दाराआडचा बाबा
लेखनविषय:
काव्यरस
मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी
एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार
जिथे एक मुलगी बसली आहे नटून....
करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार?
जाईल का ती ही
मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे?
बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत,
याची जाणीव नसलेली मुलगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
मुलगी हरवलेला बाबा
गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो...
बघतच राहतो....
वाचने
3816
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
भारी...लैच वेगळा अँगल पकडला आहे
In reply to भारी...लैच वेगळा अँगल पकडला आहे by ज्ञानोबाचे पैजार
हाहाहा!
In reply to भारी...लैच वेगळा अँगल पकडला आहे by ज्ञानोबाचे पैजार
पोरगी एक नेट्सॅव्वी तर बाबा
छान लिहिले आहे.
In reply to छान लिहिले आहे. by दुर्गविहारी
धन्यवाद, दुर्गविहारी साहेब!
सुंदर !