Skip to main content

मिसळ पाव

लेखक मीनल गद्रे. यांनी बुधवार, 23/01/2008 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| *श्राव= गाळ, माव=जादू.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8178
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वा! 'मिसळगीत' आवडले..:) तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण असंच नेहमी मिसळपाव या पदार्थाच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं! असो... मीनल मॅडम, सुंदर काव्य केले आहे. अजूनही येऊ द्यात ही विनंती.. आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

मीनल... लय भारी... अशीच भारी अन वॉव.. कविता तुझी इथे याव मिसळपाव मिसळपाव... एकदम खूश... -प्राजु

ही कविता मिसळपाव चे राष्ट्रगीत म्हणून वापरली जावी असा आमचा प्रस्ताव आम्ही येथे मांडत आहोत. सरपंच आणि इतर सदस्य, काय म्हणणे आहे आपले? बिपिन.

मस्तच आहे.. ही कविता वाचून शाळेमधील निवडणुकांचे दिवस आठवले. आम्ही सर्व मित्र मंडळी मधल्या सुट्टीत आपल्या उमेदवाराच्या नावाने घोषणा देत शाळेभर फिरायचो. येऊन येऊन येणार कोण, ..... शिवाय आहे कोण. तुझी कविता याप्रमाणे चाल लावून वाचली.मजा आली.

बर झालं ष्टार मारला त्ये. नाही त मंग आमाला वाटल आता ह्यो रसात "स्त्राव" कंचा आला? प्रकाश घाटपांडे

मिसळपाव संकेतस्थळाची ही प्रार्थना म्हणून मान्यता (संजूबाबाची नव्हे) मिळायला हरकत नसावी. आपला, (अजूनही शाळेत रमणारा) अनिरुद्ध दातार