अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा
लेखनविषय:
आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल
अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा
बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा
येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी
हातात बांधलेला, तो मोगरा असावा
लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो?
की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!
नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी
गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा
दारात ती उभी अन्, हाती तयार झाडू
रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ?
एका क्षणात गेली उतरून ढोसलेली
ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा
ठोकून काढले मज इतके नका विचारू
हीच्या परी कसाई थोडा बरा असावा
वागो खुशाल "केश्या" हा मर्कटा प्रमाणे
डांबून घालण्याला , पण, पिंजरा असावा
वाचने
14849
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
सही रे सही!
हाहाहा
एका क्षणात
क्या बात है केशवा!
लय भारी
नाही अखेर
आयला! एकदम फुल्टून!!
केशवा!
वरील विड्म्बन
भाई वा!!!
In reply to भाई वा!!! by ऋषिकेश
+१
लै भारी.
मस्त
In reply to मस्त by आजानुकर्ण
मान गये, उस्ताद!
मान गये, उस्ताद!
लई झ्याक
अफलातुन!
धो धो हसलो
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by केशवसुमार
:)
गजब !!!!! क्या
केश्या केश्या केश्या
तुमच्या पेल्याला ......
महाराज
In reply to महाराज by गुंडोपंत
कच्च्या मालाची उणीव?
In reply to कच्च्या मालाची उणीव? by बेसनलाडू
बेलाशी आजही सहमत!
हा हा
अफलातून
एकदम सुपर
अफलातून.........
अफलातुन्
अफलातून विडंबन!!!!!!!!!!!!
तूफान..
झकासच !!
मस्तच !
मस्तच !