एक कप तिचा....

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
16 Apr 2017 - 12:44 am

आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!

दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!

माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!

एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!

गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..

एक कप तिचा....
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17880488_1319704728115810_172567209834256293_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=4e396b75284cabf020274632bd197fb3&oe=5953B649
==०==०==०==०==०==०==
अत्रुप्त...

कविता माझीमुक्त कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमौजमजा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा....क्या बात है.

रच्याकने एक तांब्या त्याचा असं इडंबन डोक्यात आहे. टाकु काय ;)!!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2017 - 7:34 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/im-gonna-get-you-smiley-emoticon.png

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 8:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने ते वा वा आईसक्रिम च्या कपाला होतं. कविता लैचं गंडलेली आहे. विडंबन तर होणारचं. =))

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2017 - 11:17 am | टवाळ कार्टा

तांब्या "तिचा"पण असू शकतो की

#सेक्सिस्ट चिमण्या

मितान's picture

16 Apr 2017 - 8:24 am | मितान

गुर्जी रमले तर :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2017 - 8:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

श्श्श्श्श्श्श्श्श!!! डिस्टर्ब करु नका. गुर्जी गणितं सोडवत आहेत. =))

र्रर्रर्रर्रर्रर्र स्वारी बरं का ! चालू द्या =))

प्रचेतस's picture

16 Apr 2017 - 8:40 am | प्रचेतस

ओके

यशोधरा's picture

16 Apr 2017 - 10:09 am | यशोधरा

खूपच गोड लिहिलं आहे. आवडलं. ह्या चिमण्याचं काय ऐकताय!

अभिजीत अवलिया's picture

16 Apr 2017 - 10:34 am | अभिजीत अवलिया

मिपाचे शीघ्रकवी...

पैसा's picture

16 Apr 2017 - 10:48 am | पैसा

छान आहे!

इतक्या छोट्या छोट्या कपांतही कल्पना अन प्रेम शोधणारा कवि!
उटकमंडलम, नैनितालला जाईल तेव्हा मोठे महाकाव्यच लिहिल हा!

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2017 - 2:19 pm | टवाळ कार्टा

तुम्हाला "तिथे जाउन आल्यावर" असे म्हणायचे आहे का?

कंजूस's picture

16 Apr 2017 - 4:47 pm | कंजूस

कविमन लागते हो त्याला.
नाहीतर सातारा रोडवरचे चणे आणि महाबळेश्वरचे चणे यांत काय फरक असे म्हणाल टकाभाउजी.

संजय क्षीरसागर's picture

16 Apr 2017 - 1:41 pm | संजय क्षीरसागर

नेहेमीच्यापेक्षा काही तरी वेगळा विषय `हाताळला' !

सतिश गावडे's picture

16 Apr 2017 - 1:52 pm | सतिश गावडे

खत्री दिसत आहे आईस्क्रीम.

पद्मावति's picture

16 Apr 2017 - 2:14 pm | पद्मावति

मस्तच.

सूड's picture

17 Apr 2017 - 9:45 pm | सूड

असो. =))