Skip to main content

शांतरस

मी अश्व!!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 21/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

एकरूप

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 14/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी घाटमाथ्यावर
काव्यरस

कुंजविहारी हसे का मनी -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कुंजविहारी हसे का मनी - निद्राधीन ती राधा बघुनी नयनी उतरे शाममुरारी हळूच नकळत स्वप्न होऊनी स्वप्नामधली राधा बावरी गेली सगळे सत्य समजुनी हसे खुदुखुदू झोपेमधुनी खट्याळ कृष्णाची मोहिनी देशी रे किती त्रास तू मजला वदते राधा जात मोहुनी मोरपीस मग अलगद गाली कान्हा हसतो लबाड फिरवुनी खोड्या वाढता म्हणते राधा जा तू आता निघून येथुनी स्वर राधेला गोड ऐकवी मुरलीधर हळु पावा काढुनी नयने उघडी राधा अपुली मधुर सूर ते पडता कानी आत्ता होता कुठे कन्हैया शोधत हसते घरभर फिरुनी लबाड आणि खट्याळ लीला आठवे राधा स्वप्नी रंगुनी .. . http://mee-videsh.blogspot.in/
काव्यरस

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या प्रेमी गुंतत गेलो सुटणे गुंता विसरत गेलो होती काळी शेजारी ती पण गोरा मी मिरवत गेलो येता जाता हसतच होती सुचता थापा मारत गेलो जुळले सूतहि प्रेमहि जमले प्रेमी तिचिया डुंबत गेलो गडबडलो मी प्रेमात तरी आनंदाला उधळत गेलो .. .

नजरानजर अचानक

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 18/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
समजावले मनाला माझ्या कितीतरी मी हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. का ऐकते न मन हे सांगीतले जरी मी वळुनी पुन्हापुन्हा का बघते तुलाच नेहमी.. गर्दी बघून तिकडे रुसतो मनी इथे मी एकांत पाहुनीया हसतो खुषीत नेहमी.. नजरानजर अचानक होतोच बावरा मी त्रेधा उडे कशी मग अवघड स्थितीत नेहमी.. .
काव्यरस

< अश्शी सासू असती तर >

लेखक अन्नू यांनी बुधवार, 09/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती म

फुलदाणी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
निशा आर्त ओली रात गंधात रमली चढे मोगर्‍याची वेली चाफे खेळूनी आली फुले पान्हवली सांडे पारिजात अवेली पहाट खुलली फुलदाणी भरली चित्रकारः लुडवीग नॉस ,चित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स flower basket
काव्यरस

सुख

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 04/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे