ती आणि ही,
दोघीही एकाच वयाच्या...जवळपास.
तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं.
तिची नेहमीची लगबग,
ही निवांत बसलेली.
आजचा दिवस?
जरा वेगळा,
ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप,
हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!!
पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं.
ती आज थोडी जास्त लगबगीत
ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली.
ती पुढे गेलेली मागे आली,
कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली...
पुन्हा लगबगीत निघाली..
नातवाच्या वाढदिवसाला काय करावं,
हा विचार तिच्या डोक्यात,
ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल
या विचारात गढून गेली
दुसर्या दिवशी तेच नेहमीचं पाहून