(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-)
बाकी शिवकन्या तुमचे आभार!!)
सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर...
किती बाहेर??
टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे ....
ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात
डाएटच्या नादात
भरली होती तिला डब्यात....
करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी...
घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे....
सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे...
कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही..
त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...