✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाळा, उरले तुजपुरती......

अ
अनन्त्_यात्री यांनी
Sun, 04/16/2017 - 21:13  ·  लेख
लेख
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय... सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने. मात्र या कवितेचे वेगळेपण असे की त्याने ही कविता त्या अनाम सैनिकाच्या पत्नीच्या - गोठलेपणाची परिसीमा गाठलेल्या - अवस्थेवर लिहिली . ती मूळ कविता (HOME they brought her warrior dead ) व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न: HOME they brought her warrior dead: She nor swooned, nor uttered cry: All her maidens, watching, said, ‘She must weep or she will die.’ Then they praised him, soft and low, Called him worthy to be loved, Truest friend and noblest foe; Yet she neither spoke nor moved. Stole a maiden from her place, Lightly to the warrior stepped, Took the face-cloth from the face; Yet she neither moved nor wept. Rose a nurse of ninety years, Set his child upon her knee— Like summer tempest came her tears— ‘Sweet my child, I live for thee.’ भावानुवाद: मृत्युंजय रणवीराचे कफनात कलेवर बघुनी विमनस्क वीरपत्नीच्या डोळ्यात गोठले पाणी ... कुणि अनुपमेय शौर्याच्या तडिताघाताने दिपले कुणि असह्य मित्रवियोगे हेलावून आतून गेले…. पण नजर "तिची" थिजलेली शून्यात जणू खिळलेली धगधगत्या वैशाखाने कोवळी पालवी जळली.. "अश्रूंना कोंडिल जर ही उरी फुटेल पोर बिचारी झेलील कसा मग असला नियतीचा घाव जिव्हारी" सारिले कुणी मग मागे वीराचे कफन जरासे पतिमुख पाहूनही तिजला ना मूर्च्छा, नाही उसासे अश्राप तान्हुले त्याचे ठेविले कुणि तिज पुढती कोसळता वळिव म्हणाली, 'बाळा, उरले तुजपुरती, बाळा, केवळ तुजपुरती"... (उदय - अनंत-यात्री)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
लेखनप्रकार (Writing Type)
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
7978 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

नका हो असं काही तरी लिहीत जाऊ

स्रुजा
Sun, 04/16/2017 - 21:18 नवीन
नका हो असं काही तरी लिहीत जाऊ :(
  • Log in or register to post comments

:(

संजय पाटिल
Mon, 04/17/2017 - 07:57 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

म्हणून म्हणतो

संजय क्षीरसागर
Sun, 04/16/2017 - 21:20 नवीन
कुणी सैन्यात भर्तीच होऊ नका ! मग कोण कुणाशी खेळणार युद्ध-युद्ध ? सगळा बावळटपणा एका झटक्यात संपेल. देन नो कविता अँड नो हृदय पिळवटींग.
  • Log in or register to post comments

अरे, हे कोणालाच कस॑ सुचल॑ नाही ?

अनन्त्_यात्री
Sun, 04/16/2017 - 21:29 नवीन
"कुणी सैन्यात भर्तीच होऊ नका ?" ही मात्र अति-सुलभिकरणाची परिसीमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुलभ तेच योग्य !

संजय क्षीरसागर
Sun, 04/16/2017 - 23:45 नवीन
असा रुले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

विनोद म्हणून ठीके ! पण फार ठीक नाही

अनन्त्_यात्री
Mon, 04/17/2017 - 09:26 नवीन
-"सुलभ तेच योग्य" असा रुले ? कोणी बनवला हा रूल ? की तो "स्वय॑-सिद्ध" वगैरे आहे? -खर॑च हा वैश्विक रूल असता तर सापेक्षता सिद्धान्ताचा उदय होण्यापूर्वी "सुलभ" व म्हणूनच "योग्य" ठरविले गेलेले ईथर पुढे प्रयोगा॑ती "योग्य" ठरले असते ना भाऊ? - यावर आता अधिक शब्दच्छल न केलेला बरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फारच सुरेख!!

पद्मावति
Sun, 04/16/2017 - 23:03 नवीन
फारच सुरेख!!
  • Log in or register to post comments

सुरेख रूपांतर

पैसा
Sun, 04/16/2017 - 23:58 नवीन
इंग्रजी कविता शिकताना फार वाईट वाटायचे. सुरेख रूपांतर केले आहे.
  • Log in or register to post comments

भावानुवाद जमलाय पण आवडला

रेवती
Mon, 04/17/2017 - 04:04 नवीन
भावानुवाद जमलाय पण आवडला म्हणवत नाही. काय मिळतं यांना युद्ध करून देवजाणे!
  • Log in or register to post comments

फारच मूलभूत प्रश्न

अनन्त्_यात्री
Mon, 04/17/2017 - 10:18 नवीन
पडलाय तुम्हाला की "काय मिळतं युद्ध करून?". असा प्रश्न की ज्याला उत्तरच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फारच मूलभूत प्रश्न

अनन्त्_यात्री
Mon, 04/17/2017 - 10:22 नवीन
पडलाय तुम्हाला की "काय मिळतं युद्ध करून?". असा प्रश्न की ज्याला उत्तरच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

"काय मिळतं युद्ध करून?"

संजय क्षीरसागर
Mon, 04/17/2017 - 15:42 नवीन
तुम्हाला प्रश्न कळला. आता पुन्हा एकदा उत्तर वाचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

संजयजी, तुमचं रूल-बुक व वावदूक प्रश्नोत्तरांचं गाईड

अनन्त्_यात्री
Tue, 04/18/2017 - 11:25 नवीन
-मुळात माझा प्रतिसाद रेवती ताईंच्या प्रतिसादावर होता. त्यात तुम्ही पडून प्रश्न कळला असे प्रमाणपत्र व उत्तर बघण्याचा अनाहूत सल्ला का दिलात हे एक कोडे आहे. -जरा समजून घ्या की तुमचं रूल-बुक व वावदूक प्रश्नोत्तरांचं गाईड या दोन्हीच्याही मी पलीकडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तसं नाही हो !

संजय क्षीरसागर
Tue, 04/18/2017 - 12:02 नवीन
मी : "सुलभ तेच योग्य" असा रुले ? तुम्ही : कोणी बनवला हा रूल ? आता बघा, ज्यावर सगळं अवलंबूने तो श्वासोत्छ्वास सहजे, हे तो बंद पडेल तेव्हाच कळेल. अठरा कोटी किमी दूर असलेल्या सूर्याभोवती पृथ्वी अहोरात्र फिरते, आहे का काही पत्ता ? आकाशात इतके ग्रह-तारे एकमेकांना न धडकता फिरतायंय आहे की नाही सहज ? पण माणूस बाँब काय टाकतो, युद्ध काय खेळतो, नुसता गोंगाट ! सो , सुलभ तेच योग्य असा रुले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

ते दैवी आहेत, सगळे त्यांनाच

दशानन
गुरुवार, 04/20/2017 - 17:11 नवीन
ते दैवी आहेत, सगळे त्यांनाच माहिती आहे आपण कोण त्यांच्याबद्दल लिहिणारे, त्यांना बाजूला ठेऊन लेखनावर आपला वेळ घालवा. अप्रतिम भाषातंर झाले खूप आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

भावानुवाद जमला आहे.

यशोधरा
Mon, 04/17/2017 - 09:37 नवीन
भावानुवाद जमला आहे.
  • Log in or register to post comments

फार सुंदर!!

पुंबा
Mon, 04/17/2017 - 12:14 नवीन
फार सुंदर!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम अनुवाद

खग्या
Mon, 04/17/2017 - 18:16 नवीन
मानल तुम्हाला
  • Log in or register to post comments

सुंदर भावानुवाद!

रुपी
Tue, 04/18/2017 - 00:25 नवीन
सुंदर भावानुवाद!
  • Log in or register to post comments

सुंदर!

बोका-ए-आझम
Tue, 04/18/2017 - 08:59 नवीन
मूळ कविता तर सुंदर आहेच. अनुवादही उत्कृष्ट. मुळात युद्ध ही संकल्पना फक्त रणभूमीपुरती मर्यादित नाही. आजच्या काळातल्या माणसाला अनेक लढे आणि युद्धं लढावी लागताहेत. त्या दृष्टीने विचार केला तर ही कविता केवळ सैनिकाच्या पत्नीला उद्देशून नाही.
  • Log in or register to post comments

बोका-ए-आझम, मूळ कवितेचा तुम्ही केलेला समर्पक विचार...

अनन्त्_यात्री
Tue, 04/18/2017 - 11:50 नवीन
...पटला अन आवडलाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रभावी

सुमीत भातखंडे
Tue, 04/18/2017 - 11:25 नवीन
अतिशय प्रभावी अनुवाद. ह्यावरून "सुनील" यांचा एक लेख आठवला. "Home they brought" आणि "तरुण आहे रात्र अजुनी" ह्यांची तुलना करणारा.
  • Log in or register to post comments

सुमीत, त्या दोन कवितान्ची तुलना ...

अनन्त्_यात्री
Tue, 04/18/2017 - 11:33 नवीन
कशी केली असावी हे लक्षात येत नाही, पण औत्सुक्य आहे ... "Home they brought" आणि "तरुण आहे रात्र अजुनी" ह्यांची तुलना करणारा लेख कुठे मिळेल? लिन्क पाठवाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन

अभ्या..
Tue, 04/18/2017 - 13:32 नवीन
एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकॄती हा तो धागा. वाचल्यावर तरुण आहे ह्याचे परस्पेक्टीव्हच बदलले गेलेले माझे. अप्रतिम लिहिलेले सुनीलरावांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

प्रतिसाद दिलेल्या सर्वा॑ना...

अनन्त्_यात्री
Wed, 04/19/2017 - 16:07 नवीन
..मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अनुवाद जबरदस्त जमलाय...

अमरप्रेम
गुरुवार, 04/20/2017 - 16:54 नवीन
मनाला नेहमीच भिडतात सैनिकांविषयीच्या कविता
  • Log in or register to post comments

दशानन, अमरप्रेम, धन्यवाद!

अनन्त्_यात्री
Sat, 04/22/2017 - 16:45 नवीन
दशानन, अमरप्रेम, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा