(गफ)
पेरना
आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..
मिसळपाव
चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ...
तिकडे दूर इस्माईल बसला आहे...
केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...
एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
आणि एक वाळूचे घड्याळ...
अजुनही मागे मागे....
जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र
