Skip to main content

(कळेना मला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 16/08/2021 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

वाचने 8104
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

छान :=)) - (कळेनासं झालेला) सोकाजी

वाटलेलंच मला. =)) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

वाटलेलंच मला. =)) हे येणार याची खात्री होती!

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ पैजारबुवांचे विडंबन आले की त्यातील पेरणेच्या लिन्क वर जाऊन आम्ही मुळ कविता वाचतो =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

कच्चा माल आवडला तरच करागीर नग घडवायला घेतो........

मस्त

इथला हा शाळेतला निरागस, भाबडा, भोळा विद्यार्थी ... हाच पुढे जाऊन निरागस, भाबडा, भोळा प्रियकर झालाय...

गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी >>> भारीच !

स्वतंत्र कविता व्हावी, वाटावी इतकं छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे