नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से.
अत्रे गडकर्यांना गुरुस्थानी मानत.
आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले.
काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?"
वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!"
----------------------------------------------------------
नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत. ते रात्र रात्र चालत.
अशाच एका प्रयोगानंतर त्यांची काही मित्रमंडळी त्यांच्याकडेच झोपली.
सकाळी उठल्यावर अंथरुणे आवरताना एकाच्या उशीखाली मोठा विंचू निघाला तेंव्हा तो मोठ्याने ओरडला.
गडकरी म्हणाले "ओरडतोस कशाला? अरे, दगडाखाली विंचू निघणारच!"
----------------------------------------------------------
गडकर्यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे तथाकथित साहित्यिकांशी त्यांचे फार जमत नसे.
असेच एकदा गडकरी पुण्यातल्या लकडी पुलावरुन (आत्ताचा संभाजी पूल) चाललेले असताना समोरुन एक साहित्यिक आले.
गडकरी म्हणाले "नमस्कार, काय कसे आहे?"
साहित्यिक "मी मूर्खांशी बोलत नाही."
गडकरी "पण मी बोलतो!"
----------------------------------------------------------
गडकर्यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत -
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)
----------------------------------------------------------
त्यांच्या नाटकांचे अजून एक वैशिष्ठ्य असे की सर्व गद्य गडकर्यांचे असले तरी सगळी पदे ही विठ्ठल सीताराम गुर्जर यांची आहेत!
त्यांचे शब्द एवढे चपखल आहेत की कुठेही आपल्याला अशी शंकासुध्दा येत नाही की ही पदे गडकर्यांची नाहीत.
आणि त्यातली बरीचशी बालगंधर्वांनी आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केली आहेत!
----------------------------------------------------------
गडकर्यांच्या असाधारण प्रतिभेचा आणखी एक किस्सा - त्यांचे एक नाटक त्यांनी संपूर्णपणे उलटीकडून लिहिले होते.
म्हणजे शेवटचा पाचवा अंक आधी, मग चौथा, त्यानंतर तिसरा, असे!
असो, तूर्तास एवढेच.
वाचने
12365
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाच अक्षरी नाटके
अजून दोन
संन्यस्त खड्ग ?
अरेच्चा !
In reply to संन्यस्त खड्ग ? by मुक्तसुनीत
व्हती गडबड
In reply to अरेच्चा ! by सुनील
धन्यवाद,
"वेड्यांचा
इ-बुक समग्र गडकरी
मजा आली..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गडकरी आणि अत्रे
अत्र्यांची काही मोजकीच पुस्तके मी वाचली आहेत.
In reply to गडकरी आणि अत्रे by मुक्तसुनीत
पुस्तकांची नावे
१ २ ३ ४ ५
खरचं की अजब आहे!
In reply to १ २ ३ ४ ५ by सुनील
खरे आहे ..
In reply to खरचं की अजब आहे! by चतुरंग
राम गणेश गडकरी या नावातच
मूकनायक
गडकरी आणि अत्रे