नको वाटते..
लेखनविषय:
काव्यरस
नको जीव लाऊ,
नको वाट पाहू,
अता श्वास घेणे
नको वाटते..
कधी आस होती
तुझ्या कौतुकाची,
अता शब्दलेणे
नको वाटते..
कशी चूक झाली,
कुणी चूक केली,
पुन्हा जाब देणे
नको वाटते..
इच्छा निमाल्या.
मनी शांतताहे.
तिला छेद देणे
नको वाटते.
मला साद घाली
खुला पैलतीर,
इथे बंदी होणे
नको वाटते..
(सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )
वाचने
13046
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
:((
:( खूपदा आपण जागे होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण तरी काय हरकत आहे ना! जब जागो वही सबेरा.
______________________!!!
:(
कविता आवडली हेवेसांनल!
आवडली कविता.पण त्या आजोबांना आता चूक लक्षात आली असेल तर.आजींना समजावून सांगता आलं तर पहा,की 'जुने विसरून पुढ्यात आलेले स्वीकारा.त्यातच गम्मत आहे.'
In reply to आवडली कविता.पण त्या आजोबांना by नूतन सावंत
त्यांनी चूक आता सुधारली हे तरी कुठे कमी आहे?
बाकी, कविता खूपच आवडली.
जाणती कविता.
लिहित राहा. अपूर्णतः हीच आयुष्याची खरी मेख आहे.
आजोबांनी कितीही प्रेम केलं असलं तरी ते आजीला पोहचलं नसेल, असंही होऊ शकतं.
दर्द की जुबान होती तो बता देते शायद ;
वो जख्म कैसे दिखाये जो दिखते ही नही
-दिलीप बिरुटे
हवं ते, हवं तेव्हा, हवं त्यांच्याकडून होत नाही... बहुतेक वेळेस, बहुतेक जणांच्या बाबतीत. याला जीवन ऐसे नाव !
आजींना सांगा - better late than never!
"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?"हम्म.. काही 'राहून गेलंय का' ते परत एकदा पहायला हवं याची जाणीव कविता वाचून झाली. तुम्ही छान लिहिता. मोजकं पण सुंदर.
मस्तच
खोलवर भावणारी कविता आहे ही.
रिस रहा हो खून दिल से, लब मगर हसते रहें |
कर गया बर्बाद मुझको, ये हुनर केहेना उसे ||
In reply to रिस रहा हो खून दिल से, लब मगर by सटक
क्या बात!
In reply to क्या बात! by प्राची अश्विनी
धन्यवाद तुम्हाला!! हा शेर मी पूर्वी वेगळ्या अर्थाने घेत असे. आज तुमची कविता वाचून जाणवले की इथेही किती चपखल बसतो आहे अर्थ!
सर्वांना धन्यवाद!__/\__
@ पै ताई, सुरंगी, रुपी, बोका-ए-आझम,
खरंय, हा सकारात्मक द्रुष्टीकोनच जीवनात आनंद निर्माण करतो.
@ बिरुटे सर,
असही असेल. संवाद अपुरा पडला असेल.
पण "इच्छा निमाल्या.
मनी शांतताहे....."
आज्जींच्या बोलण्यातून कुठे तक्रार , राग मला तरी जाणवला नाही, त्यांनी फक्त त्याना वाटलेलं सत्य शांतपणं सांगितलं. मला वाटतं, गीतेतील स्थितप्रज्ञता म्हणजे हीच तर नव्हे ना? कुणी ज्ञानमार्गाने मिळवतो, कुणी भक्तीमार्गाने, कुणी अतीसुखाच्या किंवा दु:खाचा अनुभवातून!
In reply to सर्वांना धन्यवाद!__/\__ by प्राची अश्विनी
छान रचना.. आवडली! :-)
बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही.
Silence might as well be in graveyard.. Peace is where flowers blossom! या ओळी कुठेतरी वाचलेल्या होत्या त्या आठवल्या एकदम!
राघव
कविता आवडली.
वरचे काही प्रतिसाद म्हणजे ____/\____ एका उत्तम कादंबरीतून उतरून काढलेले उतारे वा अधोरेखित केलेली वाक्यच जणू!
Sandy
आता आम्हालाही काही राहून गेल का ते बघाव लागेल नाहीतर कदाचित आमचेही त्या आजोबांसाखे होइल.
कविता वाचली. मनाला भावली. मग संदर्भ वाचला आणि कविता अजुनच भावली.
क्या बात ...मस्तच ...
कविता वाचताना एका वेगळा अर्थ डोक्यात तयार होता गेला आणि तशी कविता वाचत गेलो.
पण.... शेवटचे कंसातले वाक्य मनाला अतिशय क्लेश देउन गेले. परत त्या अनुशंगाने कविता वाचली आणि अधिकच निराशा मनात दाटून आली.
बाकी.. या शांततेला स्थितप्रज्ञता म्हणता येणार नाही असे वाटते. कारण स्थितप्रज्ञतेत समाधान सांगीतलेले आहे.. जे येथे नाही.राघव यांच्या या वाक्याशी बाडिस... ही कविता उगाचच वाचली असे वाटते आहे. पैजारबुवा,
In reply to आवडली असे म्हणता येणार नाही... पण... by ज्ञानोबाचे पैजार
:):)
बराच काळ इथे येता आले नाही.
कविता मनाला स्पर्श करुन गेली.
पण आजोबांविषयी मन भरुन येते.त्यांची स्थिती आणखी तगमग वाढवणारी.
जाणारा जातो उरलेला suffers in million ways.
Complexities are heart rendering. Great.
In reply to बराच काळ इथे येता आले नाही. by शिव कन्या
खरयं!
कवीता नाही आवडली...पण मला असे दुखीवगैरे वाचायला आवडत नाही त्यामुळे......पण एक ईडंबन आहे डोक्यात....पाडू का :)
In reply to कवीता नाही आवडली...पण मला असे by टवाळ कार्टा
पाडा की!
बाकी कविता नाही आवडली तरी चालेल, आशा परेरा आवडेल नाहीतर अजुन कोणी! वाइट वाटून घेउ नका.
भावली कविता. असच एक जोडपं पाहण्यात आहे. त्यामुळे तुम्हाला त्या क्षणी काय वाटल असेल हे समजते
कविता आवडली.
:((