धत् तेरे की...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
13 Sep 2021 - 11:26 am

तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी
ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी.
तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क
नाही तर hiding feelings is not a simple task!
चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late"
पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

जिन्स आणि झब्ब्यामधे तो दिसत होता सुप्पर cool.
कसं काय सांगणार ती, शब्दच तिचे झाले गुल..
मग काय, जगातले सगळे विषय झाले चावून,
पण त्यात मुद्याची गोष्ट तेवढी गेली राहून.
वेळ गेला वाहून, पण कोरी राहिली त्यांची slate...
अन् तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून
डोळे मिटून त्याचा गंध घेतला तिने माखून..
गजरा होता समोर पण केसात नाही माळला..
एक इंच अंतर; स्पर्श कटाक्षाने टाळला..
To be or not to be चं सालं अडकवणार net.
अन् तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

पाणी सगळं संपलं, तहानेलं करून.
अधुरीशी सल त्यांच्या मनामध्ये भरून.
दोघं आता एकमेकांच्या टाळतात नजरा
पण अजूनही तिच्या घरी सुकलेला गजरा..
खरंच असं घडलं, सांगतं टेबलावरचं paperweight..
....तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही त्यांची भेट..

gholकैच्याकैकविताजिलबीमुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2021 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून

ऐवजी

जोडव्यांना हात जेव्हा लावला त्याने झुकून

असे लिहिले असते तर कवितेला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला असता.

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:47 am | प्राची अश्विनी

हो खरं. अर्र.. आता नाही बदल करता येणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2021 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जोडव्यांनी अर्थ बदलून जाईल. ( ती विवाहित आहे असे) अर्थात जोडव्यावालीशी भेटी गाठी चालू असतील तर जुन्या आठवणीमुळे, तर तेही चालेल.:)

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2021 - 9:18 am | प्राची अश्विनी

चालवायला जुनी आठवण हवीच असं नाही काही. आपल्याला जे हवे ते चालवायचं. हाय काय अन् नाय काय. :)

प्रचेतस's picture

13 Sep 2021 - 11:40 am | प्रचेतस

एकदम मस्त

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 11:48 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.:)

Bhakti's picture

13 Sep 2021 - 1:55 pm | Bhakti

मस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2021 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! तुम्ही अधुन मधून आम्हा हळव्या वाचकांसाठी अशाच कविता लिहिते राहा.
आमची कविता अशीच आहे, म्हणजे अशीच कविता आवडते.

आता पावसा-पाण्याच्या काळात तिच्या आठवणी सांभाळणे आले.
(कोणाचा शेर आहे, माहिती नाही)

खत्म हो रहा है अब उसके इश्क का असर
अब एक चाय के सिवा हम किसी के आदी नही रहे.

-दिलीप बिरुटे
(सावरलेला) :)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2021 - 9:16 am | प्राची अश्विनी

धन्यवाद. :) तुम्हा सर्वांची अशी दिलखुलास दाद मिळाल्यामुळेच लिहायला उत्साह येतो.

शानबा५१२'s picture

13 Sep 2021 - 9:33 pm | शानबा५१२

मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल. मला पैजणाला हात का लागला व ते पैजण नसुन जोडवा असते तर अर्थात काय फरक पडला असता तेही नाही समजले.

जोडवी ही विवाहित स्त्री घालते.
बाकीचं काही सांगत बसत नाही, प्राचीतै सांगतीलच! ;-)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2021 - 9:14 am | प्राची अश्विनी

मर्म राघवाने सांगितलंयच.
पण प्रांजळ प्रतिसाद आवडला. :)

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2021 - 8:23 am | प्रसाद गोडबोले

मला ही कविता समजुन घ्यायची आहे पण मला ह्यातला काहीच नाही समजल.

मलाही कविता समजली नाही. भेट अधुरी रहाण्याचे काय कारण ?

प्राची अश्विनी's picture

19 Sep 2021 - 9:51 am | प्राची अश्विनी

अनेक कारणं असू शकतील. पैजारबुवांनी सुचवल्याप्रमाणे जोडवी असतील, तर परस्त्रीला स्पर्श वर्ज्य ई सामाजिक संकेतांचा (दोघांच्याही) मनावर असलेला पगडा.
किंवा पहले आप.. चा गोंधळ आणि त्यामुळे निसटून गेलली वेळ..
किंवा समोरच्या व्यक्तीच्या भावना सुद्धा आपल्या सारख्याच आहेत का याची नसलेली खात्री. त्यामुळे आपण पुढाकार घेत तला तर तिला/त्याला आपल्या बद्दल काय वाटेल, आपली समोरच्या मनातील प्रतिमा डागाळेल का? ही अनिश्चितता..
समजा काही घडलं आणि नंतर जर दोघांपैकी कुणालाही अपराधी वाटलं तर कोवळं हळवं नातं तुटलं तर ही भिती. शारिरीक ओढीपेक्षाही ते नातं अधिक मूल्यवान असल्याची दोघांनाही असणारी जाणीव...
ई. ई
बघा पटतंय का. :)

तुषार काळभोर's picture

19 Sep 2021 - 1:17 pm | तुषार काळभोर

बरच कॉम्प्लिकेटेड आहे..

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 1:52 pm | गॉडजिला

हेच लिखाण लेखकाने केले असते तर. इतका गुंता झालाच नसता… नेमकं कारण सुस्पश्ट सुचवल्या गेले असते :)

स्वारी प्राचीजी माझा प्रतिसाद टिका वगैरे दुरुनही नाही, पुरुषांच्या मानसिकतेचे एक निरीक्षण आहे फक्त.

(जोडव्यांचा स्पर्श शक्यतोवर टाळणारा)- गॉडजिला

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2021 - 7:24 am | प्राची अश्विनी

मग कविता नसती झाली. दोन ओळीत विषय संपला.;)

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2021 - 7:25 am | प्राची अश्विनी

जोडवं म्हटलं तर जास्त complicated, पैंजणात थोडं कमी.

सुंदर लिहिलंय, नेहमीप्रमाणेच!
मुक्तछंदात लिहिलेलं बरंच वाचलंय पण आशयघनता कमी सापडते. वेगळं कौतुक करायची गरज नाहीच! :-)

प्राची अश्विनी's picture

16 Sep 2021 - 9:13 am | प्राची अश्विनी

:):)धन्यवाद.

स्वलिखित's picture

18 Sep 2021 - 8:29 pm | स्वलिखित

आवडल्या गेली आहे

गॉडजिला's picture

18 Sep 2021 - 10:42 pm | गॉडजिला

करदो, सबको तुम गुडबाय,
मैने प्यार कीया मै आयी,
तो किस बात की है लडाइ…

प्राची अश्विनी's picture

19 Sep 2021 - 9:52 am | प्राची अश्विनी

करेक्ट. तेच गाणं डोक्यात होतं नाव देताना.

तुषार काळभोर's picture

19 Sep 2021 - 8:46 am | तुषार काळभोर

पाणी सगळं संपलं, तहानेलं करून.
अधुरीशी सल त्यांच्या मनामध्ये भरून.
>>
एकदम मस्त.

प्राची अश्विनी's picture

19 Sep 2021 - 9:51 am | प्राची अश्विनी

:) धन्यवाद!

शानबा५१२'s picture

21 Sep 2021 - 4:21 pm | शानबा५१२

पैंजणांना हात जेव्हा लावला त्याने झुकून...

ओके ते जोडवी आहे म्हणजे ती स्त्री विवाहीत आहे, मग ह्या व्यक्तीने त्या जोडवीला हात का लावला? आणि ते पण झुकुन? मला पहील्यांदा (खुपवेळा) पुन्हा पुन्हा वाचुन अस वाटल की तो तिच्या घरी गेला होता, तिचे वडील तिथे होते तेव्हा त्याने झुकुन त्यांचे पदस्पर्श करुन त्यांना नमस्कार केला.
काय रे बाबा, कठीण आहे!

राघव's picture

21 Sep 2021 - 9:50 pm | राघव

=))

प्राची अश्विनी's picture

22 Sep 2021 - 10:14 am | प्राची अश्विनी

=))=))

बाजीगर's picture

23 Sep 2021 - 2:32 pm | बाजीगर

राजा ने काही च move ,
न केल्या ने राणी च झाली चेक मेट !!
पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

between the lines वाचले तर बाजीगर ला असे दिसले की,

ह्या डेट मध्ये थोडी (?१) शारीरिक जवळीक व्हावी अशी तिची इच्छा असणार आणि हे महाराज अगदीच संस्कारी निघाले असणार,
(बोंब मारल्याची इमोजी...)

तेव्हा फ्री-हिट मिळूनही त्याने चौका मारायचा मौका घालवला म्हणून ती नाराज आहे.

कविता काही च कळली नाही म्हणणारे ही याच पठडीतले...
(गाडीची किल्ली पडली म्हणून तो किल्ली उचलायला वाकला तेव्हा चुकून तिच्या पायांच्या पैंजणांना त्याचा स्पर्श झाला..आणि ती शहारली,मोहरली )

म्हणूनच बाजीगर addition,

राजा ने काही च move ,
न केल्या ने राणी च झाली चेक मेट !!
पण.... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..

प्राची अश्विनी's picture

3 Oct 2021 - 4:31 pm | प्राची अश्विनी

:):) हे जाम भारी आहे. आता संस्कारी लोकांवर कविता पाडणे आले.:)

स्वधर्म's picture

24 Sep 2021 - 12:28 pm | स्वधर्म

जोडव्यांच्या उल्लेखामुळे गडकरींची एक जुनी कविता आठवली:
होईल होईल वाटत होते
तेच शेवटी झाले
नाव घेतल्यावाचून आता
मनात झुरणे आले

राघव's picture

24 Sep 2021 - 5:43 pm | राघव

क्या बात है! सुंदर!

प्राची अश्विनी's picture

3 Oct 2021 - 4:30 pm | प्राची अश्विनी

वाह! फार सुंदर!