✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नको वाटते..

प — प्राची अश्विनी, गुरुवार, 01/14/2016 - 10:06
नको जीव लाऊ, नको वाट पाहू, अता श्वास घेणे नको वाटते.. कधी आस होती तुझ्या कौतुकाची, अता शब्दलेणे नको वाटते.. कशी चूक झाली, कुणी चूक केली, पुन्हा जाब देणे नको वाटते.. इच्छा निमाल्या. मनी शांतताहे. तिला छेद देणे नको वाटते. मला साद घाली खुला पैलतीर, इथे बंदी होणे नको वाटते.. (सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )

प्रतिक्रिया द्या
12936 वाचन

💬 प्रतिसाद (33)

:((

कविता१९७८
गुरुवार, 01/14/2016 - 10:15 नवीन
:((
  • Log in or register to post comments

:(

पैसा
गुरुवार, 01/14/2016 - 10:31 नवीन
:( खूपदा आपण जागे होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण तरी काय हरकत आहे ना! जब जागो वही सबेरा.
  • Log in or register to post comments

!!!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/14/2016 - 11:00 नवीन
______________________!!!
  • Log in or register to post comments

:(

पद्मावति
गुरुवार, 01/14/2016 - 12:12 नवीन
:(
  • Log in or register to post comments

कविता आवडली हेवेसांनल!

अजया
गुरुवार, 01/14/2016 - 18:30 नवीन
कविता आवडली हेवेसांनल!
  • Log in or register to post comments

आवडली कविता.पण त्या आजोबांना

नूतन सावंत
गुरुवार, 01/14/2016 - 19:11 नवीन
आवडली कविता.पण त्या आजोबांना आता चूक लक्षात आली असेल तर.आजींना समजावून सांगता आलं तर पहा,की 'जुने विसरून पुढ्यात आलेले स्वीकारा.त्यातच गम्मत आहे.'
  • Log in or register to post comments

हो अगदी!

रुपी
Fri, 01/15/2016 - 02:51 नवीन
त्यांनी चूक आता सुधारली हे तरी कुठे कमी आहे? बाकी, कविता खूपच आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

+१

चाणक्य
Sat, 02/06/2016 - 10:44 नवीन
असेच म्हणतो. प्राची तुमच्या कविता फार छान असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

धन्यवाद!:)

प्राची अश्विनी
Sat, 02/06/2016 - 11:58 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

जाणती कविता.

सस्नेह
गुरुवार, 01/14/2016 - 19:17 नवीन
जाणती कविता.
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/14/2016 - 22:57 नवीन
लिहित राहा. अपूर्णतः हीच आयुष्याची खरी मेख आहे. आजोबांनी कितीही प्रेम केलं असलं तरी ते आजीला पोहचलं नसेल, असंही होऊ शकतं. दर्द की जुबान होती तो बता देते शायद ; वो जख्म कैसे दिखाये जो दिखते ही नही -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/14/2016 - 23:04 नवीन
हवं ते, हवं तेव्हा, हवं त्यांच्याकडून होत नाही... बहुतेक वेळेस, बहुतेक जणांच्या बाबतीत. याला जीवन ऐसे नाव !
  • Log in or register to post comments

कविता छान!

बोका-ए-आझम
गुरुवार, 01/14/2016 - 23:16 नवीन
आजींना सांगा - better late than never!
  • Log in or register to post comments

"जेव्हा वय , मन तरुण होतं

एस
गुरुवार, 01/14/2016 - 23:28 नवीन
"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?"
हम्म.. काही 'राहून गेलंय का' ते परत एकदा पहायला हवं याची जाणीव कविता वाचून झाली. तुम्ही छान लिहिता. मोजकं पण सुंदर.
  • Log in or register to post comments

मस्तच

एक एकटा एकटाच
Fri, 01/15/2016 - 00:32 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

खोलवर भावणारी

श्रीरंग_जोशी
Fri, 01/15/2016 - 00:34 नवीन
खोलवर भावणारी कविता आहे ही.
  • Log in or register to post comments

रिस रहा हो खून दिल से, लब मगर

सटक
Fri, 01/15/2016 - 01:59 नवीन
रिस रहा हो खून दिल से, लब मगर हसते रहें | कर गया बर्बाद मुझको, ये हुनर केहेना उसे ||
  • Log in or register to post comments

क्या बात!

प्राची अश्विनी
Fri, 01/15/2016 - 07:31 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक

धन्यवाद तुम्हाला!! हा शेर मी

सटक
Fri, 01/15/2016 - 20:02 नवीन
धन्यवाद तुम्हाला!! हा शेर मी पूर्वी वेगळ्या अर्थाने घेत असे. आज तुमची कविता वाचून जाणवले की इथेही किती चपखल बसतो आहे अर्थ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

सर्वांना धन्यवाद!__/\__

प्राची अश्विनी
Fri, 01/15/2016 - 07:30 नवीन
सर्वांना धन्यवाद!__/\__ @ पै ताई, सुरंगी, रुपी, बोका-ए-आझम, खरंय, हा सकारात्मक द्रुष्टीकोनच जीवनात आनंद निर्माण करतो. @ बिरुटे सर, असही असेल. संवाद अपुरा पडला असेल. पण "इच्छा निमाल्या. मनी शांतताहे....." आज्जींच्या बोलण्यातून कुठे तक्रार , राग मला तरी जाणवला नाही, त्यांनी फक्त त्याना वाटलेलं सत्य शांतपणं सांगितलं. मला वाटतं, गीतेतील स्थितप्रज्ञता म्हणजे हीच तर नव्हे ना? कुणी ज्ञानमार्गाने मिळवतो, कुणी भक्तीमार्गाने, कुणी अतीसुखाच्या किंवा दु:खाचा अनुभवातून!
  • Log in or register to post comments

छान रचना.. आवडली! :-)

राघव
Fri, 01/15/2016 - 13:02 नवीन
छान रचना.. आवडली! :-) बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही. Silence might as well be in graveyard.. Peace is where flowers blossom! या ओळी कुठेतरी वाचलेल्या होत्या त्या आठवल्या एकदम! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

कविता आवडली

चांदणे संदीप
Fri, 01/15/2016 - 08:03 नवीन
कविता आवडली. वरचे काही प्रतिसाद म्हणजे ____/\____ एका उत्तम कादंबरीतून उतरून काढलेले उतारे वा अधोरेखित केलेली वाक्यच जणू! Sandy
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

मित्रहो
Fri, 01/15/2016 - 10:27 नवीन
आता आम्हालाही काही राहून गेल का ते बघाव लागेल नाहीतर कदाचित आमचेही त्या आजोबांसाखे होइल.
  • Log in or register to post comments

कविता वाचली. मनाला भावली. मग

मृत्युन्जय
Fri, 01/15/2016 - 11:34 नवीन
कविता वाचली. मनाला भावली. मग संदर्भ वाचला आणि कविता अजुनच भावली.
  • Log in or register to post comments

क्या बात ...मस्तच ...

अभिजीत अवलिया
Sun, 01/17/2016 - 14:21 नवीन
क्या बात ...मस्तच ...
  • Log in or register to post comments

आवडली असे म्हणता येणार नाही... पण...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/17/2016 - 14:51 नवीन
कविता वाचताना एका वेगळा अर्थ डोक्यात तयार होता गेला आणि तशी कविता वाचत गेलो. पण.... शेवटचे कंसातले वाक्य मनाला अतिशय क्लेश देउन गेले. परत त्या अनुशंगाने कविता वाचली आणि अधिकच निराशा मनात दाटून आली.
बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही.
राघव यांच्या या वाक्याशी बाडिस... ही कविता उगाचच वाचली असे वाटते आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

:):)

प्राची अश्विनी
Sun, 01/17/2016 - 17:24 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बराच काळ इथे येता आले नाही.

शिव कन्या
Sat, 02/06/2016 - 10:15 नवीन
बराच काळ इथे येता आले नाही. कविता मनाला स्पर्श करुन गेली. पण आजोबांविषयी मन भरुन येते.त्यांची स्थिती आणखी तगमग वाढवणारी. जाणारा जातो उरलेला suffers in million ways. Complexities are heart rendering. Great.
  • Log in or register to post comments

खरयं!

प्राची अश्विनी
Sat, 02/06/2016 - 11:57 नवीन
खरयं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

कवीता नाही आवडली...पण मला असे

टवाळ कार्टा
Sat, 02/06/2016 - 11:19 नवीन
कवीता नाही आवडली...पण मला असे दुखीवगैरे वाचायला आवडत नाही त्यामुळे......पण एक ईडंबन आहे डोक्यात....पाडू का :)
  • Log in or register to post comments

पाडा की!

प्राची अश्विनी
Sat, 02/06/2016 - 11:56 नवीन
पाडा की! बाकी कविता नाही आवडली तरी चालेल, आशा परेरा आवडेल नाहीतर अजुन कोणी! वाइट वाटून घेउ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भावली कविता. असच एक जोडपं

प्रीत-मोहर
Sat, 02/06/2016 - 13:46 नवीन
भावली कविता. असच एक जोडपं पाहण्यात आहे. त्यामुळे तुम्हाला त्या क्षणी काय वाटल असेल हे समजते
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

अनुप ढेरे
Mon, 02/08/2016 - 14:46 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा