मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लढवय्या

कर्नलतपस्वी ·
मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी राजकुमार मी बाबांचा हे साम्राज्य ही माझेच आहे मी फोन उचलला नाही मी भेटही दिली नाही इंद्रापदा करता सुद्धा कधी दंगा केला नाही काकांनी मज समजावले सिंहासन,बाळा तुझेच आहे सुखेनैव राज्य कर तू आता मी तुझ्याच बरोबर आहे सर्वत्र सुखशांती आहे काकांनी मज सांगीतले जा बाळा तू झोपी मी जागा आहे उघडले खडकन डोळे मग सैरभैर मी झालो सेनेने बंड केले, हे मज कुणी सांगीतलेही नाही मग लढता लढता काका दुर निघूनी गेले कधी अभिमन्यू झाला माझा हे मलाच उमगले नाही मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी...... २८-६-२०२२ कृपया हल्के घ्या, मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मागे कुठलाच उद

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

किचनमधून ती सांगते

श्रीगणेशा ·

बेडरुम मधून ती सांगते, झोप झाली आहे, मी धावत जाऊन, बेड टी घेउन येतो, सोफ्या वरुन ती सांगते, कचरे वाली आली आहे, मी धावत जाऊन, दाराबाहेर डस्टबीन ठेवून येतो बाथरुम मधुन ती सांगते, अंघोळ झाली आहे, मी धावत जाऊन, टॉवेल देवून येतो परत सोफ्यावरुन ती सांगते, भुक लागली आहे, मी धावत जाऊन, ब्रेकफास्ट घेवून येतो मग परत सोफ्यावरुन ती सांगते, "आई" ची वेळ झाली आहे, मी धावत जाऊन, रिमोट देवून येतो, ती दरवाज्यातून सांगते, भिशीला जायचे आहे, मी धावत जाऊन, कार सुरु करतो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

इन्वेंटरी मीटिंग मध्ये स्टॉक मॅच का होत नाही यावर खडाजंगी चालू असताना माझ्या तोंडून फिस्स- खिक्क याचा मिश्र आवाज बाहेर पडला आणि लोक माझ्याकडे डोळे वटारून बघायला लागले!

मी बाथरुम मधुन सांगतो, टॉवेल राहिला आहे ती सोफ्यावरुन सांगते, मग तु तसाच बाहेर ये, मी डायनिंग टेबल वरुन सांगतो, खायला हवे आहे, ती सोफ्यासरुन सांगते, झोमॅटो वरुन ऑर्डर दे, मी फोन करुन सांगतो, आज ऑफिस मधे जास्त काम आहे, ती सोफ्यावरुन सांगते, किल्ली ने दार उघडुन आत ये, मी सोफ्याच्या मागुन सांगतो, आज वनडे फायनल आहे, ती सोफ्यावरुन सांगते, मोबाईल वर बघता येते, पैजारबुवा,

>>>किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो. मीही. काही वास. मिक्सरचा आवाज. काही तळलेले असेल. असं अनपेक्षित, अपेक्षित सर्व असतं. मनाची तयारी असतेच. कधी कधी, थांबा घेऊन येतेय. असेही थेट स्पष्ट असते. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 20/12/2021 - 09:51
धन्यवाद सर्वांचे. कैच्याकैकवितेची दखल घेतल्या बद्दल! पैजारबुवांनी तर केवळ प्रतिसाद म्हणून दोन नवीन कविता लिहिल्या आहेत _/\_ दोन्हीही कविता खूप आवडल्या आणि घरोघरी मातीच्या चुली हे पाहून थोडा धीर आला :-)

श्रीगणेशा 20/12/2021 - 12:58
भटार खान्यातून ते सांगतात मी कढई टाकत आहे, धावत जाऊन मी जिलब्या टाकून येतो !
मान्य आहे _/\_ लिहिताना "शब्दांच्या जिलब्या" हा विचार मनात होताच पण मोह आवरला नाही प्रकाशित करण्याचा, म्हणूनच कैच्याकैकविता हा टॅग वापरला. जिलब्या टॅग हवा होता. असो. त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या कितीतरी सरस कविता वाचायला मिळाल्या _/\_

सगळीकड तोच जांगडगुत्ता. पळापळी करतोय म्हणून शांती हाय नायतर शांती काय करल सागंता यायचं नाय. लगे रहो मुन्नाभाई आपल्या घरी पण का येगळ नाई तु जिलब्या कयाला बे पाडतो ती कढाई ठेवते म्हणून.

किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो किचनमधून ती सांगते, वरण करते आहे मी धावत जाऊन, फोडणी करून देतो किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो -- घरून काम करताना.

(चकणा जरा)

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 11/12/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti 11/12/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,

आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.

शून्याशी गाठ

Bhakti ·

गॉडजिला 17/09/2021 - 18:17
तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही... ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही

In reply to by गॉडजिला

राघव 20/09/2021 - 12:44
सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..
हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)

त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... हे पटलं. छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.

शून्यातून​ पाय फुटल्यासारखे आकडा भराभर धावतात... खुप खुप दमल्यावर शुन्याच्या मागे सामावतात... भोपळा भोपळा हिणवले पहिल्यांदा हाच तर गिरवला... डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले... कधी असंच पुढं आल्यावर तो 'पूज्य' राहत नाही कुठल्याशा वळणावर अचानक शून्याशी गाठ सुटत नाही... त्याला पाठीवर घेऊन चालतांना छातीवरल्या आकड्यांंच ओझ कधी जाणवत नाही की अनायसे कुबड भासत नाही... -भक्ती

धत् तेरे की...

प्राची अश्विनी ·

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून ऐवजी जोडव्यांना हात जेव्हा लावला त्याने झुकून असे लिहिले असते तर कवितेला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला असता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जोडव्यांनी अर्थ बदलून जाईल. ( ती विवाहित आहे असे) अर्थात जोडव्यावालीशी भेटी गाठी चालू असतील तर जुन्या आठवणीमुळे, तर तेही चालेल.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालवायला जुनी आठवण हवीच असं नाही काही. आपल्याला जे हवे ते चालवायचं. हाय काय अन् नाय काय. :)

वाह ! तुम्ही अधुन मधून आम्हा हळव्या वाचकांसाठी अशाच कविता लिहिते राहा. आमची कविता अशीच आहे, म्हणजे अशीच कविता आवडते. आता पावसा-पाण्याच्या काळात तिच्या आठवणी सांभाळणे आले. (कोणाचा शेर आहे, माहिती नाही) खत्म हो रहा है अब उसके इश्क का असर अब एक चाय के सिवा हम किसी के आदी नही रहे. -दिलीप बिरुटे (सावरलेला) :)

शानबा५१२ 13/09/2021 - 21:33
मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल. मला पैजणाला हात का लागला व ते पैजण नसुन जोडवा असते तर अर्थात काय फरक पडला असता तेही नाही समजले.

In reply to by शानबा५१२

मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल.
मलाही कविता समजली नाही. भेट अधुरी रहाण्याचे काय कारण ?

In reply to by प्रसाद गोडबोले

अनेक कारणं असू शकतील. पैजारबुवांनी सुचवल्याप्रमाणे जोडवी असतील, तर परस्त्रीला स्पर्श वर्ज्य ई सामाजिक संकेतांचा (दोघांच्याही) मनावर असलेला पगडा. किंवा पहले आप.. चा गोंधळ आणि त्यामुळे निसटून गेलली वेळ.. किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावना सुद्धा आपल्या सारख्याच आहेत का याची नसलेली खात्री. त्यामुळे आपण पुढाकार घेत तला तर तिला/त्याला आपल्या बद्दल काय वाटेल, आपली समोरच्या मनातील प्रतिमा डागाळेल का? ही अनिश्चितता.. समजा काही घडलं आणि नंतर जर दोघांपैकी कुणालाही अपराधी वाटलं तर कोवळं हळवं नातं तुटलं तर ही भिती. शारिरीक ओढीपेक्षाही ते नातं अधिक मूल्यवान असल्याची दोघांनाही असणारी जाणीव... ई. ई बघा पटतंय का. :)

In reply to by तुषार काळभोर

गॉडजिला 19/09/2021 - 13:52
हेच लिखाण लेखकाने केले असते तर. इतका गुंता झालाच नसता… नेमकं कारण सुस्पश्ट सुचवल्या गेले असते :) स्वारी प्राचीजी माझा प्रतिसाद टिका वगैरे दुरुनही नाही, पुरुषांच्या मानसिकतेचे एक निरीक्षण आहे फक्त. (जोडव्यांचा स्पर्श शक्यतोवर टाळणारा)- गॉडजिला

शानबा५१२ 21/09/2021 - 16:21
पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून... ओके ते जोडवी आहे म्हणजे ती स्त्री विवाहीत आहे, मग ह्या व्यक्तीने त्या जोडवीला हात का लावला? आणि ते पण झुकुन? मला पहील्यांदा (खुपवेळा) पुन्हा पुन्हा वाचुन अस वाटल की तो तिच्या घरी गेला होता, तिचे वडील तिथे होते तेव्हा त्याने झुकुन त्यांचे पदस्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. काय रे बाबा, कठीण आहे!

बाजीगर 23/09/2021 - 14:32
राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. between the lines वाचले तर बाजीगर ला असे दिसले की, ह्या डेट मध्ये थोडी (?१) शारीरिक जवळीक व्हावी अशी तिची इच्छा असणार आणि हे महाराज अगदीच संस्कारी निघाले असणार, (बोंब मारल्याची इमोजी...) तेव्हा फ्री-हिट मिळूनही त्याने चौका मारायचा मौका घालवला म्हणून ती नाराज आहे. कविता काही च कळली नाही म्हणणारे ही याच पठडीतले... (गाडीची किल्ली पडली म्हणून तो किल्ली उचलायला वाकला तेव्हा चुकून तिच्या पायांच्या पैंजणांना त्याचा स्पर्श झाला..आणि ती शहारली,मोहरली ) म्हणूनच बाजीगर addition, राजा ने काही च move , न केल्या ने राणी च झाली चेक मेट !! पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

स्वधर्म 24/09/2021 - 12:28
जोडव्यांच्या उल्लेखामुळे गडकरींची एक जुनी कविता आठवली: होईल होईल वाटत होते तेच शेवटी झाले नाव घेतल्यावाचून आता मनात झुरणे आले

तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

(कळेना मला)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

विवेकपटाईत ·
पिंपळाने सोडले गावाच्या पाऱ्याला. फ्लैट मध्ये आला मनी प्लांट झाला. (२) वाळूचे मनोरे वार्यात उडाले. भग्न स्वप्नाची अधुरी कहाणी. (३) कल्पनेला मिळेना साथ शब्दांची. कोरीच राहिली वही कवितेची. (४) पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काटा रुते कुणाला हा दैव योग आहे. भाला रुते कितींना हा मोदी योग आहे.

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया ·
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन