नको जीव लाऊ,
नको वाट पाहू,
अता श्वास घेणे
नको वाटते..
कधी आस होती
तुझ्या कौतुकाची,
अता शब्दलेणे
नको वाटते..
कशी चूक झाली,
कुणी चूक केली,
पुन्हा जाब देणे
नको वाटते..
इच्छा निमाल्या.
मनी शांतताहे.
तिला छेद देणे
नको वाटते.
मला साद घाली
खुला पैलतीर,
इथे बंदी होणे
नको वाटते..
(सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13123
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
:((
:(
!!!!
:(
कविता आवडली हेवेसांनल!
आवडली कविता.पण त्या आजोबांना
हो अगदी!
In reply to आवडली कविता.पण त्या आजोबांना by नूतन सावंत
+१
In reply to हो अगदी! by रुपी
धन्यवाद!:)
In reply to +१ by चाणक्य
जाणती कविता.
आवडली कविता.
सुंदर कविता !
कविता छान!
"जेव्हा वय , मन तरुण होतं
मस्तच
खोलवर भावणारी
रिस रहा हो खून दिल से, लब मगर
क्या बात!
In reply to रिस रहा हो खून दिल से, लब मगर by सटक
धन्यवाद तुम्हाला!! हा शेर मी
In reply to क्या बात! by प्राची अश्विनी
सर्वांना धन्यवाद!__/\__
छान रचना.. आवडली! :-)
In reply to सर्वांना धन्यवाद!__/\__ by प्राची अश्विनी
कविता आवडली
सुंदर कविता
कविता वाचली. मनाला भावली. मग
क्या बात ...मस्तच ...
आवडली असे म्हणता येणार नाही... पण...
:):)
In reply to आवडली असे म्हणता येणार नाही... पण... by ज्ञानोबाचे पैजार
बराच काळ इथे येता आले नाही.
खरयं!
In reply to बराच काळ इथे येता आले नाही. by शिव कन्या
कवीता नाही आवडली...पण मला असे
पाडा की!
In reply to कवीता नाही आवडली...पण मला असे by टवाळ कार्टा
भावली कविता. असच एक जोडपं
कविता आवडली.