मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एक ग्लास त्याचा....)

सतिश गावडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा बसण्याचा हिशोब साचा एक ग्लास त्याचा, एक माझा! दिसायला दोन्ही एकच ब्रँडही सारखाच फक्त चखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा! माझा आधी संपेल, त्याचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक ग्लास त्याचा, एक माझा! एकत्र बसून थोडं वेगळेपण वेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..! त्याचं सावधपण माझं झोकांडणं बसण्यातली चखण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक ग्लास त्याचा, एक माझा! बिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं.. अगदी नेहेमी.. एक ग्लास त्याचा.... asdf

वाचन 22822 प्रतिक्रिया 0