मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवाजी महाराज

छत्रपति ·

सुनील Fri, 01/18/2008 - 21:27
आपण छत्रपति आहात! बॉल असा थेट दुसर्‍याच्या कोर्टात टाकण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या सर्विसने सुरुवात केली असतीत तर बरे झाले असते. आणि कसले लिखाण आपल्याला इथे अपेक्षित आहे? नुसतीच माहितीची जंत्री की, त्यावर आधारीत काही विवेचन वगैरे? तुम्ही सुरुवात तर करा. आम्ही वाट पाहत आहोत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छत्रपति Fri, 01/18/2008 - 21:39
अस॑ असेल तर ही घ्या माझ्या कडून सुरुवात.... शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...?

In reply to by छत्रपति

ऋषिकेश Fri, 01/18/2008 - 21:45
शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...? स्वाभिमान, दिशा आणि विश्वास!

In reply to by छत्रपति

चतुरंग Fri, 01/18/2008 - 22:03
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा! विकिपीडिया वरील http://en.wikipedia.org/wiki/Shivaji हा दुवा वाचा. एकाच ठिकाणी बरीच माहिती मिळेल. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचे काय वर्णन केले आहे ते "निश्चयाचा महामेरु" (ह्याचा दुवा माझ्याकडे नाहीये, कोणाकडे असल्यास द्यावा) ह्या काव्यात वाचावे म्हणजे राजांसाठी मावळे असे का बावळे झाले ते कळेल!! चतुरंग

सुनील Fri, 01/18/2008 - 22:14
शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...? त्यांच्या गुलामगिरीची जाणीव ! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत Fri, 01/18/2008 - 22:53
खरं तर प्रत्येकाला ही मोगलाई नकोशी झाली होती. ज्यांचे हितसंबंध ह्या मोगलाईत जपले गेले होते तेच केवळ ती टिकावी म्हणून प्रयत्न करत होते. मोगलाईचे स्वरूप पाहता जहागिरी हेच इमान असलेले बडे धेंडं ती टिकावी असे प्रयत्न करत. सामान्य लोकांसाठी अत्यंत अन्यायकारक होती. वेळोवेळी त्याविरुध्द भडका होत सुध्दा असे पण त्याला भक्कम पाया नसे. शिवाजी महाराजांच्या सोबत मोठी झालेल्या मंडळींत सामान्य वर्गच मोठ्या प्रमाणात होता. ह्या सर्वांना शिवाजी महाराजांनी एक विचार दिला, त्याला योग्य असा आचार दिला आणि योग्य प्रमाणात शक्ती व युक्तीची जोड दिली. त्यातून तयार झालेले रसायण अजोड होते. हा सगळा प्रकार एका दिवसात झाला नव्हता. जीजाऊंनी अत्यंत योजनाबध्द हा प्रवास सुरू केला होता. जनसामान्याच्या भावभावना समजून त्यांना हात घालून त्यांना निर्भय व शूर करणे ह्याची सुरूवात , गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून दिलेल्या उत्तराने होते. लांडग्यांच्या शेपटीला दिलेला मोबदला अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यातून या सामान्य मावळ्यात आत्मविश्वास पेरल्या गेलेला दिसतो. शिवाजी महाराजांना आपल्या सैन्याची शक्तीस्थळे माहिती होती तसेच कमकुवत बाजू सुध्दा माहिती होत्या. कुठलाच लढा भावनेच्या आहारी जाऊन लढू नये असे त्यांचे स्पष्ट मत. त्यामुळे थोड्या थोड्या कारणांसाठी मरू किंवा मारू करणारा मावळा... आज जिंकू किंवा उद्या पण जिंकणार आम्हीच असं म्हणून लढाईत उतरू लागला , मैदान मारू लागला. शक्ती कमी पडताना दिसल्यास खुशाल मराठी सैन्य तेथून पळ काढी... पुन्हा ताकद जमवी आणि हल्ला करित असे. लढाईचा शेवट विजयात होत असे. हा संस्कार शिवाजी महाराजांनी रुजवला होता. अफजल खानाच्या वेळी जेव्हा खानाचे पारडे जड होते आणि आपले आपले म्हणावे असे जवळचे खानाला मिळाल्याने शिवाजीमहाराजांच्या सैन्यात थोडी निराशा होती. मात्र आई भवानीने स्वतः दृष्टांत देऊन आपल्या तलवारीत प्रवेश केला आहे आणि आता ही तलवार भवानी तलवार आहे असं घोषीत करून महाराजांनी आपल्या सैन्यात एक नव चैतन्याचा संचार केला. आज आपण याला सहज कुठलंही मानसशास्त्रीय संज्ञेचं नाव देऊ शकू पण महाराजांनी हा प्रयोग त्या काळात प्रत्यक्ष केला. शिवाजी महारांजांचा हिंदवी स्वराज्याचा विचार आणि त्या योगे असलेला त्यांचा आचार हाच सामान्य मावळ्याला पराकोटीचं बळ देत असेल. नीलकांत

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 07:56
पासून आपल्या मातीतील सरदार, जमीनदार, व्यापारी व इतर धनिक परकीय शासकांना सहाय्य करीत आले व स्वतःची तुंबडी भरत आले. परकीय राज्यांत देखील ते सुखीच होते. सामान्य शेतकरी व कष्टकरी यांना कोणी वाली नव्हता. या सामान्य व शेतक-यांना व कष्टक-यांना एकत्र करून त्यांचे राज्य शिवाजीने स्थापन केले. पूर्वीच्या जमीनदार व सरदारांनी शिवाजीला विरोधच केला. माझ्या मताप्रमाणे समाजाच्या तळागाळातून नेते व योद्धे तयार करणारा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील इतिहासातील पहिला समाजवादी राज्यकर्ता शिवाजी होय. येथे मी शिवाजी महाराजांचा प्रेमाने एकेरी उल्लेख केलला आहे. त्यांचा उपमर्द करण्याच्या दृष्टीने नव्हे. कोणत्याही धर्माची व्यक्ती ती एकनिष्ठ असल्यास तिला तिच्या योग्यतेप्रमाणे पद मिळत असे. त्यांचे राज्य ख-या अर्थाने सर्व धर्म समभाव ठेवणारे व निधर्मी होते. समाजिक व आर्थिक न्याय असलेले व कायदा सुव्यवस्था असलेले सामान्य माणसाला सुरक्षा असलेलेल राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले.

शिवाजी महाराज खर॑ तर शिवाजी महाराजा॑बद्दल लिहायच॑ कस॑ हा प्रश्नच आहे.... मी इथे काही लिहिणार नाहिये... मला त्या॑च्या बद्दल माहिती हविये... (तुमच्याकडुन) पण इथे लिहिणार्‍या॑ना काहि स॑केत पाळावे लागतील... १) कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी आणि जबाबदारी लिहिणार्‍या॑ची असेल. २) कृपया साइट ची अमूल्य जागा लक्षात घेता उगाचच कुठलीही माहिती देवु नये.... उदा. जन्म,जन्मठिकाण, आइचे नाव, वडिला॑चे नाव वगैरे वगैरे वगैरे...

" सखी "

पेशवे बाजीराव तिसरे ·

विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 18:32
सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू .. क्या बात है! केवळ अप्रतिम कविता... बर्‍याच दिवसांनी अतिशय उच्च साहित्यिक दर्जा असलेली कविता वाचायला मिळाली आणि खूप बरं वाटलं! या कवितेमुळे मिसळपावची श्रीमंती निश्चितच वाढली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे... आपला, (मातृभक्त) तात्या.

प्राजु Fri, 01/18/2008 - 18:57
वा वा.... अप्रतिम कविता.. काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू .. या ओळी सुंदर आहेत. - प्राजु.

लेखनविषय:
भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . . वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . . दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . . संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . . सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . . मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . . काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..

(झुलवा)

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 03:14
केशवा,कधी कोणी कविता लिहीली की तू गिधाडासारखा त्याच्यावर तुटून पडतोस रे! बाकी तूझ्या कल्पनाशक्तीचीही दाद द्यायला हवी.द्वयर्थी मराठी म्हणजे काय हे (दादांनंतर)तूझ्या विडंबनानेच सांगीतले. (झकास) -इनोबा

विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 09:12
लै भारी रे केशवा! तुमची गोची, त्यांची वळवळ काय करावे लवकर ठरवा हा हा हा! :))) नसे पाहण्या कोणी आता जरा दमाने खिंडी लढवा क्या बात है....! "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" थांब केश्या, आता भारतात आलास की साल्या बडवतोच तुला लेका! :) असो, उत्तम विडंबन रे केशवा. ईश्वर इतरांना अगदी भरपूर गझला द्यायची प्रतिभा प्रदान करो जेणेकरून तुला कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही...:) तात्या.

ध्रुव Fri, 01/18/2008 - 11:48
मस्त आहे. "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" हे तर फारच भारी. -- ध्रुव

केशवसुमार Fri, 01/18/2008 - 21:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

प्राजु Fri, 01/18/2008 - 21:07
पुन्हा एकदा.. तुझा महिमा अगाध.. तुझ्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. जरा जपून बरं.. नाहीतर खरंच एकेदिवशी हे सगळे गझलकार तुला बडवतील्. ह्.घ्य. - प्राजु.

चतुरंग Fri, 01/18/2008 - 21:15
त्यांची गोची पाने पिकली देठ तरी वळवळतो हिरवा त्याच उड्या अन त्याच कसरती दमलो, थोडे पडतो अडवा... केवळ उच्च!! चतुरंग

स्वाती महेश Sat, 01/19/2008 - 08:08
खुपच अश्लिल विडंबन आहे. इथे अनेक महिला सदस्यही येतात. त्यांना अप्रशस्त वाटेल असे लिखाण कृपया करू नये.

In reply to by स्वाती महेश

विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 08:48
अश्लील या शब्दाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत/असू शकतात. असो, विडंबनकार केशवाने स्वाती यांच्या म्हणण्याची भविष्यात सारासार नोंद घ्यावी... मिसळपावला केशवासारख्या प्रतिभावंताचीही गरज आहे आणि स्वातीताईंसारख्या चोखंदळ व प्रसंगी परखड, वाचकाचीही गरज आहे! आपला, (तटस्थ) तात्या. मला व्यक्तिश: सदर विडंबन वाचताना मजा वाटली...:) आपला, (वाचक) तात्या.

In reply to by स्वाती महेश

केशवसुमार Sun, 01/20/2008 - 15:28
स्वातीमहेशताई, आपल्याला हे विडंबन अश्लिल वाटले हे वाचून आम्हाला वाईट वाटलं.. शील / अश्लिल हे व्यक्तीसापेक्ष आहे. हा ते इनोबाशेठ म्हणतात तसे द्वयर्थी म्हणू शकता.. इथे आमच्या डॉनच्या एका मुलाखतीतला संदर्भ देतो ..अता हे डॉन कोण (छोटा/मोठा/खरा/खोटा) विचारू नका... हम 'सबका डॉन एक'- 'दादा कोंडके' 'पाप हे वाचणार्‍याच्या मनात असतं मी लिहीताना सरळच लिहितो.. ' असो.. सपषट सांगितल्या बद्दल आभारी आहे इथून पुढे लक्षात ठेवतो.. केशवसुमार.

परंतु, आम्ही या वर्षी द्वैअर्थी न बोलण्याचा संकल्प 'सोड'लेला असल्याने यापेक्षा जास्त मोठा प्रतिसाद देउ शकत नाही. ;) आपला, (द्वैअर्थी न बोलणारा) छोटी टिंगी

धोंडोपंत Sun, 01/20/2008 - 18:48
वा रे केशवा! आज खूप दिवसांनी मिसळपावावर आलो. आणि तुझी झणझणीत तर्रि चापली. मजा आली. आपला, (हावरट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा रात्रीला पोरांना निजवा बेत जरा मग जंगी घडवा तुमची गोची, त्यांची वळवळ काय करावे लवकर ठरवा कुणीच येईनासे झाले! अहो जरा जोराने हलवा नसे पाहण्या कोणी आता जरा दमाने खिंडी लढवा बाई, बाटली आणिक आम्ही युगायुगाचा चालू झुलवा... "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत त्यांची गोची पाने पिकली देठ तरी वळवळतो हिरवा त्याच उड्या अन त्याच कसरती दमलो, थोडे पडतो अडवा...

गावची वारी

सुनील ·

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 03:17
सुन्या...च्यामारी असलं रडकं काही तरी लिहीतोस आणी डोळ्यातून पाणी काढतोस.मनाला भिडलं रे.... (गाववाला) -इनोबा

सहज Fri, 01/18/2008 - 07:14
लघुकथा आवडली. नेहमीपेक्षा वेगळं वाचायला मिळाले, आवडले.

विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 08:47
छोटीशीच, परंतु छान कथा! कथेतली कोकणची पार्श्वभूमी आवडली. लहानगा अमेय असा दरवर्षीच जर खेळाबागडायला, आंबेफणस खायला कोकणात जाऊ लागला तर कदाचित आबा आणि वहिनींनाही त्याचा लळा लागेल आणि आंब्याची वाडी गावकीला न मिळता अमेयला मिळेल असे वाटते! :) आपला, (कोकणी भाऊबंदकीतला!) तात्या. सुनीलराव, अजूनही अश्या छान छान कथा येऊ द्यात... आपला, (कथावाचक) तात्या.

ध्रुव Fri, 01/18/2008 - 12:07
लघुकथा वाचताना उत्सुकता हळुहळु वाढत होती. चान जमली आहे. -- ध्रुव

मपल्याला आमची अन चुलत्यांची झालेली वाटन्या आठवल्या. आमचे आजोबा रामभाउ पाटील गेले आन वायल व्हायची प्रक्रियेला गती आली. त्याची बीज आदुगरच रवली व्हती. गुरांच्या वाटन्याने गुरं गोंधळून गेली. आतापर्यंत एकच गोठा होता.कुत्र्यांच बी वाटप टिप्या , पिल्या आमच्या कं पांड्या , चंपी त्यांच्याकं .त्यांनला बी सुधरना! गड्यांचे वाटप त्यांच्यावरच सोपावल, चंदु , शंकर, मारत्या आमच्याक. रामा, गोईंदा , सहादु त्यांच्या क. वावराचे वाटप- सोंड्या आन बेलशेत आमच्याक आन तेजेगावडी अन अंबरखाना त्यांच्याक. पुन्यातल्या एका चुलत्यांच बी वावार पघायला आमच्याक. वाडा , राममंदिर आमच्याक आन स्ट्यांडवरल नव घर त्यांच्याक. कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुनील Sat, 01/19/2008 - 00:39
कोर्ट कचेर्‍या मात्र दोघांक अहो, वकिलांच्या पिढ्या पोसल्यात कोकणातल्या बंधूंनी !!! कोणीसे (बहुघा पुलंनी) म्हटलेच होते, कोकणातील मूल शाळेच्या पायरी अगोदर कोर्टाची पायरी ओळखायला शिकते! शेताची वाटणी झाली तर, बांधावरच्या झाडावरून पुन्हा कोर्टात जातील! पण कोकणी माणूस सनदशीर खरा! वर्षानुवर्षे वकिलाला पैसे देईल पण चुकूनही छोट्या-मोठ्या (किंवा मधल्या) डॉनला सुपारी म्हणून देणार नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश Tue, 01/31/2012 - 22:39
ही गोष्ट निसटून गेली होती वाचण्यातून. दिपक,तुम्ही खणून वर काढल्याबद्दल धन्यवाद. सुनीलभाऊ,कथा आवडली. स्वाती

लेखनप्रकार
करकचून ब्रेक दाबत एस.टी थांबली. दरवाजा उघडला. एका हाताने गॉगल नीट करीत आणि दुसर्‍या हाताने खांद्यावरील बॅग सावरीत रमकांत उतरला. त्यापाठोपाठ रश्मी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अमेय हेही उतरले. सभोवती एक दृष्टीक्षेप टाकून त्याने गावात जाणारा रस्ता पकडला.

विरोप

अनिला ·

प्राजु Fri, 01/18/2008 - 01:35
अनिला, खूप छान लिहीलि आहेस कविता... वेगळी आहे एकदम. आवडली. प्राजु.

विसोबा खेचर Fri, 01/18/2008 - 08:55
'क्लीक' ला 'टिचकी' हा शब्द कवितेत अगदी चपखलपणे बसल्याचे पाहून गंमत वाटली! :) 'ताव', 'विद्युत डाक' हे शब्द आवडले! अवांतर - तावाप्रमाणेच 'रीम' हा शब्दही कवितेत आला असता तर मजा आली असती! :) असो, सुंदर कविता...! अजूनही अश्या कविता येऊ द्यात, शुभेच्छा! आपला, (ई-जगतातला) तात्या.

अनिला Fri, 01/18/2008 - 09:18
४ साला आधी माझा मुलगा एम्.एस. करायला आला तेव्हा सुचलेली आहे. कच्ची तयार होतीच.आणि मिसळपाव वर हेच शब्द पाहून लिहावी वाट्ली. धन्यवाद बरेका, खूप खूप

चतुरंग Fri, 01/18/2008 - 20:27
'विद्युत डाकी' शब्द भावला मनी काव्य वाचुनी मोद दिसे आननी 'ताव' काढुनि 'टिचकी' मी मारितो प्रतिकाव्ये मी प्रतिक्रिया ही देतो चतुरंग

सुधीर कांदळकर Sat, 01/26/2008 - 09:49
काळानुरूप मराठी भाषेत नवीन भर पडायलाच पाहिजे. ती देखील कवितेत. सोन्याहून पिवळे. गवाक्षे टिचकीने आणि विद्युत डाकी शब्द फार आवडले. पैकी फक्त टिचकी हा शब्द ठाऊक होता.

Taxonomy upgrade extras
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा

किनारा..

पेशवे बाजीराव तिसरे ·

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 00:23
खुपच मस्त ओळी लिहिल्या आहेत. अशाच कविता संग्रही असतील तर जरूर पोस्ट करा. स्वागत आहे... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा... या मस्त ओळी आहेत.

मुक्तसुनीत Fri, 01/18/2008 - 05:05
तुमच्या कवितेमधील रचनेचे दोष लक्षात घेऊनही (किंबहुना, रचनेचा, सौष्ठवाचा अभाव आहे हे जाणवत असतानाही) त्यातील सूचितार्थाचा , त्यामागील संवेदनशीलतेचा मला स्पर्श झाला. माणसाच्या आयुष्याबद्दल विचार मांडताना काव्यात अनेक रूपके येतात. समुद्र , किनारा, लाटा ही रूपके काही नवी नव्हेत. पण , या पारंपारिक रूपकांचा इतका चपखल वापर क्वचितच दिसतो. मला तुमच्या ओळी आवडल्या. त्या लिहीण्याने काहीतरी नवे सत्य मांडल्यासारखे वाटले.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय Fri, 01/18/2008 - 05:41
ही रूपके पारंपारिक आहेत पण तशी थोडीशी चपखल नाहीतही. "किनारा" आणि "समुद्र" यांची आदलाबदल करूनही ही कविता वाचता येते, हे रूपके चपखल नसण्याचे द्योतक आहे : > माणसाने किनारा होण्यापेक्षा समुद्र व्हावे .. > तुटणार्‍या लाटेसारखे प्रत्येक दु:ख प्रवाही होऊन झेलणारा.. > समुद्राला नसतातच कुणी मित्र वा वैरीही > त्याच्या नशीबात असतात फक्त लाटा अन > दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... > त्यातला एखादा वाळूचा किनारा लाट हळुवारपणे पांघरतो > अलगदपणे सागराशी हितगुज करतो.. > पण त्या किनार्‍यात गुंतायचे नसते समुद्राने > कारण खडक लाटा फोडून परतवतात नविन किनार्‍याचे... > म्हणुनच म्हणतो किनारा होण्यापेक्षा समुद्र व्हावे > शेवटी तोच असतो सोबती दुःख प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

नमस्कार, स्वाती राजेश,प्राजु,मुक्तसुनीत,धनंजय तुमच्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे मी.... धनंजय मी काही कवि नाही... चपखल रूपके रचना सौष्ठव हे असले काही कविते मध्ये असते हे मला माहीती नाही... जे मनात आले जे शब्द सुचले ते लिहीले... कविता करण्यामागचा माझा एकच हेतु आहे... प्रतिमा जरी सुख-स्वप्नांच्या अशा अवेळीच भंगल्या... भरकट्लेले विचार व्यसनात बुडवण्यापेक्शा कविता केलेल्या चांगल्या...

In reply to by पेशवे बाजीराव तिसरे

प्रतिमा जरी सुख-स्वप्नांच्या अशा अवेळीच भंगल्या... भरकट्लेले विचार व्यसनात बुडवण्यापेक्शा कविता केलेल्या चांगल्या... हे मात्र बरं आहे !!! कविता करत राहा :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by पेशवे बाजीराव तिसरे

धनंजय Fri, 01/18/2008 - 20:28
कल्पना छानच आहे. फक्त पूर्ण घासलेली-पुसलेली नाही, त्यामुळे कच्चा खर्डा समोर ठेवल्यासारखा भास झाला इतकेच. कल्पनास्फूर्ती होऊन ती लिहिण्याचे कार्य करणे म्हणजे कवित्वाचा अर्धा-अधिक भाग तुमच्यापाशी आहेच. उरले फक्त मनन, स्व-संपादन, आणि वाचकाच्या दृष्टिकोनातून तेच शब्द वाचून घेण्याची संवेदनाशक्ती. तीही बहुधा तुमच्यापाशी आहे. कारण कविता सांगितली म्हणजे केवळ आपल्या मनाच्या भावनांना स्वतःसाठी सुचलेले शब्द राहत नाहीत. त्याच भावना उत्कटतेने वाचकात निर्माण करायचा मानस असतो. त्यामुळे तो वाचक कोण ते ठरवून, त्याच्या नजरेतून कविता वाचता आली पाहिजे. हेदेखील तुम्ही बहुधा केले असावे - येथेही काही वाचकांच्या मनाला तुमची कविता भिडलीच आहे. "प्रतिमा जरी ... चांगल्या" ही चारोळी बरी जमली आहे, याबाबत प्राडॉ यांच्याशी सहमत :-)

माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका

छत्रपति ·

भडकमकर मास्तर गुरुवार, 01/17/2008 - 14:46
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवीन ________- असे शीर्षक वाचून आम्हाला काहीतरी वेगळेच वाटले.... :)

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. Tue, 06/27/2017 - 17:07
मीटरच तोडीन. यमकात हाणीन. मुक्तछंदात तुडवीन. शीर्षक गंडवीन. मुखडा रंगवीन, . . सगळ्यात शेवटी..... पाटणकरांपाशी नेऊन सोडीन हां.

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..? पायलटची बायको ... " गेलास उडत..." मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं." शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..." रंगारयाची बायको ..."थोबाड रंगवीन." धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन." लोहाराची बायको ... "ठोकुन सरळ करीन." तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत." न्हाव्याची बायको ... "केसाने गळा काप्लात की हो माझा." डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन." शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख." अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?" इति महेश....

वाटा

रचनाद्लाल ·

स्वाती राजेश Wed, 01/16/2008 - 19:22
खूप चांगला प्रयत्न आहे. कदाचित याही पेक्षा आपण खूप छान कविता करू शकाल. पुढ्यच्या कवितेच्या प्रतिक्षेत... पाहूनी त्या वळणावर आसवांना,काळोखाआड कधी गळतात वाटा। या ओळी आवडल्या.

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।
आणि
एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।
त्याचबरोबर....!
पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

या  ओळी विशेष आवडल्या. येऊ दे, अशाच सुंदर कविता.

मुक्तसुनीत Wed, 01/16/2008 - 22:53
तुमच्या या कवितेने एका खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका आर्तमधुर मराठी गाण्याची आठवण झाली : खिन्न या वाटा दूर पळणार्‍या .... गायिका : उषा मंगेशकर काव्य : शांता शेळके संगीत ??? कुणाला आठवते का हे गीत ? कितीतरी वर्षानी त्याची आठवण जागी झालीय् ....

प्राजु गुरुवार, 01/17/2008 - 00:12
आवडली कविता.. एक चांगली गझल आहे हि. - प्राजु

कोणास कधी कळतात वाटा वेड्या कोठून कश्या वळतात वाटा। एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना सोडूनी हात कधी पळतात वाटा। पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा। पाहूनी त्या वळणावर आसवांना, काळोखाआड कधी गळतात वाटा। कोणी बोले दुनिया तर गोल आहे फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा? तीही सोडून मला वळनात गेली तीच्या वाचून मला छळतात वाटा। हो येथेच सुरवात , इथेच अंत

असंही प्रेम असतं!!

तुमचा आनंद ·

विसोबा खेचर Wed, 01/16/2008 - 13:16
कविता चांगली आहे! तात्या. अवांतर - जळ्ळं, आमची प्रेयसी आम्ही तिच्या आधी कधी जातोय याची वाट पाहात बसेल! :) पुढं जाऊन आमच्या स्वागताबिगताची तयारी करणं तर दूरच राहिलं! :)) तात्या.

In reply to by अनिला

ध्रुव Fri, 01/18/2008 - 11:49
एकी कडे फोटो वर प्र ति क्रीया तर एकी कडे मरणावर फुले. हे कळले नाही -- ध्रुव

असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...

एक लोभसवाणा, देखणा ब्लॉग!

विसोबा खेचर ·

माझी दुनिया Wed, 01/16/2008 - 11:58
जळ्ळं मेलं लक्षण ते! आम्हाला अशी सुरेख सजावट करता आली असती तर किती बरं झालं असतं! खरे आहे, काही वादच नाही

प्राजु गुरुवार, 01/17/2008 - 00:17
पाहिला आहे त्यांचा ल्बॉग... खूप सुंदर केला आहे. - प्राजु.

सहज गुरुवार, 01/17/2008 - 06:20
विविध छायाचित्रे असलेला तो उजवा रकाना पाहून खरच खूप छान वाटते!! पण काय पंत तुम्ही ते आमचं आवडतं भोजन असलेलं ताट का बरे उचललं?? तात्याने संपवलेल दिसतयं :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/17/2008 - 08:27
धोंडोपंत उवाच, आमचा आवडता ब्लॉग. त्यांच्या ब्लॉगवर गेल्यावर कोकणात गेल्यासारखं वाटतं ...!!! त्यांची श्रद्धास्थाने, श्लोक, अष्टके, कविता, भरभरुन सौंदर्य असलेला उत्तम चित्रांचा उत्तम ब्लॉग आहे. त्यांच्या ब्लॉगवर रपेट केल्यावर ज्योतिष विषयक सतत मार्गदर्शनही असते, आणि तिथे भरपूर वाचन झाल्यावर आपली कुंडली बनवून घ्यावी सखोल मार्गदर्शन घ्यावे असाही विचार मनात येतो. तिथे कुंडली बनवायचे किती फीस लागेल त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे आम्ही अजून काही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकासराव गुरुवार, 01/17/2008 - 16:55
खरच सुंदर आहे ब्लॉग. बाजुची चित्रं तर अप्रतिमच :)

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 08:09
आहे. छायाचित्रे अप्रतिम. परंतु ज्योतिषाविषयी माझी मते फार जहाल असल्यामुळे ती मी व्यक्त करीत नाही. येथे विषय ब्लॉगच्या मांडणी व सौंदर्याचा आहे. ब्लॉग उत्कृष्टच आहे. कृपया एकाच विषयाला वाहू नये. इतरही विषय येऊ द्यात की. आपल्या ज्ञानाला व प्रतिभेला एकाच विषयात बांधून ठेवू नये.

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 12:41
सर्वांना धन्यवाद. आमचा ब्लॉग आवडल्याचे कळविलेत. आम्ही भरुन पावलो. आम्हाला संगणकीय क्षेत्रातले काही ज्ञान नाही. त्यामुळे ह्या ब्लॉगाची निर्मिती ही आमच्यासाठी मळलेली पाऊलवाट नव्हती. पण असंख्य कल्पनांनी आमच्या मनात केलेला गुंजारव, कोकणाबद्दल असलेली प्रचंड आपुलकी, आमच्या श्रद्धास्थानांबद्दल असलेला आदर आणि ज्योतिषशास्त्रावरील गाढ निष्ठा यातून लेखन होत गेले आणि वाचकांना ते आवडत गेले. या ब्लॉगाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद अवर्णनीय आहे. १७ जून रोजी आम्ही गणक लावला आणि सहा महिन्यात वाचकसंख्या १०,००० चा टप्पा ओलांडून पुढे गेली. आजमितीस ती १३,००० च्या आसपास आहे. नकाशाचा प्रयोग नुकताच केला आणि वाचकवर्ग जगभरात विविध ठिकाणी कुठे कुठे पसरलेला आहे हे समजले. आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे -- या ब्लॉगाचे श्रेय आम्ही घेत नाही. ते वाचकांकडे सोपवून आम्ही मोकळे आहोत. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 12:51
धोंड्या, तुझ्या या सुंदर ब्लॉगचे श्रेय खरंतर मला हवं! :) आठवतं का रे तुला, एकदा निराश होऊन म्हणा, रागाच्या भरात म्हणा, हा संपूर्ण ब्लॉग तू डिलीट करायला निघाला होतास? तेव्हा मी तुझ्या हातापाया पडून, विनंत्या करून, 'काहीही झालं तरी धोंड्या, इतका सुंदर ब्लॉग तू डिलीट करू नकोस' असं तुला दहादा विनवलं होतं? आठवतंय का रे तुला? असो, तुझ्या ब्लॉगचे श्रेय माझे नाही, तुझेच आहे. परंतु तुझा हा ब्लॉग असाच टिकावा, नांवारुपाला यावा, वृद्धींगत व्हावा हीच व्याडेश्वराचरणी प्रार्थना... (सच्चा मित्र!) तात्या.

धोंडोपंत Mon, 01/28/2008 - 19:44
धोंड्या, तुझ्या या सुंदर ब्लॉगचे श्रेय खरंतर मला हवं! :) आठवतं का रे तुला, एकदा निराश होऊन म्हणा, रागाच्या भरात म्हणा, हा संपूर्ण ब्लॉग तू डिलीट करायला निघाला होतास? तेव्हा मी तुझ्या हातापाया पडून, विनंत्या करून, 'काहीही झालं तरी धोंड्या, इतका सुंदर ब्लॉग तू डिलीट करू नकोस' असं तुला दहादा विनवलं होतं? आठवतंय का रे तुला?>>>> तात्या, तुमचं म्हणणं खरं आहे . आम्हाला ते आठवते आहे. जेव्हा तुम्हाला तो विचार सांगितला तेव्हा तुम्ही तो सर्वशक्तिनिशी हाणून पाडलात. म्हणूनच हा ब्लॉग आज दिसतोय. तुमच्या आपुलकीमुळे आज अनेक वाचक त्याचा आस्वाद घेऊ शकत आहेत. आपला, (आपला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

रामोशी Mon, 01/28/2008 - 23:59
नमस्कार मंडळी, आमचे हे पहिलेच लिखाण. मिसळपाव हे चमचमीत संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे अभिनंदन. धोंडोपंतांच्या ब्लॉगविषयी आमचेही दोन शब्द. आम्ही हा ब्लॉग गेल्या बरेच दिवसांपासून आस्वाद घेत पहात आहोत. मुद्दामहून पहात आहोत असे म्हणालो, कारण ज्योतिषशास्त्र काही केल्या आम्हाला झेपत नाही. परंतु, अस्सल नयनरम्य कोकणदर्शन, वेड लावणारा पाऊस आणि समुद्रकिनारा, माडा-पोफळीच्या एअरकंडीशण्ड बागा, कोकणचा मेवा, देवदर्शन, थोरामोठ्यांची उत्तम छायाचित्रे आणि तेव्हढयाच सुंदर चित्रांचे निरुपण करणार्‍या समर्पक ओळी पाहून दिल खूष झाला! विशेषकरुन, शेवटची दोन छायाचित्रे बघुन तर आमचा आत्मा तृप्त व्हायचा. ती दोन छायाचित्रे म्हणजे, ताज्या तळलेल्या सुरमई, सागुती-वडे आणि सोलकढीचे जेवण. इथे दूरवर उसगावच्या खेड्यात, जिथे हे प्रकार नावालासुधा बघायला मिळत नाहीत, तेथे आम्ही धोंडोपंतांच्या ब्लॉगवर जाउन आमची क्षुधाशांती करायचो. गेल्या काही दिवसांपासून मात्र ही दोन्ही चित्रे तेथे नाहीत. मला सांगा, देवदर्शन, कोकणदर्शनानंतर आमच्या थकल्या-भागल्या जीवाने थोडी पोटपूजेची अपेक्षा केली, तर काही चुकले का? तेव्हा आम्ही धोंडोपंतांना जाहीर विनंति करीत आहोत की त्यांनी आपल्या ब्लॉगवरील दोन्ही चित्रांची पुन्हा प्रतिष्ठापना करावी. जमल्यास तळलेले बोंबिल मिळाले तर उत्तमच :) आपला, (ताजे फडफडीत मासे या प्रजातीवर मनापासून प्रेम करणारा) मामलेदार

In reply to by रामोशी

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 00:03
गेल्या काही दिवसांपासून मात्र ही दोन्ही चित्रे तेथे नाहीत. मला सांगा, देवदर्शन, कोकणदर्शनानंतर आमच्या थकल्या-भागल्या जीवाने थोडी पोटपूजेची अपेक्षा केली, तर काही चुकले का? तेव्हा आम्ही धोंडोपंतांना जाहीर विनंति करीत आहोत की त्यांनी आपल्या ब्लॉगवर वरील दोन्ही चित्रांची पुन्हा प्रतिष्ठापना करावी. जमल्यास तळलेले बोंबिल मिळाले तर उत्तमच :) हेच म्हणतो! तात्या.

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 20:05
केशवराव, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत मामलेदार व तात्या, कोकणी पाककृतींची छायाचित्रे ब्लॉगावर पुन्हा लावली आहे. जाऊन आस्वाद घ्यावा ही विनंती. सूचनेबद्दल आभार. आपला, (आज्ञाधारक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

रामोशी Wed, 01/30/2008 - 19:56
धोंडोपंत, आत्ताच आपल्या ब्लॉगवर जाउन आम्ही खास लज्जतदार कोकणी भेटीचा आस्वाद घेतला. आमच्या बुधवारच्या जेवणाची राजेशाही थाटाची सोय केल्याबद्दल आपले शतशः आभार !! (संतुष्ट !) मामलेदार

नितिन थत्ते Mon, 02/16/2009 - 11:50
धोंडोपंतांचा ब्लॉग पाहिला. सजावट, लेआउट वगैरे छानच आहे. मिसळपावला असेच सजवण्याची कल्पना उत्तम. एकच सूचना: त्यांचा ब्लॉग फार सात्विक आहे. तसा करू नका. मिसळपाव या झणझणित 'तामसी' पदार्थाला शोभणार नाही. अवांतरः मिसळपाव जसा सेक्युलर (पारलौकिक बाबींना महत्त्व न देणारा) आहे तसाच राहू द्या. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

अमोल केळकर Mon, 02/16/2009 - 13:15
पंतांचा ब्लॉग सुरेख आहे यात शंका नाही . पंत तुमचा इंग्रजी ब्लॉग ही असाच सजवा ही विनंती. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ब्लॉग सुरेख आहे. उजवीकडील छायचित्रे अप्रतिम. एस.टी. स्टॅंडचे छायचित्र म्हणजे कळसच. समुद्रकिनार्‍याचे फोटो पाहताना भान हरपले होते. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

केदार_जपान Wed, 02/18/2009 - 06:10
तुमची ही पोस्ट बघितली आणि म्हणालो, च्यामारी एवढे काय आहे या ब्लोग मधे ....???...एकदा याच्यावर टिचकी मारायला काय हरकत आहे?? आणि बघतो तो काय हो??...भन्नाट्च आहे कि हो हा ब्लोग्!!...कोलापुरी भाषेत सांगयचे तर...एकदम नाद्खुळा..! ;) आणि आम्ह्लाला सुद्धा थोडेफार समजते ज्योतिषामधले....त्यामुळे दुधात साखरच पडली... धोंडोपंताचे अतिशय आभार कि एवढा सुंदर ब्लोग केल्याबद्दल्....आणि तुमचे त्याहुन जास्त आभार कि एवढी छान माहिती इकडे पोस्ट केल्या बद्द्ल... ------------- केदार जोशी

राम राम मंडळी, आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत! मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही.