राम राम मंडळी,
माझे संगीतक्षेत्रातले स्नेही डॉ अशोक गोडबोले हे मिसळपावचे एक सन्माननीय सदस्य आहेत. परंतु 'मिसळपावचे सदस्य' एवढीच त्यांची ओळख मला थोडी अपुरी वाटते. आणि म्हणूनच मी या विद्वान व्यक्तिबद्दल येथे चार शब्द लिहू इच्छितो.
मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर असामान्य प्रभूत्व, संतसाहित्याचा गाढा अभ्यास, संस्कृतचा प्रकांडपंडित आणि संस्कृत साहित्याचा अतिशय दांडगा व्यासंग, ही गोडबोले सरांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील. गणित व तत्वज्ञान, वाङ्मय हे सरांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचप्रमाणे गोडबोले सर मराठी, संस्कृत, व हिंदी भाषेतून काव्यरचनाही अतिशय उत्तम करतात.