ना कुठला पापी होतो ना व्यसनी टुकार होतो
नियतीच्या खेळामध्ये मी दुबळी शिकार होतो
दुःखात माखला जन्म त्या जखमा पदोपदीच्या
अनिवार यातना ज्यांचा मी मुकाच हुंकार होतो
सन्मार्ग चाललो तरीही हे दारात उभे दुर्भाग्य
नजरेत जणु दैवाच्या मी अगदी भिकार होतो
त्या बेफाम सागरामध्ये मी क्षुद्र जणु नावाडी
प्रलयास द्यावया झुंज मी कुठे चमत्कार होतो
अविरत जरीही लढलो सुखशिल्प नवे कोराया
परि स्वर्ग निर्मिण्या येथे मी खुजा शिल्पकार होतो
ही गुढ भासली दुनिया स्वार्थाच्या जंजाळातील
पण गुढ उकलण्याजोगा मी कुठे जाणकार होतो
हे अंगण फितुर झाले त्या स्वप्नांच्या पर्णकुटीचे
अन् इतका असुन द्रोह मी कसा निर्विकार होतो
त्या फसव्या ललाटरेषा नि फसवेच पाप-पुण्य
नशिबाच्या वाटेवरचा मी भटका चुकार होतो
स्वप्नांत अडकला जीव परि राख जाहली त्यांची
स्वप्नांस रक्षिण्या तेव्हा मी थिटा प्रतिकार होतो
-शार्दुल हातोळकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5606
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
गझल पोचली आणि आवडलीही
छानच आहे. आवडली.
धन्यवाद
वाह!!!!!!!!
अ प्र ति म!
धन्यवाद!
आवडली ..
कपटाचे टाकत फासे, जेंव्हा
आवडली
वा.... वेल्लाभट !!
वृत्त कुठले आहे बादवे?
वृत्त माहित नाही.....
In reply to वृत्त कुठले आहे बादवे? by विशाल कुलकर्णी
आवडली!
चांगली कविता :)
धन्यवाद मंडळी !!