले.

चहावाल्याचे पंख.....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 19/11/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
चहावाल्याचे पंख..... काय करतो? ......... चहा विकतो. किती वर्षे झाली?........ चाळीसेक. वय?...... साठीपार. कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय. कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी. चौकोनी आयुष्य जगणाऱ्या मानसिकतेला अज्जिबात न पेलवणारा हा परिचय आहे श्री. हरि एम. मोहनन आणि त्यांची पत्नी मोहना यांचा! केरळातल्या एर्नाकुलम् येथे गेली चाळीसेक वर्षे चहाचे दुकान चालविणाऱ्या या दाम्पत्याचे भटकंतीचे वेड कुणालाही आश्चर्य चकित करते. हातात पैसे असूनही कधीही आपल्या गावाशहराची वेस न ओलांडणारे लोक आहेतच!

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

घरोघरी पुरस्कार वापसी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
“आज तर तुझ्या सवेंदनहीनतेचा कळसच झालायं!” आदिती तणतणत समोरच्या हॉलमधे आली. अक्षय फेसबुक आणि ट्वीटर वर आजकाल रोजच मिळणारे असहिष्णुतेचे पोस्टस चघळत होता. खरतरं असल्या पोस्टस विषयी त्याचीच सहिष्णुता आता संपुष्टात आली होती. त्यामुळे फेसबुकाने केव्हाच्या जाहीर केलेल्या सात भावचित्रांची तो आतुरतेने वाट पहात होता. “जानू, काय झालं?” त्याने शंभर लाईक्सने ओथंबलेल्या आवाजात विचारले. “मी किचनमध्ये मरमर मरतेय, आणि तू मजेत फेसबुक-फेसबुक खेळत बसलाय!” “अग मी माझी मेल चेक करत होतो. बॉसचा एक अर्जंट इमेल यायचाय नां!” “मला उगाच काऊचिऊच्या गोष्टी सांगू नकोस. तू आजकाल फारच असहिष्णूतेने वागतोयसं!