Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Tue, 02/23/2016 - 12:59
ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे. २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस आहे; या निमित्ताने आज बहुतेक लोकांची मराठी बद्दलची भावना, आणि त्याबद्दल माझी भावना, काहीशी अशी आहे... आम्हाला इंग्लिश येतंय कशाला थयथय करतोस मित्रा लक्ष कोण देतंय? अरे आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय गुडमॉर्निंग, हाव आर यू? कॉन्व्हरसेशन जमतंय कमॉन, धिस इज द फ्यूचर ज्यात आमचं मन रमतंय गुढीपाडव्याला मेसेजमधे "हॅपी न्यू इयर" येतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय चॉकलेटचे बंगले रिकामे झाले भोलानाथ बोलत नाही ट्विंकल ट्विंकल स्टरशिवाय आम्हाला झोपच येत नाही पाढ्यांची झाली टेबल्स आणि चित्र ड्रॉइंगसारखं होतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय किंग शिवाजी वाचतात मुलं शिवराय कसे कळणार आणि मोठं होऊन न्यायासाठी कुठल्या मुठी वळणार स्वातंत्र्याच्या संग्रामाला फ्रीडम अळणी करतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय जगाची भाषा इंग्लिश तर राष्ट्रभाषा हिंदी आहे खरं सांगतो मित्रा आता मराठीला मंदी आहे असं सगळं बोलायला हे तोंड कसं चालतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय रेस्टॉरंट मधे डिनर होतायत फेस्टिव्हलसाठी शॉपिंग ट्रॅव्हल होतंय वर्क साठी हेल्थ साठी जॉगिंग कुठे नेली रे भाषा आपली हे काय कानी पडतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय जन्मला की 'न्यू अरायवल' मेला म्हणजे 'आरआयपी' जो बघावं मोबाईलमधे इंग्लिश लेटरंच टायपी मग नाव मराठीत लिहितानाही अक्षर अक्षर अडतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय करायचंय काय मराठी? ते जुनं झालंय आता स्कूल इंग्लिश, बाकी हिंदी मराठीचं काय सांगता? साडी, झब्बा सोयीस्करपणे ट्रॅडिशनल वस्त्र ठरतंय पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय कधीतरी कळेल महत्व आशिर्वादाचं, ब्लेसिंग पुढे कधीतरी जाणवेल ओल अश्रूंमधली, टिअर्स पुढे शेवटी 'साल्या' म्हणण्यातलं प्रेम सुद्धा 'डूड' म्हणून थोडंच कळतंय? पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे आम्हाला इंग्लिश येतंय - अपूर्व ओक -----------------------------------

Submitted by उपयोजक on Tue, 02/23/2016 - 20:53

Permalink

छान

पयला मी! छान आहे कविता! खरंच मराठी न आल्यामुळे अडेल असं भरपूर काहीतरी घडायला हवं
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on Tue, 02/23/2016 - 21:03

Permalink

खूप सुंदर …. !

वास्तववादी आहे कविता, खूप सुंदर …. !
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 02/23/2016 - 22:06

Permalink

जमलीय

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 02/23/2016 - 22:08

Permalink

खूप छान कविता.

खूप छान कविता. तुमच्या नावासहीत दुसरीकडे प्रसारीत केली तर चालेल का ते कळवा...
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 08:17

In reply to खूप छान कविता. by खटपट्या

Permalink

हो हो नक्की चालेल.

हो हो नक्की चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on Tue, 02/23/2016 - 22:27

Permalink

छान कविता! चांगली कोपरखळी!

छान कविता! चांगली कोपरखळी!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 02/23/2016 - 23:05

Permalink

झकासच!

आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Tue, 02/23/2016 - 23:46

Permalink

मस्त जमलय. छान

मस्त जमलय. छान
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 02/24/2016 - 00:35

Permalink

छान!

छान!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 02/24/2016 - 02:05

Permalink

कविता आवडली. लाईक करण्यात येत

कविता आवडली. लाईक करण्यात येत आहे. ;) महाराष्ट्रात सगळीकडे मराठी बोलली जातीये अशी कल्पना करायला छान वाटतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 08:18

Permalink

रेवती रातराणी निशांत संदीप खप

रेवती रातराणी निशांत संदीप खप सटक बहुगुणी एप्र केअशु, अनेक आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 02/24/2016 - 08:33

Permalink

कविता आवडली...

असं वाटलं की माझ्याच मनाची व्यथा मांडली आहे. ज्या इंग्रजी शब्दांना मराठीत सोपे प्रतिशब्द नाहीत तिथे काहीतरी अवघड मराठी प्रतिशब्द वापरण्यापेक्षा इंग्रजी शब्द वापरणं समजण्यासारखं आहे. मात्र आई आणि बाबांच्या ऐवजी आज सर्रास ममी/ममा आणि पपा/डॅड/डॅडी हे शब्द ऐकायला मिळतात. वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 02/24/2016 - 09:35

In reply to कविता आवडली... by सतिश गावडे

Permalink

मुळात ....

बरेचदा आपल्याला इंग्रजी येतेय (हे दाखविण्याच्या) अट्टाहासापायी/हौसेपायी असे वापरताना दिसतात.सहज शक्य असलेले वापरातले शब्द जाणीपुर्वक इंग्रजी वापरले जातात आणि मग आवर्जून मराठी शब्द शिकवणार्/शिकणार कधी ? १.तुला भूक लागलीय एक अ‍ॅपल देऊ का? २.ममानी दिलेला टीफीन फिनीश करायचा बर का ! ३.कित्येक अमराठी लोकांना जितके अस्सल मराठी (अगदी कुठल्याही बोलीतले -कोकणी,वर्‍हाडी,खान्देशी ई.) शिकण्याची/सम्जण्याची इच्छा असते तितकी मराठी माणसांमध्ये नाही असे रोचक निरिक्षण आहे पे"रेंट" न झालेला पालक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 02/24/2016 - 09:40

In reply to मुळात .... by नाखु

Permalink

खुद्द वेल्लाभटांच्या

खुद्द वेल्लाभटांच्या प्रतिसादांतूनही बरेच वेळा इंग्रजी शब्द टपकलेले दिसून येतेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 10:56

In reply to खुद्द वेल्लाभटांच्या by प्रचेतस

Permalink

भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे

भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे; उलट इंग्लिश आलंच पाहिजे हा आग्रह आहे. पण मराठीचा गळा दाबून इंग्लिशचा सूर लागतो ना; ते चूक आहे. बाकी मराठी प्रतिसादातून इंग्लिश शब्द टपकतात हे मान्य आहे मला. एवढंच काय वाक्यच्या वाक्य इंग्लिशमधे लिहिलेली आहेत अनेकदा प्रतिसादात. त्याकडे लक्ष देईन पण इतकंच म्हणेन की मराठीतला शब्द माहित नाही म्हणून लिहिलेले ते इंग्लिश शब्द नसतात; ते तिथे चपखल बसतात म्हणून समजून लिहिलेले असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 02/24/2016 - 11:29

In reply to भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे by वेल्लाभट

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 02/24/2016 - 09:54

In reply to मुळात .... by नाखु

Permalink

पे"रेंट" न झालेला पालक नाखु

पे"रेंट" न झालेला पालक नाखु
कारण तुम्ही तुमच्या मुलांच्या स्कुलमधील पेरेंट्स मीटना जात नसाल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 02/24/2016 - 09:39

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Wed, 02/24/2016 - 10:07

Permalink

छान

वेल्लाभाऊ तुमच्या नावासकट चेपु आणि कस्काय वर घेऊन जातो बघा ही कविता आता,
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 10:55

In reply to छान by भीमराव

Permalink

अगदी खुशाल. धन्यवाद. :)

अगदी खुशाल. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 02/24/2016 - 10:30

Permalink

पोएम बेस्ट आहे.

पोएटने महाराष्ट्रीयन पीपलची हायपोक्रसी ईफे़क्टीवली एक्सप्रेस केली असं माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 02/24/2016 - 13:27

In reply to पोएम बेस्ट आहे. by भीडस्त

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 02/24/2016 - 13:32

In reply to :) by पैसा

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Wed, 02/24/2016 - 15:59

In reply to पोएम बेस्ट आहे. by भीडस्त

Permalink

+१ :)

+१ :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 10:56

Permalink

धन्यवाद सगळ्यांचे

धन्यवाद सगळ्यांचे
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 02/24/2016 - 11:09

Permalink

चांगली जमलीये.

चांगली जमलीये. धन्यवाद... (ही कविता वॉट्सअ‍ॅपवरून येइल हे नक्की. पण आपल्या नावासहित येइल याबाबत जरा साशंक आहे.. )
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sun, 02/28/2016 - 08:57

In reply to चांगली जमलीये. by असंका

Permalink

काल आली...नाव नाहीच!! काय

काल आली...नाव नाहीच!! काय लोकांना गंमत वाटते श्रेय काढून घेण्यात ?
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Wed, 02/24/2016 - 11:18

Permalink

मस्त कविता

मस्त कविता
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Wed, 02/24/2016 - 12:00

Permalink

मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र तुमचा

हे मराठी कलाकारांना सांगा कुणीतरी! मराठीच्या नावाने गळे काढतात,आणि एकमेकांशी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हिंदीत बोलतात(मी ऐकलयं) आणि लाज नै ते वर मनसेच्या व्यासपीठावर हजेरी लावतात.आणि परत लाज नै ते ↓ या आशयाचे चित्रपट बनवतात. -मी शिवाजीराजे भोसले बोलतोय -स्वराज्य -जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा -अर्जुन -बाळकडू -संभा:आजचा छावा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 02/24/2016 - 13:28

Permalink

कविता आवडली

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 02/24/2016 - 13:57

Permalink

कशाला हयगय करतोस मित्रा

कशाला हयगय करतोस मित्रा भक्ष्य कोण देतंय? अरे आमचं पोर सायन्स'ला आहे पैशे सायन्स'(च)च देतंय! (असं आम्हाला वाटतंय. ;) ) To be continued... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 02/24/2016 - 14:14

Permalink

वेल्लाभट दगडं! (आयमीन रॉ़क्स!

वेल्लाभट दगडं! (आयमीन रॉ़क्स!) :-) उत्तम कांबळेचं मम्मी ह्या शब्दाचं निरुपण आवडलेलं. आई म्हणजे गावंढळ, मागास, अशिक्षित अशी प्रतिमा असलेली बाई, पण खरोखर तशाच असलेल्या बाईला मम्मी म्हटलं की आपणही जाहिरातीतल्या सुशिक्षित, श्रीमंत, प्रगत, हुच्च मम्म्यांसारखी असल्याचा हुरुप येतो. सांस्कृतीक फरक आहे. पैशाचा प्रभाव भावनांवर, जगण्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Wed, 02/24/2016 - 16:21

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
>>राष्ट्रभाषा हिंदी आहे.
हे खरे नाही. दुवा There is no national language as declared by the Constitution of India.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Wed, 02/24/2016 - 17:34

In reply to कविता आवडली. by वामन देशमुख

Permalink

हो मला माहिती आहे हे.

हो मला माहिती आहे हे. पण एक तर कवितेसाठी व दुसरं म्हणजे वास्तव परिस्थिती म्हणून असं लिहिलं
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 02/25/2016 - 23:33

Permalink

आज माझ्या एका किंचित मिपाकर

आज माझ्या एका किंचित मिपाकर मित्राकडून ही कविता मला व्हाट्सपवर आली. अर्थात त्यात तुमचे नाव नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 02/26/2016 - 00:08

In reply to आज माझ्या एका किंचित मिपाकर by सतिश गावडे

Permalink

ते अपेक्षितच होतं :)

ते अपेक्षितच होतं :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेझी on Fri, 02/26/2016 - 14:39

In reply to ते अपेक्षितच होतं :) by वेल्लाभट

Permalink

मला पण आज तुमची कविता कसंकाय?

मला पण आज तुमची कविता कसंकाय? वर मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावासकट आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 02/26/2016 - 15:19

In reply to मला पण आज तुमची कविता कसंकाय? by क्रेझी

Permalink

:) अरेवा ! हे उत्तमच की. :

:) अरेवा ! हे उत्तमच की. :)माहितीबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 02/27/2016 - 18:35

In reply to :) अरेवा ! हे उत्तमच की. : by वेल्लाभट

Permalink

मलाही नावासह मिळाली

अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sun, 02/28/2016 - 08:56

In reply to आज माझ्या एका किंचित मिपाकर by सतिश गावडे

Permalink

+१ नाव नाही...

+१ नाव नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 02/28/2016 - 09:56

Permalink

कविता आवडली...

व्यथा पण समजली.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Sun, 02/28/2016 - 12:00

In reply to कविता आवडली... by मुक्त विहारि

Permalink

कविता आवडली...

व्यथा पण समजली.... असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 8172 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com