मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

ॐकार ·
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

पांढरपेशी कविता

ॐकार ·
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

ॐकार ·
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

गोडबोले सरांचा परिचय!

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी, माझे संगीतक्षेत्रातले स्नेही डॉ अशोक गोडबोले हे मिसळपावचे एक सन्माननीय सदस्य आहेत. परंतु 'मिसळपावचे सदस्य' एवढीच त्यांची ओळख मला थोडी अपुरी वाटते. आणि म्हणूनच मी या विद्वान व्यक्तिबद्दल येथे चार शब्द लिहू इच्छितो. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर असामान्य प्रभूत्व, संतसाहित्याचा गाढा अभ्यास, संस्कृतचा प्रकांडपंडित आणि संस्कृत साहित्याचा अतिशय दांडगा व्यासंग, ही गोडबोले सरांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील. गणित व तत्वज्ञान, वाङ्मय हे सरांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचप्रमाणे गोडबोले सर मराठी, संस्कृत, व हिंदी भाषेतून काव्यरचनाही अतिशय उत्तम करतात.

उगवला...चंद्र सुगीचा

नंदन ·
Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.