मुक्तक

चक्रव्युह....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
2 Sep 2022 - 8:53 pm

ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा

सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया
वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया

अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला

जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले

भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा
राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता.....
२-९-२०२२

इशाराकालगंगामुक्तकसमाजजीवनमानअर्थव्यवहार

जाणिवांची बाराखडी

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
13 Aug 2022 - 3:19 pm

कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????.....

कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब.....

कसा शमवता येईल शब्दांतून ???

भर दुपारी उन्हाने तापलेल्या एकाकी डांबरी रस्त्यावर चालताना छोट्या अनवाणी पायांची होणारी लाही-लाही आणि त्यात मध्येच पायाखाली आलेल्या चुकार टोकदार दगडाच्या दंशाने पापण्यांच्या कडांमध्ये दाटून आलेला वेदनांचा पूर....

कवितामुक्तक

अधुनिक तीर्थक्षेत्रे....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
12 Aug 2022 - 11:37 pm

राजगुरुनगर ते हुसैनीवाला......

"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..."
- हुतात्मा भगतसिंग

२३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते.

इतिहासमुक्तकविचारसद्भावनासमीक्षा

नाते प्राजक्ताचे

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Aug 2022 - 12:21 pm

सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.

मुक्तकविचारलेखअनुभव

श्रावणही आला फिरूनी

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
9 Aug 2022 - 8:43 am

श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी

शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

सरली शेतातली पेरणी
फुलले ताटवे जल धारांनी
पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|

मुक्तक

नकोस विसरू

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Aug 2022 - 7:30 am

नकोस विसरू-
कोसळणार्‍या
प्रपातातल्या
जलबिंदूच्या
खोल आतवर
कल्लोळाच्या
अब्जांशाचा
निनाद असतो

नकोस विसरू-
माथ्यावरती
ओणवलेल्या
निळ्यासावळ्या
घुमटावरल्या
नक्षत्रांच्या
दंतकथांना
शेवट नसतो

नकोस विसरू-
दाट धुक्याच्या
पल्याडचे जग
धूसरताना
अस्तित्वाच्या
काचेवरती
आभासाचा
चरा उमटतो

नकोस विसरू-
पैलतिराच्या
अनाहताशी
ऐलतिराच्या
कणाकणातील
कोलाहलही
रुणझुणणारे
ध्रुपद साधतो

मुक्तक

पानात लपलेल्या फुलाला पाहून...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
1 Aug 2022 - 12:34 pm

मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही. बागेतली फुले सगळ्याची,कुणा एकाचि नाही,हवी आसतील तर विकत आणा तेव्हढेच शेतकर्यान चार पैसे मिळतील.

mipa

आशाच एका वळणावरती
दिसली मजला हिरवी पाने
लपले होते फुल सयाने
उधळत होते गंध तराणे

निरागस,निरामय,प्रफुल्ल
डोलत होते वार्‍या संगे
धुंदी होती नव यौवनाची
तमा न होती त्यास उद्याची

दृष्टीकोनमुक्तक

ब्रह्मानंदी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
30 Jul 2022 - 12:35 pm

इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी.

रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी.

मुक्तकविरंगुळा

श्रावण

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
29 Jul 2022 - 6:14 pm

काळ्याशार पाटीवर
पांढरी शुभ्र रेघ
ग्रीष्माच्या पाठीवर
काळे काळे मेघ
खरपुस ताबुंस मातीवर
हिरवी चंद्रकळा
प्राजक्ताच्या झाडाखाली
मोतीयाचा सडा

सुखावली धरती
सुखावली मने
इवल्या इवल्या रोपानी
डुलती हिरवी राने

चिंब झाले मन
रुंजी घालतो साजण
उभा भाऊ दारी म्हणे
आला पंचमीचा सण

मन पाखरू पाखरू
पोचले आईच्या पायाशी
डोळ्यात श्रावण भरून
उभा साजण दाराशी

२९-७-२०२२

निसर्गपाऊसमाझी कविताकवितामुक्तकशब्दक्रीडा