मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लघु वल्गुदभारत-भाग १.

बॅटमॅन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
समस्त पंडित कवींचे आभार आणि क्षमा मागून पुढची ही वल्गुद-जिलेबी पाडली ऐसीजे . काही जिलेब्यांचे वरिजिनल मॉडेल मिपाकर नक्कीच वळखू शकतात. नसल्यास परत सांगतो शेवटी . तर या त्या जिलब्या: असा येतां पाहे निजनिकट तो वल्गुद-हरि | तदा जोकर् चित्तीं बहुत भरती मोदलहरी | सुरीतें चाकूतें परजुनि वदे गद्गद रवें | दिले शत्रू देवें मज सकल लोकांत बरवें ||१|| जिथे नाचती गुंड त्या जोकराचे | जनें होत पिल्लू जणूं कोकराचें | स्व-कौशल्य ज्या कत्तलींतून नाना | दिसे त्या करोनी करीती तनाना ||२|| असे कर्णिका अंबुजामाजि जेवी | ठगांमध्यभागी बसे ली चि तेवी | बसे एकला शांत जो चीनदेशी | तया बाहिरी काढणे हो अपेशी ||३|| तरी काढले बाहिरी लीलया हो | पुरी वाल्गुदी दाविली पैं तयां हो | दिसामाजि ली आणिला गॉथमांते | तसा सोपवीला पहा गॉर्डनांते ||४|| तदितर ठग भेणे वेगळाले पळाले | बहुत बहुत दंगा जे कराया मिळाले | स्वठग गवसला जो याजपाशी नसे तो | कठिण समय येता कोण कामास येतो ||५|| अद्यापि रेचल मनी बहु आठवीते | संभाषणें निजमना रिझवीत जाते | गेली परी हृदय नष्टवुनी सदाची | कैसे जगू, रुचि मनातिल नष्ट साची ||६|| अशी संपली पूर्ण हो अष्ट वर्षें | रणें माजती गॉथमीं हर्षमर्षें | तरी वाल्गुदेया स्मरतात काही | उसासे तरी काढती लोक काही ||७|| (क्रमशः).

वाचने 7188 वाचनखूण प्रतिक्रिया 24

पैसा Sun, 09/09/2012 - 01:13
आता त्या क्रमशःमधे आम्हाला लटकत ठेवू नका!

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Sun, 09/09/2012 - 23:50
खरे सत्य त्वां बोलिसी येथ वल्ली ; मरे जोकरू , ना मरे वीषवल्ली; पुढे येक देतोचि प्रीक्वेल साचे; तिथे वर्णितो कांड त्या अल्-घुलाचे. (छायाचमूचा शत्रू) बॅटमॅन.

चित्रगुप्त Sun, 09/09/2012 - 23:05
आवडले. (जुन्या काव्यात वरती वृत्त कोणते ते लिहिलेले असायचे, तसे करता आल्यास बघा)

नंदन Mon, 09/10/2012 - 01:09
वल्गुदभारत आवडले. पुढचा भाग बेगिना\बेगने\वेगाने (कोकणी\कन्नड\मराठी) येऊ द्या :)

मदनबाण Tue, 09/11/2012 - 22:09
पार वल्गुदुन टाकले ! ;) मला तरी यातले काही घंटा समजले नाही ! शिर्षासन करुन (मला तरी हे झेपणार नाही.;) ) वाचण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा कळावे यातले काहीतरी असे वाटते. ;)

In reply to by मदनबाण

प्रचेतस Tue, 09/11/2012 - 22:44
शिर्षासन करुन (मला तरी हे झेपणार नाही.Wink ) वाचण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा कळावे यातले काहीतरी असे वाटते
त्यानेही काही फरक पडणार नाही. त्यासाठी वाचायला नाही तर वल्गुद त्रिधारा (बॅटमॅन ट्रिलोजी) बघायला लागेल. ;)