कवितेत भेटती...
लेखनविषय:
- Read more about कवितेत भेटती...
- Log in or register to post comments
कवितेत भेटती डोह कधी
कधी कोडे सहज न सुटणारे
कधी आभासी जगतामधले
अस्पर्श्य, अलख, मोहविणारे
कधी लाट विप्लवी, विकराळ,
फेसाळ, किनारी फुटणारी,
शोषून उषेचे सर्व रंग,
नि:संग निळीशी उरणारी
कधी व्याधविद्ध मृगशीर्षासम
मिथकांशी पाऊल अडखळते
कधी चंद्रधगीच्या वणव्यातून
नक्षत्र वितळणारे दिसते
कधी ओळींच्या मधली जागा
अस्फुट ऊर्जेने लवथवते
शब्दातून अवचित ओथंबत
अलगद काही हाती येते
पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.