मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(चकणा जरा)

प्रसाद गोडबोले · · जे न देखे रवी...
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे. जास्त चकणा खाल्ल्याने फक्त आठव्या पेग नंतर आपला "वकार युनुस" होतो अन नंतर अतिषय हुच्च दर्जाची बिर्याणी खाण्याच्या आनंदास आपण मुकतो.

वाचन 5489 प्रतिक्रिया 0