म्हणूनच तर मी घोरत होते

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:54 am

मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला
पण तेव्हातर मी झोपेत होते

मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते
माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते

मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती
म्हणूनच तर मी घोरत होते

प्रेर्ना

अदभूतअनर्थशास्त्रजिलबीभूछत्रीकविताप्रेमकाव्य

उधळायचे तर उधळून घे माधळून घे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:32 am

उधळायचे तर उधळून घे माधळून घे
परतून ढुसण्या देऊ नकोस म्हणजे झाले

निखळायचे तर निखळून निथळून जा
पांथस्थाच्या पायांना जखमा करू नकोस म्हणजे झाले

काफीला सोडावयाचा तर सोडून जा
भिंती आडून फसवे युद्ध छेडू नकोस म्हणजे झाले

कापूराचे क्षणभर पेटणे जगायचे तर जगून घे
पणत्या पेटवणार्‍या ज्योतींना विझवू नकोस म्हणजे झाले

हृदये कितीकांची ढवळायची ती ढवळून घे
हृदय स्वतःचेही हलकेसे ढवळू दे म्हणजे झाले

कविता

केवळ माझीया विवेका संगे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:08 am

मुर्ती पूजा करण्यास तयार आहे
व्यक्तिपूजा बांधण्यास सांगू नका

कोण किती मोठा छोटा
माझे मला ठरवू द्या

अक्षरपूजा करण्यास तयार आहे
शब्दपूजा बांधण्यास सांगू नका

ग्रंथ किती मोठा छोटा
माझे मला ठरवू द्या

असेल खड्डाही पुढे जरी
माझा मला आकळु द्या

अंधळा असेनही जरी मी
काठीने माझेच मला चाचपू द्या

चोखाळलेले नको आता ते
मलाच शोधू द्या मार्ग हवे ते

ठार बहिरा असेनही जरी मी
वास माझाच मी शोधणार आहे

अभिव्यक्ती हाकण्याचा
नाही कोणता उपाय

केवळ माझीया विवेका संगे
माझाच मी बहरणार आहे

फ्री स्टाइलकविता

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 8:13 am

तरूस लगडली सुवासिक आम्रफळे
परी कोयी अन बीया मोजतो हा बळे

पाण्यात मासे उसळतात
रेतीच्या खोप्यास हसतात

तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे
जळात उतरू कसा प्रश्न हा पडे

आर्जवी पाणिते अवीट
परी कृष्णास दिसे का मीठ

खेळती कधी लहर कधी लाट
प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ

तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे
पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

आता मला वाटते भितीकालगंगाजिलबीप्रेम कविताभूछत्रीरोमांचकारी.करुणमुक्तक

तडा गेलाच आहे तर...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 6:49 am

नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या!

नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या!

घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या!

अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या!

मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!

नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या!

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

मोबाईल ऍपची कल्पकता आणि उपयुक्तता

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
17 Apr 2017 - 1:09 am

युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.

तंत्रविज्ञानमाहिती

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 12:47 am

नाद मेघांचाच दर्जेदार होता
पावसाचा जोर फुसका बार होता!

ओल आहे काळजाच्या खोल रुतली
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता!

रात्र होती चंद्र होता गार वारा
चांदण्याचा कवडसा अंगार होता!

सावल्याही हाय मज सोडून गेल्या
की उन्हाचा रंग काळाशार होता??

सापडेना खंजिराची खूण कोठे
काळजावर काजळाचा वार होता!

ओळखावे तू मला ही आस नव्हती
हा तसा माझा नवा अवतार होता!

का प्रवासाला निघाला एकटा?तो...
सूर्य होता वा कुणी अंधार होता?

फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन
आज बहुधा वाटते रविवार होता!

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

वाहताना-जगताना

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जे न देखे रवी...
16 Apr 2017 - 10:49 pm

उसळतं,
फेसाळतं,

झेपतं?
का खुपतं?

झिरपून,
खुरपून,

खरं-खुरं,
खोटं-नाटं

कळेल का?
मिळेल का?

वाहताना,
जगताना,

हरवायचं,
हे ठरवायचं?

शुद्धलेखन

बाळा, उरले तुजपुरती......

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
16 Apr 2017 - 9:13 pm

कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय...

कविताभाषांतर