मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनर्थशास्त्र

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी ·
( प्राचीताई माफ करशील ना ग? ) जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे. "अगं, शिट्टी!" मी मग चिडून शिट्टी लावेन. "जमलं!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन, कुकरजवळ नेईन. तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील मी म्हणेन भाजू देत. शिट्ट्या होतीलच कुकरला.

(वळण)

माहितगार ·
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

ती संध्याकाळ

माहितगार ·
१ कोणा आटपाट शहराच्या आटपाट गल्लीतील आटपाट मिरवणूकीत फेटा घालून ढोलचा ताल साद दिली 'लय भारी' रक्षकाने धक्का दिला पतल्या गल्लीतून तो सरळ रस्त्यावर परतला ;) पण ती संध्याकाळ तो फेटा तो ढोलचा ताल ती साद तो धक्का कुणा मनाच्या कोणा कोपर्‍यातून जाण्याचे नाव घेत नाही.:) २ काय कराव? गणित सोडलं बॅलन्सशिट घेण्याचा प्रयत्न केला ना मेळ ना ताळ जमलेल्या संध्याकाळच्या infinite बडबडीत नक्कीच हरवून गेलो असतो पण इस गली उस गली मन भटकत राहीले तेव्हा कविता लिहू लागलो.

तुला बापू म्हणू की बाप्या ?

माहितगार ·
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची

(गंमत केली" म्हणालास तू)

ज्ञानोबाचे पैजार ·
प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते. "गंमत केली" म्हणालास तू मिपा वर पण सगळे पेटले तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. प्रतिक्रियले असंख्य त्यावर धागा नवा तू जेव्हा काढला मते वाचता एकेक खवचट मनी असंख्य तरंग उठले. नुसते +१, ठाक कोरडे पोचते तरी बघ बोच त्यातली. आभ्यास वाढवा, चपला घाला डू आयडी ने पिंकून टाकले . म्हणो कुणी ही मिपा दुनिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. पैजारबुवा,

दुष्ट दुष्ट बायको!

अत्रुप्त आत्मा ·
पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

(गफ)

टवाळ कार्टा ·
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..