मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एक ग्लास त्याचा....)

सतिश गावडे ·

हे एक वेरिएशन बघा : बसण्याचा हिशोब घरचा एक ग्लास तिचा, एक माझा ! सगळी दारु एकच चढणारही सारखीच फक्त घेण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा! माझी आधी संपेल, तिची नंतर नेहेमीचंच हे पिण्यातलं-अंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी उष्टी... चलाखीदार... बदली पण तरीही.. एक ग्लास तिचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेडेपण वेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..! तिचं सावधपण, माझं उधळलेपणं घेण्यातली आणि भरण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास तिचा, एक माझा! चुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या! कधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर परत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास तिचा....

खिलजि 27/07/2018 - 13:33
वाचतानाच चढली याला काय म्हणावं नशा कि अजून दुसरं काही हे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले जागा मिळेल तिथे प्याले रिचवले कुणी काय तोडले? कुणी काय ओकले ? लक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही आणि असला तरी , ती मजा येत नाही सगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

In reply to by खिलजि

पुंबा 31/07/2018 - 18:02
आज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही
अरेरे खिल्जीभौ. असं नका करत जाऊत. वेळ काढायचा. 'मद्य हे पूर्णब्रह्म' हे जाणून असा.

खिलजि 01/08/2018 - 19:43
मला वाटत हि चालेल ( कल्पना ) नुसती चालणारच नाही तर सुस्साट धावेल एका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी लिहू कशावर तेच कळत नाही आहे कागदावर पडलीय शेजवान चटणी डोळे थोडे झालेत मंद मंद लॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद तिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय बघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय बालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय उद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय जोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही थर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही नारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस सालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल नवख्या गडयांना येतोय आपलाच किळस आताच्या चखण्याला ती चवच नाही काय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय तिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा आता कुठेच दिसत न्हाय आता सोडापाणी गारेगार लागतंय सोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय एव्हढं करूनही चढत न्हाई राव त्याचंच फार वाईट वाटतंय शुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन धुंदीत लिहितात ते काव्यलेखन मागच्या २२ तारखेला करुनि चिकन हाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण सध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर

लेखनविषय:
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार...

म्हणूनच तर मी घोरत होते

माहितगार ·

माहितगार 17/04/2017 - 12:21
हुकते कधी कधी, कधी कविता हुकते कधी विडंबन विसंगतीत नाहीका विलसते जिवन श्रोत्यांची तंद्री हुकते कधी कधी उदार हृदयी क्षमा करून घे ते परी पावन

माहितगार 17/04/2017 - 12:21
हुकते कधी कधी, कधी कविता हुकते कधी विडंबन विसंगतीत नाहीका विलसते जिवन श्रोत्यांची तंद्री हुकते कधी कधी उदार हृदयी क्षमा करून घे ते परी पावन
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला पण तेव्हातर मी झोपेत होते मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती म्हणूनच तर मी घोरत होते प्रेर्ना

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार ·

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 17/04/2017 - 12:32
पहिल्यांदा स्विमिंगपूलवर जाऊन यावा मग गार व्हावा, पाण्यात न उतरताच गार व्हन बरं न्हव! बाकी तसे प्रेर्ना एका पेक्षा अधिक काव्य कथा ती सध्या तो सध्या काय करतो इत्यादी इत्यादी आहेत, पण खरे सांगायचे तर अपूर्ण आहे, मूळात ज्या कवितेचे विडंबन करावयाचे होते ते सुचलेच नाही आणि ऐनवेळी सुचलेल्या शब्दातून कविता वेगळ्याच वळणावर धावली, पुन्हा गावली कि प्रेर्ना

तरूस लगडली सुवासिक आम्रफळे परी कोयी अन बीया मोजतो हा बळे पाण्यात मासे उसळतात रेतीच्या खोप्यास हसतात तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे जळात उतरू कसा प्रश्न हा पडे आर्जवी पाणिते अवीट परी कृष्णास दिसे का मीठ खेळती कधी लहर कधी लाट प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

लीना कनाटा ·

पैसा 25/02/2017 - 21:13
:) तुम्ही कुठे रहाता म्हनायचं?

पैसा 25/02/2017 - 21:13
:) तुम्ही कुठे रहाता म्हनायचं?
लेखनविषय:
काव्यरस
प्रेर्ना - पिरा तैं चा धागा मूळ कविता - गदिमा चला जाउ द्या पुढे हि चर्चा अजुनी नाही धागा संपला इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! आणखी थोडा व्हिजा वाढवू काही वर्षं अजून थांबू इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! नाही गर्दी नाही प्रदूषण जीवन इथले असे विलक्षण उतरा ओझी, विसरा नाती डॉलर पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! घट्ट धरूया आपली संस्कृती सण वार अन रितिभाती ढोल ताशे जोरात वाजवू हिरव्या नोटा छापू इथेच टाका तंबू ! नॉस्टलजीक कधी होऊ आंजा वरती धागे काढू हिअर ऑर टू गो असे संभ्रमु भारत प्रेमाची नशा झिंगु इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू !

(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)

स्वामी संकेतानंद ·

पैसा 17/01/2017 - 22:21
हे काय आहे? याच्यामुळे झाडाच्या फांदीवर चढलेल्या मिपाबायका आणि बुडणारी संस्कृती आठवली!

In reply to by एस

खेडूत 18/01/2017 - 10:07
अरेरे.. तुटली? कशी काय? पर्यटन खाते काय करते तरी काय ? आता एक धातूचं म्युरल बनवून घ्या म्हणावं झाडासारखं, अन आमच्या लाडक्या कलाकारांचे पुतळे सुद्धा! माणसानं सेल्फी घ्यावी कशी?

अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे! कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची? कशासाठी चढवावे टेकू देऊन? झाड होते कुणासाठी मूळ रोवून? जमतात येथे कुणी मुव्हीज बघून! तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची? लोक सारे येती येथे बुलेटवरून वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!' अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची - स्वामी

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

(नाक गळतंय माझं..)

खेडूत ·
लेखनविषय:
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...

नितंब (विडंबन)

दमामि ·

In reply to by पगला गजोधर

मी कविता आवडत होती म्हणून ती ३ ते ४ वेळा वाचली गेली होती पण..... अर्थ लक्षात येत नव्हता. वरील फोटो बघितले आणि कवीला काय सांगायचे आहे ते झटकन समजले. पैजारबुवा,

In reply to by पगला गजोधर

मी कविता आवडत होती म्हणून ती ३ ते ४ वेळा वाचली गेली होती पण..... अर्थ लक्षात येत नव्हता. वरील फोटो बघितले आणि कवीला काय सांगायचे आहे ते झटकन समजले. पैजारबुवा,
लेखनविषय:
काव्यरस
पेर्ना, एक नितांतसुंदर कविता, कदंब. कदंब सळसळणारी वसने देही, विस्तीर्णाचे दान समांतराचा ध्यास बुडाशी, सममितीचे भान गजगामिनी तुझी चाल अन् नाजुकशी पाऊले वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले "हिरवाई"वर तांबूस हळदी, केसर भरले तुरे चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे घटद्वयी की म्हणू नितंब, खूप तुझे भरजरी पानोपानी म्हणून डोलते कान्ह्यांची बासरी अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला मोह वाटुनी सोडून येई आम्रफले बावळा रुंदरुंदशा मऊ गादीसम दाट तुझी सावली मिळेल का विश्रांत जीवाला, छळते मज काहिली

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

अत्रुप्त आत्मा ·

बोका-ए-आझम 17/11/2016 - 19:49
आगोबा आणि आता मला वाटते भिती - हे एकापाठोपाठ - हा योगायोग की जाणूनबुजून?

प्रचेतस 17/11/2016 - 20:26
खी खी खी. मूळ काव्य माहित नसल्याने हे काव्य फारसे मनास भिडले नाही. त्यामानाने हे विडंबन कितीतरी उजवे वाटले.

ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु