Skip to main content

माध्यमवेध

एनरॉन पुन्हा एकदा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 11/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी,मोठी कलाटणी देणारा एक कोणता विषय असेल तर तो आहे एनरॉन प्रकल्प. एनरॉन या अमेरिकन कंपनीने जीई व बेक्टेल या अन्य दोन अमेरिकन सुरोपीय कंपन्यांसमवेत दाभोळ वीज कंपनीची स्थापना केली. त्यात एनरॉनचा वाटा 67 टक्के होता. प्रकल्पाचे कागदोपत्री नाव जरी दाभोळ असेल तरी जनतेत मात्र तो एनरॉन प्रकल्पच राहिला. 1991-92 पासून ते 2001 मध्ये अंतिमतः राज्य सरकारने बंद करेपर्यंत या प्रकल्पासून वीज निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. राजकारणाचे पाझर मात्र मोठ मोठे फुटत राहिले.

संदर्भांचा विसर आणि भुलाबाईंचा उत्सव

लेखक माहितगार यांनी शनिवार, 10/10/2015 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे. मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला.

जाहीराती पाहुन

लेखक नितीनचंद्र यांनी मंगळवार, 06/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जाहीराती मग त्या दुरदर्शच्या विवीध चॅनलवरच्या असोत की छापील विभागातल्या, मला सहसा भुरळ पडत नाही. काही वेळा ह्या जाहीराती त्या मुळ उत्पादकाचा उद्देश काय असावा किंवा ग्राहकांनी काय घ्यावा याबाबत अनेक पर्याय सुचवुन जातात. १) समजा तुमच्या कडे पिढीजात संपत्ती आहे किंवा आत्ताच मिळाली आहे अश्या वेळी माणसाची झोप उडते याचे कारण बँकेत ठेवलेल्या संपत्ती शिवाय घरात दागिने/रोख रकमा किंवा किमती मौल्यवान वस्तु माणुस ठेवतोच. अश्या वेळी चोरी होईल की काय किंवा दरोडा पडेल की काय अश्या कारणांमुळे झोप उडत असेल तर एक पर्याय आहे. दोन -चार जोड्या अमुल माचो च्या खरेदी करा आणि आरामात झोपा.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

गोष्ट "देशाचा आत्मा बदलण्याची..."

लेखक विकास यांनी शुक्रवार, 02/10/2015 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
समाजमाध्यमांमुळे कधी कधी रोचक माहिती शोधत नसताना देखील मिळते. युरी बेझमेनोव्ह या केजिबीच्या हेराच्या मुलाखतीच्या बाबतीत असेच झाले. वास्तवीक एका अमेरीकन पत्रकारास १९८५ सालात दिलेल्या या फुटीर (रशियाच्या दृष्टीने देशद्रोही) हेराने सांगितलेली गोष्ट आणि त्यात (कदाचीत वाढवून चढवून) सांगितलेले अमेरीकेत (त्याआधीच्या काळातली) सोव्हिएट ढवळाढवळ इतकेच या गोष्टीचे महत्व नव्हते हे सुरवातीस लक्षात आले... हा पठ्ठ्या सत्तरच्या काळात भारतात केजीबीचा हेर म्हणून काम करायचा. म्हणजे उमेदवारीच्या काळात तो जेंव्हा रशिअन वकीलातीत काम करायचा तेंव्हा केवळ नोकरदार म्हणून करत असावा.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

सुंदर पिचाईंच्या स्वागत संदेशा निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/09/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत...

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 10/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee "आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत. “अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात. “अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे. "बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे. "अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा