मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मैफिल"

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
हे तिचेच काव्य सारे ही तीचीच कविता मांडतो मैफिलीत आठवणींच्या मीच वक्ता मीच श्रोता होते माझेच स्वप्न खोटे कुणाचा राग कशास धरावा गाळुनी असहाय आसवे चार मैफिलीचा बेरंग कशास करावा येणार नाही ती हे ज्ञात असुनी वाट तिची पाहण्यास्तव जगतो रात्री चिंब भिजलेल्या पापण्या जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला तिच्याच आठवणीत चिंब भिजतो अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे मैफिल आयुष्याची रंगवतो

धन्यवाद..

प्राजु ·

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 10:17
मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते. क्या बात है! प्राजू, मिपा तुम्हा सगळ्यांचंच आहे...! चरोळ्या लिहिणे बंद नक्की नाही केले. पुन्हा लिहिन नक्कि लिहिन.. पण थोडे दिवस थांबावं.. जरूर! प्लीज टेक युअर ओन टाईम... मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल. असाच मिपाच्या सदस्यांचा स्नेह परस्परांशी वाढत राहो हीच त्या जगन्नियंत्याला प्रार्थना.. प्राजू, मिपावर आणि मिपाकरांवर तू जो विश्वास दाखवला आहेस त्याबद्दल औपचारिक आभार मानून मी परकेपणा करणार नाही! च्यामारी, आत्ताच्या आत्ता मिपा तुझ्या नावावर करू का बोल प्राजू? आपण पडलो साला फकीर माणूस. आपली काय ग्यॅरेंटी नाय. तात्या.

स्वाती राजेश Mon, 01/21/2008 - 12:47
इथे सकळचे ७.२० वाजले आहेत. तुझी सकाळी सकाळी ही बातमी वाचली. छान वाटले. तुझ्या बहारदार कवितेच्या प्रतिक्षेत असलेली तुझी.. मैत्रिण, स्वाती

लेखनप्रकार
स्वाती, ऋषिकेश, तात्या, डॉन, धोंडोपंत, विनायक, चतुरंग.. आपण दिलेल्या धिराबद्दल मी आपली आभारी आहे. मी जेव्हा विणीचा पहिला धागा सुरू केला तेव्हा मिपावर नुकतीच आणिबाणी जाहिर झाली होती. बरेच वाद्-विवाद गाजत होते. मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते. मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या वादविवादात कधी पडले नाही पण इथले वातावरण हलके व्हावे या दृष्टीने मी तो धागा चालू केला होता. अपेक्षेपेक्षा खूपच जास्ती मिपाकरांनी त्याला प्रतिसाद दिले. खूप चारोळ्या लिहिल्या गेल्या. भाग दुसरा करावा लागला.नंतर तिसराही करावा लागला.

इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

चतुरंग ·

वेडा Mon, 01/21/2008 - 10:40
माझी आवड्ती गझल... का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा ही नवीन २ कडवी समजली.. शतशः धन्यवाद चतुरंग

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 12:28
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा क्या बात है! सुंदर... चतुरंगराव, ही गझल इथे दिल्याबद्दल आपलेही अनेक आभार.. तात्या.

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 15:30
इलाही जमादारांची ही गझल आमची अत्यंत आवडती आहे. ती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'जखमा अशा सुगंधी' मधील अनेक गझला आमच्या आवडीच्या आहेत. आपला, (आभारी) धोंडोपंत तात्या --- तुझा फोन येऊन गेल्यावर आम्ही लगेच इलाहींना फोन केला होता. ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. आपला, (मध्यस्थ) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 18:04
ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे. इलाहीसाहेबांचा आवडता ब्रँड कोणता ते सांग फक्त! सगळी यथास्थित वेवस्था करू आणि झकासपैकी मैफल जमवू! इलाहीसाहेबांना खास मिपावर टाकण्यासाठी एखादी नवी पेशल गझल लिहायला सांगू.. :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 20:00
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा क्या बात है. इलाहींच्या गझला मी वाचलेल्या नाहित. 'जखमा अशा सुगंधी' हे पुस्त्क आहे की आल्बम? -ऋषिकेश

In reply to by आवशीचो घोव्

प्रमोद देव Sat, 10/25/2008 - 22:17
वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो, आरशावरती अता आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे

प्राजु Sat, 10/25/2008 - 20:35
यांची माझी अतिशय आवडति गझल आहे ही.. किती वेळा वाचली असेल मी कोण जाणे.. जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा काय जबरदस्त आहे हा शेर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंद Sat, 10/25/2008 - 20:49
मस्तच गझल,शोधतच होतो. पण मिपाच्या नियमात बसते? इतकी आवडती गझल वाचतानाही हे मनात आलच. कधी कधी नियमालही अपवाद ही असावेत.

In reply to by आनंद

चतुरंग Sat, 10/25/2008 - 22:17
ही गजल मी जेव्हा दिली तेव्हा मी नुकताच सभासद झालो होतो आणि तेव्हा मिपाही सुरुवातीच्या दिवसात असल्याने नियम वगैरे बनायचे होते. पुढे पुढे जालावरील ढकल साहित्य आणी कॉपी इतकी होऊ लागली की नियमात बदल करणे क्रमप्राप्त होते. असो. चतुरंग

चौथा कोनाडा Fri, 12/06/2019 - 08:46
सहजच मिपा चाळत असताना ही सुंदर गझल पुन्हा"भेटली" बाय द वे वे, आज सायंकाळी ७ वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, आगरकर रस्ता, पुणे इथं इलाही जमादार यांची प्रकट मुलाखत आहे !

ज्ञान Sun, 12/08/2019 - 17:10
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा – इलाहि जमादार

Taxonomy upgrade extras
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा - इलाही जमादार

इ-पत्रातून पुढे ढकललेल्या साहित्याबाबत...

सरपंच ·

सरपंचांनी घेतलेली भुमिका उचित आहे. मिसळपावच काय पण जालावरील सर्व साहित्यासाठी / संकेतस्थळांसाठी मार्गदर्शक आहे. प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 15:30
सरपंच, तुमच्या निर्णयाचे स्वागत. अत्यंत योग्य पाऊल उचलले आहे. आपला, (सहमत)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पिवळा डांबिस Sun, 01/27/2008 - 23:51
सरपंचांचा आदेश शिरोधार्य! लेखनाचे श्रेय मूळ लेखकाला मिळालेच पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही! तरीही मला एक नम्र सुचना करावीशी वाटते. आपण सर्वांनी हे सुत्र जरा तारतम्याने घेतले पाहिजे. म्हणजे असे की, आपले विचार लिहितांना एखाद्याने जर काही काव्यपंक्ति लिहिल्या तर त्याच्यावर लगेच मूळ लेखकाचे नांव लिहायची सक्ति नसावी. उदाहरणार्थ, एखाद्याने भक्तिमार्गावरील आपले विचार लिहितांना जर "मना सज्जना भक्तिपंथेची जावे" असे लिहिले तर लगेच खाली "रामदास" असे न लिहिल्याबद्दल त्याला अटक करू नये! :) गद्य लिखाण परिणामकारक होण्यासाठी, आपला मुद्दा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी कधीकधी काव्यपंक्ति, म्हणी, सुभाषिते, शेरोशायरी इत्यादि. वापरली जातात. त्यात मधेच असे मूळ लेखकाचे नांव लिहावे लागल्यास लेखकाची लिहितांना आणि वाचकाची वाचतांना लिंक तुटण्याची शक्यता असते. कित्येकदा म्हणी व सुभाषिते यांचा जनक/ जननी माहिती नसतात. त्याखेरीज त्यांच्या अर्थामध्ये उणीव येत नाही हे खरेच! त्यामुळे अशा वापराला मुभा असावी. बहुत काय लिहिणे? आपण सर्वजन सूज्ञ असा|| (क्रुपाभिलाषी) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सुनील Mon, 01/28/2008 - 07:44
मला वाटते, सदर फतवा हा संपूर्ण लिखाणासाठी आहे, लिखाणाअंतर्गत वापरलेल्या काव्यपंक्ती इ. साठी नाही. म्हणी आणि सुभाषिते यांचे जनक कुणालाच ठाउक नसतात पण काव्यपंक्तीसाठी "कुठल्याशा कवीने म्हटले आहे..." असे लिहून भागू शकेल असे वाटते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राम राम मंडळी, काही मंडळी येथे पुढे ढकललेल्या विरोपांतून वगैरे आलेले साहित्य (विशेष करून काव्य,) इथे प्रकाशित करतात. मिसळपावला या प्रकारच्या साहित्याचे वावडे नाही. परंतु जर इथे प्रकाशित होणारे साहित्य हे सभासदाव्यतिरिक्त इतर कुणाचे असेल तर सदर साहित्य प्रकाशित करणार्‍या सभासदाने मूळ साहित्यिकाचे/लेखकाचे/कवीचे/गझलकाराचे नांव जाहीर करणे अत्यावश्यक आहे. जर हे नांव अज्ञात असेल तर संबंधित लेखनाच्या शेवटी 'मूळ लेखक/कवी अज्ञात!' असा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.

पिंक स्लिप

सुनील ·

छान लिहीले आहेस.....अगदी माझीच श्टोरी आहे अवांतर : सध्या मी पण याच अवस्थेतून जात आहे.......आमच्या हपिसात ९०-१० लागू झालाय्......गोर्‍या सायबानी पैशे नाय म्हणून डिक्लेअर केलय....आमच्या टीम मधल्या अर्ध्याहून जास्त हमालांना भारतात परत पाठवलय अन आम्ही बाकीच्या हमालांवर टांगती तलवार ठेवलीये :(( आपला, (हैराण झालेला) छोटी टिंगी

भडकमकर मास्तर Sun, 01/20/2008 - 23:08
लग्नाच्या बाजारात किंमत , हुंडा ...यावर काही कन्क्ल्यूडिंग कोमेंट व्हायच्या आत गोष्ट संपली , असे वाटले........ म्हणजे मूळ गोष्ट "लेओफ़ आणि त्याबद्दल वाटणारी भीती" अशी असताना आम्ही भलतेच मनात धरून बसलो बहुतेक......... आमचीच चूक असणार...

In reply to by भडकमकर मास्तर

सुनील Mon, 01/21/2008 - 21:29
होय, मूळ कथा ही ले-ऑफ आणि त्याबद्दल वाटणारी भिती यावरच होती. लग्न, हुंडा इ. चवीसाठी! अर्थात, त्या विषयांवरदेखील गंभीर कथा होऊ शकतात, पण इथे तरी तो प्रयत्न नव्ह्ता. असो, पिंक स्लिप ह्या शीर्षकावरून अंदाज येण्यास हरकत नव्हती असे वाटते. धन्यवाद! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 12:51
सुनीलशेठ, ही कथा तेवढी खास वाटली नाही, ठीक वाटली. या आधीची 'गावची वारी' ही कथा खूपच छान होती... असो, प्रामाणिक मत. राग नसावा... पुढील लेखनकरता अनेकानेक शुभकामना... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुनील Mon, 01/21/2008 - 21:25
छे राग कसला उलट प्रामणिक मत सांगित्ल्याबद्दल धन्यवाद! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा Mon, 01/21/2008 - 16:27
माझी पण त॑तरली होती यार हे वाचताना. मीपण थोड्याशा अशाच् प्रकारातून चाललो होतो ना मध्ये. -(फापललेला) धमाल.

ध्रुव Mon, 01/21/2008 - 16:36
कथा म्हणून वाचली तर छान आहे, उत्सुकता वगैरे काय असते ती वाटली. -- ध्रुव

"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले. मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले. "घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले. "हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच!

गद्य्-काव्य

वेडा ·
लेखनविषय:
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

धोंडोपंत ·

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 18:52
आम्हाला इथे(परदेशात बसून) तुमच्या मुळे माहिती मिळते. तुमचा ब्लॉग पण पाहिला. उत्क्रुष्ट आहे. कोकणातील फोटो खूपच मस्त. माहिती सुद्धा खूप उपयोगी आहे.

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 22:11
छान माहिती. ही महिती दिल्याबद्दल आभार विकीवर शोधले असता शाकंभरी देवी बद्दल बरीच माहिती मिळाली ती इथे वाचता येईल. -ऋषिकेश

सुनील Sun, 01/20/2008 - 22:34
नाहीतरी पालक माझा आवडता! त्यानिमित्ताने मंगळ्वारी पालकाचीच भाजी करावी म्हणतो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.

श्वासालाही उघाणं आलं.

raje1981 ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना. आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना. मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.

प्रिय प्राजुस....

स्वाती राजेश ·

इनोबा म्हणे Sun, 01/20/2008 - 02:27
मी ही तेच म्हणतोय तीला... असे लोक तर भेटतच राहणार ... म्हणून काही आपण आपले ध्येय सोडायचे नसते... (चारोळीमित्र) -इनोबा

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 03:02
तेव्हा माझी तुला कळकळीची विनंती आहे परत चारोळ्या, विणी गुंफायला लाग. +१ -ऋषिकेश

झंप्या Sun, 01/20/2008 - 13:11
'त्या' सदस्याचा 'तो' प्रतिसाद मी सुद्धा वाचलेला होता. त्याला फार फार तर 'अत्यंत आगऊ टिप्पणी' म्हणता येईल.. पण त्यात विकृतपणा काय होता बॉ? -सबका डॉन एक

चतुरंग Sun, 01/20/2008 - 17:33
कोणीतरी ते, काहीतरी ते, लिहिते चारोळीवर चिखलफेक करते तव तू चारोळी लिहिणे थांबविते? आठव, कमल हे अंबुज असते! चतुरंग

धोंडोपंत Sun, 01/20/2008 - 18:53
प्राजुताई, आम्हाला काही दिवस मिसळपावावर येणे जमले नव्हते. त्यामुळे नक्की काय घडले हे आम्हांला माहित नाही. पण कोणाच्यातरी टिपण्णीला बळी पडून तुम्ही तुमच्या प्रतिभेचा बळी देत आहात असा अर्थबोध झाला. म्हणून सांगावेसे वाटले. तुम्ही तुमच्या प्रतिभेला अशा प्रकारे दडपून टाकू नका. लोक येतात, बोलतात, चालू पडतात. त्याचा परिणाम आपल्या लेखनावर होऊ देऊ नये. कुछ तो लोग कहेंगे । लोगोंका काम है कहना॥ लिहायला लागा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (आग्रही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव Mon, 01/28/2008 - 17:29
प्राजु , धोंडोपंतांच्या मताशी मी पुर्ण सहमत ! काय झाले मलाही माहीत नाही. त्याची गरजहि नाही. पण कुणीतरी काहीतरी बोलते आणि आपण आपले कार्यच सोडायचे हे बरोबर नाही. बोलणारा वाईट हेतूने बोलतो असेही नसते. आणि टिका कुणाला सहन करावि लागली नाही ? बी ब्रेव्ह ऍण्ड कम ऑन!

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:14
कोणते काव्य? कोणती प्रतिक्रिया? कशावरून काव्यत्याग? अहो संचालक , आमच्या सारख्या ढ आणि अनियमीत विद्यार्थ्याला सविस्तर समजावून सांगाल का? प्रकरण गंभीर दिसते असो. पण कुणीतरी प्रतिक्रिया दिली म्हणुन लेखन बंद करणे पटण्यासारखे नाही! असभ्य/ अशिष्ट/ हीन प्रतिक्रिया देउन सभासदाना खच्ची करणारे तसेच चांगले बहरात आलेले संकेतस्थळ सुकवायची सुपारी घेतलेले महाभाग सर्वत्र असतात आणि असणारच. त्याना कितपत किंमत द्यायची हे आपण ठरवायचे. असे जर कुणी भावनाप्रधान होऊन लेखन बंद करू लागले तर यांचे काम सुकर होईल, तेव्हा काही झाले तरी तो आनंद त्याना मिळुन देऊ नका.

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:29
प्राजु, आपण काय निर्णय घेणार ते केवळ आपल्यालाच माहीत पण पुन्हा नव्या उमेदीने लिहायचा निर्णय घेतलात (आणि तो अवश्य घ्यावा - तुम्हाला अधिक महत्वाचे काय वाटते? एक नकारात्मक प्रतिसाद की हे सगळे सकारात्मक प्रतिसाद?) तर एखादी खवचट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे ( उदा: 'बघा, लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग' किंवा 'याला म्हणतात अग अग म्हशी' वगैरे). वाचा आणि पुढे जा. त्याची दखल न घेता.ज्याचा एक प्रयत्न फसला तो दुसरा करणारच. अशा प्रयत्नाना यश देणे वा तो हाणुन पाडणे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

प्रिय प्राजुस, काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण, आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले. पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो. कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी.. तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत..... तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे.. कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...

संडे स्पेशल (मेथी मलई मटर)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर Sun, 01/20/2008 - 00:02
स्वातीजी, उत्तम पाककृती! मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत... स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..! आपला, (खादाड) तात्या.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 00:11
आभारी आहे. तुमच्या सारखे खवय्ये असतील तर का नाही? मी माझ्याकडून प्रयत्न करेनच उत्तम पाकक्रुती मिसळपाव वर देण्याचा.

सुनील Sun, 01/20/2008 - 00:46
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं! मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल. आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील. (खवैय्या) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 01:47
मस्तच...सुनिल असेच एक एक चेंजेस केले तर नविन नविन पदार्थ बनतील. वरील प्रयोग लवकरच करेन. अशाच प्रतिक्रिये मधून नविन शिकायला मिळते. आभारी आहे.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:12
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो. लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा. दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे. ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते. बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे: बाटी: माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते. ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात. बाफले: माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात. ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत. हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत. टीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 23:29
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!) माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती. माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा! (बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.) बर्‍याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही. असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद! चतुरंग

सुनील Tue, 01/22/2008 - 23:29
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते. बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्‍याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:37
चतुरंगजी, सुनीलजी, प्रतिक्रियां बद्दल आभार. दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे. ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत. संजय अभ्यंकर

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:43
विकपॉईंट... आहे. त्यात ही मेथी मलाईमटर... आजच आणली आहे मेथी.. करतेच थांब. - प्राजु.

असंका गुरुवार, 10/22/2015 - 05:16
अगदी सुरुवातीच्या दिवसातला घागा वर काढून आणल्याबद्दल धन्यवाद... मेथी मटर मलाई आणि दाल बाटी दाल बाफले यात नक्की काय संबंध आहे याचा विचार करतोय....

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:23
वाह !! मस्तं रेसेपी चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) स्वातीताईच्या हातची मेथी मटर मलाई अहाहा!! .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!

In reply to by प्रश्नलंका

अस्वस्थामा गुरुवार, 10/22/2015 - 18:29
नक्की कधी खाल्ली होती वो ? नै म्हंजे २००८ सालचा धागा आहे आणि अजून चव जीभेवर रेंगाळतेय म्हणून आपली "शंका" .. ;)

In reply to by अस्वस्थामा

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:39
नुकतीच खाल्ली होती अनाहिता कट्ट्याला.. बाद्वे.. तुम्हाला काय करायच्यात हो नसत्या चौकश्या ;)

3