केवळ माझीया विवेका संगे

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 10:08 am

मुर्ती पूजा करण्यास तयार आहे
व्यक्तिपूजा बांधण्यास सांगू नका

कोण किती मोठा छोटा
माझे मला ठरवू द्या

अक्षरपूजा करण्यास तयार आहे
शब्दपूजा बांधण्यास सांगू नका

ग्रंथ किती मोठा छोटा
माझे मला ठरवू द्या

असेल खड्डाही पुढे जरी
माझा मला आकळु द्या

अंधळा असेनही जरी मी
काठीने माझेच मला चाचपू द्या

चोखाळलेले नको आता ते
मलाच शोधू द्या मार्ग हवे ते

ठार बहिरा असेनही जरी मी
वास माझाच मी शोधणार आहे

अभिव्यक्ती हाकण्याचा
नाही कोणता उपाय

केवळ माझीया विवेका संगे
माझाच मी बहरणार आहे

लागलेल्या ठेचांचे ही
गाणेही आनंदाने गाणार आहे

फ्री स्टाइलकविता