शांत समय अन्...
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती
न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती
धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी
अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई,
माझ्या कविता आणिक गाणी
शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट
उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट
ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ
पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ
दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला
अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला
असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती
बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती
-प्रदिप काळे.
माझा ब्लॉग:
काव्यरस
मिसळपाव
राऊळी या मनाच्या
वृत्तः भुजंगप्रयात
जसा चंद्र हा या महाली नभाच्या
तशी ती वसे राऊळी या मनाच्या
तिला काढिता घोर अंधार दाटे
स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या
तिला वाटले तोडुनी बंध जावे
न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या
तशी