वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या,
माहित नाही खास, काय घडले विशेष!
पण हाय!! निकर कड्यावरून घसरले,
अन मैना सगळ्या फांद्यांवर दिसल्या.
जितकी विद्वत्ता जास्त, तितक्या त्यांच्या मैना सप्तरंगी!
त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला.
‘निकरवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’
हाती लेखण्या घेतल्या, आणि निकर उडवणाऱ्या वादळामागे मैना सावरत मूढ सगळ्या अमाप धावल्या.
वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले,
‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’
......... ..............
काही वीरांगणा कृतिशील! फार चळवळ्या!