माझी चार अंग वस्रे

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

कायच्या काय

बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

अंगणात बाप, दारात माय,

अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

माझे ब्रह्मज्ञान

यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

भाषांतरीयाचा दृष्टांत

लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणी एक भाषांतरी असे. तो भाषांतर करी. हिंद गीत आणिक आंग्लभाषिक वेचे निवडी. अर्थाचा अनर्थ करण्याचा निर्धारु करी. वाक्यागणिक गहन मरहट्ट प्रतिशब्द ठेवी. मग त्या मुळ लिखिताची काशी होई. ही काशी आणिकी जालस्थळाचा आणिकी जालस्थळा पाडी. कुणी वाचक तयास साद देई. कुणी कावून हेच कर्म करुन पलटवार करण्या प्रवृत्त होई. परी भाषांतरी भाष्यकर्माचा वगळ ना करी. सुत्र : भाषांतरकर्मे आविष्कारु केल्यावीण धनार्जननिवृत्तू प्रसिद्धीस पात्र नव्हे.

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.

साहित्यातील 'माणिक' हरपलं ....

लेखनप्रकार
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु: खाचा आडोसा नको सुखाच

(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.
Subscribe to शब्दक्रीडा