Skip to main content

इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

Published on शनीवार, 25/02/2017 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेर्ना - पिरा तैं चा धागा मूळ कविता - गदिमा चला जाउ द्या पुढे हि चर्चा अजुनी नाही धागा संपला इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! आणखी थोडा व्हिजा वाढवू काही वर्षं अजून थांबू इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! नाही गर्दी नाही प्रदूषण जीवन इथले असे विलक्षण उतरा ओझी, विसरा नाती डॉलर पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! घट्ट धरूया आपली संस्कृती सण वार अन रितिभाती ढोल ताशे जोरात वाजवू हिरव्या नोटा छापू इथेच टाका तंबू ! नॉस्टलजीक कधी होऊ आंजा वरती धागे काढू हिअर ऑर टू गो असे संभ्रमु भारत प्रेमाची नशा झिंगु इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! मिस यू मिस यू मम् मातृ भू मिस यू मिस यू मम् मातृ भू अधे मध्ये गळे काढू इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! जय मराठी जय आम्रविका
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2483
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

:) तुम्ही कुठे रहाता म्हनायचं?

:)