लेख

आजोळच्या गोष्टी १ आणि २

गुळाचा गणपती's picture
गुळाचा गणपती in जनातलं, मनातलं
3 Jan 2015 - 2:14 am

आईचं गाव औदुंबर.
चांगला तासभर धुरळा उडवला कि बस पोचवायची ते औदुंबर फाट्यावर. लाडका मामा गाडी घेऊन बराच वेळ उन्हात, पावसात वाट पाहत असायचा. मोजकीच घरे असल्याने गावातील हरेक गृहस्थ माझ्या घरच्यांना माहितीच असायचा. अगदीच न्यायला कोणी आले नसल्यास लिफ्ट मागणे आणि लिफ्ट मिळाल्यावरचा आनंद म्हणजे....! एखाद्या बैलगाडीतून जायला मिळणे म्हणजे पर्वणी असायची. उगाचच चक-चक आवाज काढत घरापर्यंत पोचायचे ते म्हणजे जणू मी गाडी हाकत आणली अशा आविर्भावात.

कथाराहती जागालेख

मनीभायच्या अड्यावर- स्टॉक स्प्लिट

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 11:48 am

"नमस्कार मनीभाय!"
"राम राम ! पक्या, आज हिकड कस्स काय आलास?"
"काय नाय मनीभाय सहजच आलतो."
"तु काय सहज येणार न्हाईस. बोल काय काम काढल."
"मनीभाय एक शंका विचारायची होती."
"हां आता आलास ना लाईनीवर...ईचार काय शंका हाय तुला?"
"मनीभाय,स्टॉक स्प्लिट म्हणंजे काय?"
"कसला ष्टॉक!!! ड्राय डे च ईचरतोस काय?"
"नाही.स्टॉक म्हंणजे.कंपनीचा स्टॉक..शेअर..समभाग."
"अर आस बोल की,आता शेअर स्प्लिट मंजे बघ...हां ...हा माझा खंबाच घे की उदाहरण म्हनुन."
"मनीभाय,खंबा नको..दारुच उदात्तीकरण होईल."

मुक्तकलेख

तो आणि आम्ही

अभिदेश's picture
अभिदेश in जनातलं, मनातलं
26 Dec 2014 - 9:30 am

Virat ची Adelaide ची innings बघितली .... १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी झाली. आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या .

क्रीडालेख

"ती" दोघं

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
26 Dec 2014 - 1:24 am

..

महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती.

रेखाटनलेख

Happy new year!!!

Maheshswami's picture
Maheshswami in जनातलं, मनातलं
24 Dec 2014 - 4:44 pm

बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने .
"साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा . भोत काम है कल."

कथालेखअनुभव

परवाना !

Maheshswami's picture
Maheshswami in जनातलं, मनातलं
22 Dec 2014 - 6:02 pm

लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं!

कथालेख

शोध थंडीच्या मीटरचा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
20 Dec 2014 - 1:48 pm

तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे , कुणी शोध लावला आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात. बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते.

कथालेख

वाणप्रस्थाश्रम,मेंढपाळ -राजा आणी काहीबाही...

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
20 Dec 2014 - 11:49 am

थंडीच काळ आणी रात्रीचा वेळ,यष्टीतुन प्रवास करताना मस्त पेकी डुलकी लागत होती..
तेवढ्यात डोक्यावर टपली बसली,चिडुन मागे पाहील..मक्या होता "अय लिंबुटीबुं काय झोपतो.. बघ बाहेर जरा पळ्ती झाडे
आणी मस्त चांदण पडलय"
शेजारी बसलेला सुरज्या कानात कुजबुजला"च्या आयला,चांदण काय ह्यांच्या सोबत बघायच अस्त का ?थंडीत मस्त घरी
घरी पडायच सोडून नस्ती लफडी करतोय आपण"
मी काय बोलायच विचार करत स्वतःला लागणारी झोप आवरायाचा प्रयत्न करत होतो..पण मागच्या सिटवर बसलेले
मक्या,रावसाहेब,आणी बा़किची संघटना डोक्यावर टपल्या मारून मला जागा करायची,काही आवाज करायची सोय नाय.

धोरणमुक्तकप्रकटनसमीक्षामाध्यमवेधलेखअनुभवमत

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
18 Dec 2014 - 8:36 pm


एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

पहीला भाग इथे पाहता येईल
h
एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता.

इतिहासकथातंत्रलेख