मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्हाला इंग्लिश येतंय

वेल्लाभट ·

उपयोजक 23/02/2016 - 20:53
पयला मी! छान आहे कविता! खरंच मराठी न आल्यामुळे अडेल असं भरपूर काहीतरी घडायला हवं

सतिश गावडे 24/02/2016 - 08:33
असं वाटलं की माझ्याच मनाची व्यथा मांडली आहे. ज्या इंग्रजी शब्दांना मराठीत सोपे प्रतिशब्द नाहीत तिथे काहीतरी अवघड मराठी प्रतिशब्द वापरण्यापेक्षा इंग्रजी शब्द वापरणं समजण्यासारखं आहे. मात्र आई आणि बाबांच्या ऐवजी आज सर्रास ममी/ममा आणि पपा/डॅड/डॅडी हे शब्द ऐकायला मिळतात. वाईट वाटते.

In reply to by सतिश गावडे

नाखु 24/02/2016 - 09:35
बरेचदा आपल्याला इंग्रजी येतेय (हे दाखविण्याच्या) अट्टाहासापायी/हौसेपायी असे वापरताना दिसतात.सहज शक्य असलेले वापरातले शब्द जाणीपुर्वक इंग्रजी वापरले जातात आणि मग आवर्जून मराठी शब्द शिकवणार्/शिकणार कधी ? १.तुला भूक लागलीय एक अ‍ॅपल देऊ का? २.ममानी दिलेला टीफीन फिनीश करायचा बर का ! ३.कित्येक अमराठी लोकांना जितके अस्सल मराठी (अगदी कुठल्याही बोलीतले -कोकणी,वर्‍हाडी,खान्देशी ई.) शिकण्याची/सम्जण्याची इच्छा असते तितकी मराठी माणसांमध्ये नाही असे रोचक निरिक्षण आहे पे"रेंट" न झालेला पालक नाखु

In reply to by प्रचेतस

वेल्लाभट 24/02/2016 - 10:56
भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे; उलट इंग्लिश आलंच पाहिजे हा आग्रह आहे. पण मराठीचा गळा दाबून इंग्लिशचा सूर लागतो ना; ते चूक आहे. बाकी मराठी प्रतिसादातून इंग्लिश शब्द टपकतात हे मान्य आहे मला. एवढंच काय वाक्यच्या वाक्य इंग्लिशमधे लिहिलेली आहेत अनेकदा प्रतिसादात. त्याकडे लक्ष देईन पण इतकंच म्हणेन की मराठीतला शब्द माहित नाही म्हणून लिहिलेले ते इंग्लिश शब्द नसतात; ते तिथे चपखल बसतात म्हणून समजून लिहिलेले असतात.

भीमराव 24/02/2016 - 10:07
वेल्लाभाऊ तुमच्या नावासकट चेपु आणि कस्काय वर घेऊन जातो बघा ही कविता आता,

भीडस्त 24/02/2016 - 10:30
पोएटने महाराष्ट्रीयन पीपलची हायपोक्रसी ईफे़क्टीवली एक्सप्रेस केली असं माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे.

असंका 24/02/2016 - 11:09
चांगली जमलीये. धन्यवाद... (ही कविता वॉट्सअ‍ॅपवरून येइल हे नक्की. पण आपल्या नावासहित येइल याबाबत जरा साशंक आहे.. )

हे मराठी कलाकारांना सांगा कुणीतरी! मराठीच्या नावाने गळे काढतात,आणि एकमेकांशी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हिंदीत बोलतात(मी ऐकलयं) आणि लाज नै ते वर मनसेच्या व्यासपीठावर हजेरी लावतात.आणि परत लाज नै ते ↓ या आशयाचे चित्रपट बनवतात. -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय -स्वराज्य -जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा -अर्जुन -बाळकडू -संभा:आजचा छावा

तर्राट जोकर 24/02/2016 - 14:14
वेल्लाभट दगडं! (आयमीन रॉ़क्स!) :-) उत्तम कांबळेचं मम्मी ह्या शब्दाचं निरुपण आवडलेलं. आई म्हणजे गावंढळ, मागास, अशिक्षित अशी प्रतिमा असलेली बाई, पण खरोखर तशाच असलेल्या बाईला मम्मी म्हटलं की आपणही जाहिरातीतल्या सुशिक्षित, श्रीमंत, प्रगत, हुच्च मम्म्यांसारखी असल्याचा हुरुप येतो. सांस्कृतीक फरक आहे. पैशाचा प्रभाव भावनांवर, जगण्यावर.

ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे.

संध्याछाया..

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by स्पा

गौरी लेले 19/02/2016 - 12:54
नमस्कार स्पा , तुमचे व्याकरण कच्चे आहे असे दिसते. अत्मबंध ला काहीच अर्थ नाही , आत्मबंधच योग्य असावे आपण त्यांनाच विचारुयात का ? :)

In reply to by गौरी लेले

टवाळ कार्टा 19/02/2016 - 13:06
वशाड मेलो म्हणजे काय ?
कॉलींग सूड
कृपया शिव्या देवु नयेत .
"वशाड मेलो" म्हणजे काय ते माहित नसताना ती शिवी आहे असे आपणांस का वाटले? आणि तसे नसल्यास उरलेल्या वाक्यात नेमका कोणता शब्द शिवी आहे? बरे...मी दिलेली प्रतिक्रिया गावडे सरांना होती...त्याबद्दल त्यांनी आक्षेप घ्यावा...ना धागा तुमचा ना प्रतिक्रिया तुमच्या प्रतिसादावर मग तुम्हाला का आक्षेप? आणि आक्षेप आहे असे मानले तरी मग माझ्याच प्रतिसादावर आक्षेप का? गावडेसरांनीसुध्धा सूडजींना असाच प्रतिसाद लिहिला आहे...त्यावर आक्षेप का नोंदवावासा वाटला?
आणि व्यक्तिगत टिपण्णी टाळल्यास आनंद होईल :)
नक्की काय व्यक्तीगत टिप्पणी केलीये? "गौरी" नाव असलेल्या आयडीला "सुंदर" अश्या नावाने का संबोधावे?

नाखु 19/02/2016 - 09:31
बुवांच्या आयुष्यात सप्तरंगी पहाट उजळली ! आणि त्यामुळे(च) सुरमयी संध्याकाळ त्यांना आकळली ! नाखु चारोळीवाला

अभ्या.. 19/02/2016 - 13:02
बुवा मस्तच हो. कविता पण आणि फोटो पण. तेवढे फोटोतल्य वायरी तेवढ्या तुमच्या लाडक्या पांडुब्बा कडून काढता आल्या अस्त्या तर बहार आली असती. ;)

In reply to by बॅटमॅन

@
पां डुब्बाची कमाल , अखेर दिसली पायरी
>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy023.gif खाटूकबंधे 'अखेर' , आंब्याची केली कैरी! Llllllluuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif ---------------------------- स्पा @लोलबंध >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy025.gif पांडूछन्द! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif ----------------------------- सूड @पुढे लिहायचं झालंच तरः जिलबी आली भायरी वडगाव शेजारी धायरी!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry007.gif काढून बंदुका भायेरी झाडा http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent099.gif सुडक्या वर फैरी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif

सांजसंध्या 20/02/2016 - 07:47
अतिशय सुंदर कविता. सकाळी सकाळी वाचली तरी कवितेचा मूड जाणवला... फोटोमुळे वेगळाच इफेक्ट आला. पण दिला नसता तरी कातरवेळचं देवालय आणि संध्याकाळ हे खूप आवडलं. शेवटचं कडवं गंभीर करून जातं.

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9 संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते.. एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते. माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!? दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी? हिशोब मी हि कशास बांधू?

मिशी नृत्य

माहितगार ·
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

अन् मलाही!

चांदणे संदीप ·
एक सांगू? ऐकशील? ते कंगव्यातून सुटणारे केस राहूदे तसेच, भुरभुरूदे तेवढाच त्यांना विरंगुळा ...अन् मलाही! वाराही कधी लाडात येतो पदराशी सलगी करतो तू तशीच राहा, मला सावरू दे खेळू दे त्या दोघांना ...अन् मलाही! मोकळी छान हसताना इकडे तिकडे पाहताना वेडी डूलं झुलत राहतात झुलू दे त्यांना मजेत ...अन् मलाही! गालावरच्या खळ्यांना लाल ओठ नि चंद्रबिंदीला न्याहाळत बसतो आरसा पाहू दे ग निवांत त्याला ...अन् मलाही! - संदीप चांदणे

नको वाटते..

प्राची अश्विनी ·

पैसा 14/01/2016 - 10:31
:( खूपदा आपण जागे होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण तरी काय हरकत आहे ना! जब जागो वही सबेरा.

नूतन सावंत 14/01/2016 - 19:11
आवडली कविता.पण त्या आजोबांना आता चूक लक्षात आली असेल तर.आजींना समजावून सांगता आलं तर पहा,की 'जुने विसरून पुढ्यात आलेले स्वीकारा.त्यातच गम्मत आहे.'

लिहित राहा. अपूर्णतः हीच आयुष्याची खरी मेख आहे. आजोबांनी कितीही प्रेम केलं असलं तरी ते आजीला पोहचलं नसेल, असंही होऊ शकतं.
दर्द की जुबान होती तो बता देते शायद ; वो जख्म कैसे दिखाये जो दिखते ही नही
-दिलीप बिरुटे

एस 14/01/2016 - 23:28
"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?"
हम्म.. काही 'राहून गेलंय का' ते परत एकदा पहायला हवं याची जाणीव कविता वाचून झाली. तुम्ही छान लिहिता. मोजकं पण सुंदर.

In reply to by प्राची अश्विनी

सटक 15/01/2016 - 20:02
धन्यवाद तुम्हाला!! हा शेर मी पूर्वी वेगळ्या अर्थाने घेत असे. आज तुमची कविता वाचून जाणवले की इथेही किती चपखल बसतो आहे अर्थ!

सर्वांना धन्यवाद!__/\__ @ पै ताई, सुरंगी, रुपी, बोका-ए-आझम, खरंय, हा सकारात्मक द्रुष्टीकोनच जीवनात आनंद निर्माण करतो. @ बिरुटे सर, असही असेल. संवाद अपुरा पडला असेल. पण "इच्छा निमाल्या. मनी शांतताहे....." आज्जींच्या बोलण्यातून कुठे तक्रार , राग मला तरी जाणवला नाही, त्यांनी फक्त त्याना वाटलेलं सत्य शांतपणं सांगितलं. मला वाटतं, गीतेतील स्थितप्रज्ञता म्हणजे हीच तर नव्हे ना? कुणी ज्ञानमार्गाने मिळवतो, कुणी भक्तीमार्गाने, कुणी अतीसुखाच्या किंवा दु:खाचा अनुभवातून!

In reply to by प्राची अश्विनी

राघव 15/01/2016 - 13:02
छान रचना.. आवडली! :-) बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही. Silence might as well be in graveyard.. Peace is where flowers blossom! या ओळी कुठेतरी वाचलेल्या होत्या त्या आठवल्या एकदम! राघव

कविता आवडली. वरचे काही प्रतिसाद म्हणजे ____/\____ एका उत्तम कादंबरीतून उतरून काढलेले उतारे वा अधोरेखित केलेली वाक्यच जणू! Sandy

मित्रहो 15/01/2016 - 10:27
आता आम्हालाही काही राहून गेल का ते बघाव लागेल नाहीतर कदाचित आमचेही त्या आजोबांसाखे होइल.

कविता वाचताना एका वेगळा अर्थ डोक्यात तयार होता गेला आणि तशी कविता वाचत गेलो. पण.... शेवटचे कंसातले वाक्य मनाला अतिशय क्लेश देउन गेले. परत त्या अनुशंगाने कविता वाचली आणि अधिकच निराशा मनात दाटून आली.
बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही.
राघव यांच्या या वाक्याशी बाडिस... ही कविता उगाचच वाचली असे वाटते आहे. पैजारबुवा,

शिव कन्या 06/02/2016 - 10:15
बराच काळ इथे येता आले नाही. कविता मनाला स्पर्श करुन गेली. पण आजोबांविषयी मन भरुन येते.त्यांची स्थिती आणखी तगमग वाढवणारी. जाणारा जातो उरलेला suffers in million ways. Complexities are heart rendering. Great.

नको जीव लाऊ, नको वाट पाहू, अता श्वास घेणे नको वाटते.. कधी आस होती तुझ्या कौतुकाची, अता शब्दलेणे नको वाटते.. कशी चूक झाली, कुणी चूक केली, पुन्हा जाब देणे नको वाटते.. इच्छा निमाल्या. मनी शांतताहे. तिला छेद देणे नको वाटते. मला साद घाली खुला पैलतीर, इथे बंदी होणे नको वाटते.. (सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

रचना कशी असावी...?

राघव ·
नुसतेच शब्द सारे.. गाभा मुळी कळेना.. स्वतःस प्रश्न केला.. रचना कशी असावी? होता जरी जरासा.. अर्थ, अडकलेला.. तरीही मनांत म्हटले.. रचना अशी असावी? मजला तरी कळावी, मम भावना मनीची.. आशय जिथे गमेना.. रचना तशी नसावी.. सहज-सुगम्य भाषा.. विषया धरून यावी.. बोजड कशास व्हावे.. रचना तशी असावी.. फुलती सहज जैसे ऋतुरंग आसमंती.. अर्थास शब्द यावे.. रचना तशीच व्हावी.. आशय थेट यावा अन् अंतरी भिडावा.. जन्मून सार्थ व्हावी.. रचना तशी असावी. राघव

प्रतिसाद....

मुक्त विहारि ·

In reply to by जेपी

धन्यवाद.... तुमच्या प्रतिसादाची उत्तरे खालील प्रमाणे.... १. काय केलेत पहिले येवून? २. "मी पहिला" ह्या प्रतिसादाला बॅन करण्यात यावे. ३. असे प्रतिसाद देवून मिपाची बँड-विड्थ वाया घालवू नये. ४. आजकाल तुम्हाला फावला वेळ बराच मिळतो का? ५. "मी पहिला", "मी दुसरा", असे प्रतिसाद लिहिण्यापेक्षा काही तरी भरीव काम केलेत तर उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 02/01/2016 - 12:43
1)कविता वाचली. 2) मर्जी संमची .. 3)मर्जी मालकांची.. 4)आजच टैम भेटला.. 5)भरीव मंजे हजारी प्रतिसादासारखा धागा का ?? (पळण्याच्या तयारीत)जेपी

In reply to by जेपी

प्रचंड सहमत. मिपाचे व्यसन एकदा लागले की सोडवत नाही. आणि संपादक मंडळींवर माझा विश्र्वास आहे.

In reply to by मुक्त विहारि

नीलमोहर 02/01/2016 - 13:01
विडंबन धागा होता म्हणून थोडी गंमत केली इतकेच, तरीही माझ्या बाजूने तुमच्या प्रश्नांची उत्तरे, १. कविता वाचली. नंतर मोट्ठा प्रतिसाद देऊ म्हणून आत्ता फक्त येण्याची नोंद केली. २. काहीच हरकत नाही. ३. मिपाची बँड-विड्थ वाया जाण्यासाठीच असावी बहुधा. ४. मिळतो कधी बॉस कृपेने. ५. भरीव काम करण्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा मिपाच्या स्वगृहावर हेडर खालीच आहे, पण आमचं बॅड लक नेहमीप्रमाणे खराब असल्याने तोही (बॅनर) दिसेनासा झालाय.

In reply to by नीलमोहर

अशा गंमतीचा आम्हाला त्रास होत नाही..... अंगात थोडी टवाळगिरी असल्याशिवाय "मिपा" सदस्यत्व घेवू नये, असे आमचे बाबा महाराज म्हणतात, ते काही उघीच न्हवे...

चौथा कोनाडा 02/01/2016 - 21:14
मस्त रचना, मुवि ! प्रतिसाद या विषयावरचं विडंबन आवडलं विडंबन कसे म्हणावं ? विडंबन म्हटलं की विनोद अन टवाळकीचा वास येतो मी पयला म्हणत धाग्यावर मज्जा सुरू झालीय, आता धम्माल येणारच !

मूळ प्रेरणा (http://misalpav.com/node/34317) दरेक धाग्याला प्रतिसाद असतो. प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो. प्रतिसाद सुखद असतो किवा दु:खद असतो. दु:खद प्रतिसाद आपल्या लिखाणाच्या उर्मीवर काळी छाया पसरवतो सुखद प्रतिसाद लिखाणाला प्रेरणा देतो. मलाच दु:खद प्रतिसाद का म्हणून विचारू नये. दु:खद प्रतिसाद दुसऱ्याला का नाही? म्हणून खंतावू नये. कोणता प्रतिसाद मिळेल हे आपल्या लिखाणावर अवलंबून असते. मित्रानो, प्रत्येक प्रतिसाद घेत जावे. प्रत्येक प्रतिसाद शिकत जावे. दु:खद प्रतिसादाने खचू नका. गहन विचारवंतांचा आदर्श ठेवा. ते ही न जमल्यास, नानांचा हितोपदेश लक्षांत ठेवा.

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

शिव कन्या ·

गेलरी मस्त आहे..... प्रत्येक कविता आपापल वेगळेपण जपते आणि दरवेळेस नवीन अनुभूती देऊन जाते

मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.