लेखकनाहिद नालबंदयांनी बुधवार, 13/12/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा भेटून पाहू
ये पुन्हा बोलून पाहू
मागचे विसरुन सारे
भूमिका बदलून पाहू
क्रोध, मत्सर, मद वगैरे
षडरिपू टाळून पाहू
पावतो बाप्पा म्हणे हा
चल नवस बोलून पाहू
बस जरा साथीस 'नाहिद'
ही गझल गाऊन पाहू
मिपावरील प्रवास एक तपा पेक्षा जास्त पण लिहिण्यात पंचवार्षिक योजना का राबवताय.
एका दमात सर्व वाचून काढले. सर्वच आवडले.
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
काय दळतो, कसे दळतो जरा पारखून पाहू
आवडते काव्य, म्हणूनी शब्दात हरवून पाहू
आवडल्या रचना, जरा कवितेत हरखून जाऊ
प्रतिक्रिया
अहाहा
ये, एकदा बसून पाहू म्हणा...
चेहरा नवा दिसतो म्हणूनी जरा निरखून पाहू
साधी आणि बंदिस्त! आवडली!