ब्लॉग दुवा हा
मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे. २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस आहे; या निमित्ताने आज बहुतेक लोकांची मराठी बद्दलची भावना, आणि त्याबद्दल माझी भावना, काहीशी अशी आहे...
आम्हाला इंग्लिश येतंय
कशाला थयथय करतोस मित्रा
लक्ष कोण देतंय?
अरे आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
गुडमॉर्निंग, हाव आर यू?
कॉन्व्हरसेशन जमतंय
कमॉन, धिस इज द फ्यूचर ज्यात
आमचं मन रमतंय
गुढीपाडव्याला मेसेजमधे
"हॅपी न्यू इयर" येतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
चॉकलेटचे बंगले रिकामे झाले
भोलानाथ बोलत नाही
ट्विंकल ट्विंकल स्टरशिवाय
आम्हाला झोपच येत नाही
पाढ्यांची झाली टेबल्स
आणि चित्र ड्रॉइंगसारखं होतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
किंग शिवाजी वाचतात मुलं
शिवराय कसे कळणार
आणि मोठं होऊन न्यायासाठी
कुठल्या मुठी वळणार
स्वातंत्र्याच्या संग्रामाला
फ्रीडम अळणी करतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
जगाची भाषा इंग्लिश तर
राष्ट्रभाषा हिंदी आहे
खरं सांगतो मित्रा आता
मराठीला मंदी आहे
असं सगळं बोलायला
हे तोंड कसं चालतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
रेस्टॉरंट मधे डिनर होतायत
फेस्टिव्हलसाठी शॉपिंग
ट्रॅव्हल होतंय वर्क साठी
हेल्थ साठी जॉगिंग
कुठे नेली रे भाषा आपली
हे काय कानी पडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
जन्मला की 'न्यू अरायवल'
मेला म्हणजे 'आरआयपी'
जो बघावं मोबाईलमधे
इंग्लिश लेटरंच टायपी
मग नाव मराठीत लिहितानाही
अक्षर अक्षर अडतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
करायचंय काय मराठी?
ते जुनं झालंय आता
स्कूल इंग्लिश, बाकी हिंदी
मराठीचं काय सांगता?
साडी, झब्बा सोयीस्करपणे
ट्रॅडिशनल वस्त्र ठरतंय
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
कधीतरी कळेल महत्व
आशिर्वादाचं, ब्लेसिंग पुढे
कधीतरी जाणवेल ओल
अश्रूंमधली, टिअर्स पुढे
शेवटी 'साल्या' म्हणण्यातलं प्रेम सुद्धा
'डूड' म्हणून थोडंच कळतंय?
पण आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय
- अपूर्व ओक -----------------------------------
काव्यरस
वाचने
8226
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
खूप सुंदर …. !
जमलीय
खूप छान कविता.
हो हो नक्की चालेल.
In reply to खूप छान कविता. by खटपट्या
छान कविता! चांगली कोपरखळी!
झकासच!
मस्त जमलय. छान
छान!
कविता आवडली. लाईक करण्यात येत
रेवती रातराणी निशांत संदीप खप
कविता आवडली...
मुळात ....
In reply to कविता आवडली... by सतिश गावडे
खुद्द वेल्लाभटांच्या
In reply to मुळात .... by नाखु
भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे
In reply to खुद्द वेल्लाभटांच्या by प्रचेतस
:)
In reply to भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे by वेल्लाभट
पे"रेंट" न झालेला पालक नाखु
In reply to मुळात .... by नाखु
कविता आवडली.
छान
अगदी खुशाल. धन्यवाद. :)
In reply to छान by भीमराव
पोएम बेस्ट आहे.
:)
In reply to पोएम बेस्ट आहे. by भीडस्त
:)
In reply to :) by पैसा
+१ :)
In reply to पोएम बेस्ट आहे. by भीडस्त
धन्यवाद सगळ्यांचे
चांगली जमलीये.
काल आली...नाव नाहीच!! काय
In reply to चांगली जमलीये. by असंका
मस्त कविता
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र तुमचा
कविता आवडली
कशाला हयगय करतोस मित्रा
वेल्लाभट दगडं! (आयमीन रॉ़क्स!
कविता आवडली.
हो मला माहिती आहे हे.
In reply to कविता आवडली. by वामन देशमुख
आज माझ्या एका किंचित मिपाकर
ते अपेक्षितच होतं :)
In reply to आज माझ्या एका किंचित मिपाकर by सतिश गावडे
मला पण आज तुमची कविता कसंकाय?
In reply to ते अपेक्षितच होतं :) by वेल्लाभट
:) अरेवा ! हे उत्तमच की. :
In reply to मला पण आज तुमची कविता कसंकाय? by क्रेझी
मलाही नावासह मिळाली
In reply to :) अरेवा ! हे उत्तमच की. : by वेल्लाभट
+१ नाव नाही...
In reply to आज माझ्या एका किंचित मिपाकर by सतिश गावडे
कविता आवडली...
कविता आवडली...
In reply to कविता आवडली... by मुक्त विहारि