किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे
मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो
किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे
मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो
किचनमधून ती सांगते, वरण करते आहे
मी धावत जाऊन, फोडणी करून देतो
किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे
मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो
किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे
मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो
-- घरून काम करताना.
भटार खान्यातून ते सांगतात मी
किचनमधून ती सांगते,
लैच भारी
छान..!
फिस्सकन हसू आलं!
एक और...
मस्त हो सेठ.
धन्यवाद सर्वांचे.
भटार खान्यातून ते सांगतात मी
मी सांगतो मला कविता सुचतेय..
बिगं बाहेर पडतयं ना भो....
मिपावरुनी ते सांगतात, "दवणें
मस्त आहे की!!!