दाल बाटी व दाल बाफले
Taxonomy upgrade extras
चतुरंगजींच्या विनंतीस मान देउन हे लेखन वेगळे देत आहे.
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.
लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.
दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.
ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.
बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:
बाटी:
माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.
ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.
बाफले:
माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.
ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्यांवर मंदपणे भाजावेत.
हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.
टीपः शहरात गोवरर्यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.
संजय अभ्यंकर
वाचने
14218
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वरिल लिखाणात, चतुरंगजींच्या ऐवजी सुनीलजी असे हवे होते.
चुकि बद्दल क्षमस्व!
संजय अभ्यंकर
बाटी करताना त्यात १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा घालतात.
बाकी मस्त च लागतो हा पदार्थ.
वा वा! ही आमची आवडती पापकृती..
संजयराव, अजूनही पाककृत्या येऊ द्यात!
तात्या.
अवांतर - शक्य झाल्यास आपले नांव (लॉगीन आयडी) देवनागरीत करा ही विनंती..
आपला,
(मराठी) तात्या.
In reply to आवडती पाककृती.. by विसोबा खेचर
लगेच करतो.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
In reply to लॉगीन आय डी मराठीत! by संजय अभ्यंकर
अभ्यंकर साहेब,
धन्यवाद!
(आपला आणि केशवसुमारांचा आडनांवबंधू) तात्या.
In reply to धन्यवाद by विसोबा खेचर
तात्या,
संजय अभ्यंकर हे मान्य!
पण तुम्ही आणि केशवसुमार कसले "अभ्यंकर"? तुम्ही तर "भयंकर"! :))
(थट्टेखोर) पिवळा डांबिस
अय्या असाच कहिसा थोडा वेगळा ... प्रकार म्हणजे बट्टी ....
जाड्सर गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा ., चवीनुसार मीठ.... ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. मग ते गोळे गार झाल्यावर त्याचे २-२ तुकडे करावे. कढईत तेल्/तूप गरम करुन ते तुकडे मस्त पैकी तळून घ्यावे. कुर्कुरित .. ही झाली बट्टी ... ही तुम्ही साध्या वरणा सोबत्...मस्तपैकि मोडुन त्यावर साधे वरण ... गावराण तूप... आणि सोबत वान्ग्याची भाजी... आहा !.... हा झाला... खान्देशी वरण बट्टी चा बेत....
कृपया वरील रेसिपी ओवनमधे कशी करता येइल हे शक्य असल्यास सांगावे
धन्यवाद !!
जरी गोवर्या मिळत नसतील तरी कोळशाची शेगडी सहजी मिळते.
त्यात सुद्धा बट्ट्या खुसखुशीत भाजता येवू शकतात.
ओवन पेक्षा हा पर्याय नक्कीच खुमासदार चव आणतो.
दाल बाटी / बाफले