मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिलबी

दडपे पोहे.....

माम्लेदारचा पन्खा ·
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चि

(सकाळी सकाळी)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी घाण उग्र भपकारा लांबूनच आला क्वार्टर टाकून आला सकाळी सकाळी फेसाळत्या सोड्यात बर्फाचा मनोरा लिंबू जाउन बसले जरासे बुडाशी पाय जड झाले दृष्टी नाही डोळी अवस्था ही झाली सकाळी सकाळी किती पेग गेले घशातून भरारा म्हणे आठवांचा सुटण्या येरझारा घरचे निष्ठुर म्हणती पितो देशी विदेशी न मिळता सकाळी सकाळी रिकामी बाटली अन पुडी फरसाणाची जणू साक्ष देती नादान पणाची दिसे उभे घेउन कुणी हाती जोडे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे खाडकन उघडावे कुणी तरी खाडकन थोबाडी हाणावे पैजारबुवा,

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..

(वळण)

माहितगार ·
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

तारुण्य पुन्हा जगताना

माहितगार ·
गीत गाऊन रितं होताना विवेक प्रगल्भ निर क्षीर होताना तारुण्यातला अनुभव पुन्हा जगताना रितेपण अधिक मोकळेपणाने भरुन काढताना नेमकं कोण कोण तरुण होत ? कवि, कविचे अनुभव भावना प्रेरणा नी कल्पना की वाचकाची अनुभूती ?

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

कावळा..

प्राची अश्विनी ·
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी, ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा. व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा? कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा? या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा? ( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

(काय करून आलो)

नाखु ·
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

जागरण....

अत्रुप्त आत्मा ·
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!