नको सत्ता

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जे न देखे रवी...
7 Nov 2020 - 1:15 pm

(गैरमुरद्दफ गझल)

नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली गंमत

कधी होणार तू माझी
कळू दे ना तुझेही मत

सभोती रंग मुबलक पण
निराळी ही तुझी रंगत

(समाप्त)

gazalगझल

प्रतिक्रिया

केदार पाटणकर's picture

23 Nov 2020 - 12:22 pm | केदार पाटणकर

आवडली नसेल तर तसा प्रतिसाद द्या. त्याचेही स्वागत आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

नाही आवडली,

गजल आहे म्हणून प्रत्येक शेर वेगवेगळा वाचून पाहिला पण तरी आवडली नाही.

खरे तर एखादा लेख कथा किंवा कविता आवडली नाही तर प्रतिसाद देणे उचित वाटत नाही. कारण ती कलाकृती लेखकाला भावलेली असते.

पण इथे तुम्ही आवहान केले आहे की आवडली नसली तरी प्रतिसाद द्या, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

पैजारबुवा,

केदार पाटणकर's picture

24 Nov 2020 - 11:08 am | केदार पाटणकर

पैजारबुवा, प्रतिसादाखातर आभारी.
तुमची - आवडली नसेल तर प्रतिसाद देणे योग्य वाटत नाही - ही भूमिकाही चिंतनीय आहे.