Skip to main content

वदनी कवळ.....

लेखक फुंटी यांनी बुधवार, 29/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4664
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

नाश्ता झाला, जमलाय. आता जेवण येऊ द्या.

झकास

जय जय झुकेरबर्ग समर्थ, पैजारबुवा,

वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober

स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा